IIFA 2022 : सई ताम्हणकर, विकी आणि क्रिती; पाहा IIFA पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
आयफा (IIFA 2022) पुरस्कार सोहळा हा शनिवारी (4 जून) पार पडला.जाणून घेऊयात आयफा 2022 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी...
IIFA 2022 : आयफा (IIFA 2022) पुरस्कार सोहळा हा अबुधाबी येथे पार पडला. या आयफा रॉक्स हा इव्हेंट शुक्रवारी (3 जून) पार पडला तर आयफा पुरस्कार सोहळा हा शनिवारी (4 जून) पार पडला. या सोहळ्याला सलमान खान, शाहिद कपूर, विकी कौशल, क्रिती सॅनॉन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अनन्या पांडे, सारा अली खान, एआर रहमान, टायगर श्रॉफ, नोरा फतेही, यो यो हनी सिंग, पंकज त्रिपाठी यांनी हजेरी लावली. अनेक सेलिब्रिटींना आयफा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जाणून घेऊयात आयफा 2022 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी...
सर्वोत्कृष्ट चित्र - शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विष्णू वरधन(शेरशाह)
प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता - विकी कौशल (सरदार उधम)
प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - क्रिती सेनन, (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पंकज त्रिपाठी (लुडो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सई ताम्हणकर, (मिमी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण- अहान शेट्टी, (तडप)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला)- शर्वरी वाघ, (बंटी और बबली 2)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - जुबिन नौटियाल, रतन लांबियन, (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - असीस कौर, रतन लांबियन, (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट संगीत (टाय) - ए आर रहमान, (अतरंगी रे), आणि तनिष्क बागची, जसलीन रॉयल, जावेद-मोहसीन, विक्रम मॉन्ट्रोज, बी प्राक, जानी, (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट गीत - कौसर मुनीर, लेहरा दो (83)
Best Story Original - अनुराग बसू, लुडो
Best Story Adapted - कबीर खान, संजय पूरण सिंग चौहान, 83
आयफा 2022 हा पुरस्कार सोहळा सलमान खान, रितेश देशमुख आणि मनीष पॉल यांनी होस्ट केला होता.
हेही वाचा :
- PHOTO : सिल्व्हर सिक्वेंस साडीत अनन्या पांडेचा कातीलाना अंदाज! पाहा फोटो...
- Body Spray Ad : बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवरून सुरु झाला वाद, युट्यूब आणि ट्विटरवरून हटवण्यासाठी सरकारचा आदेश!
- Samrat Prithviraj Box Office Collection Day 2 : अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ला बॉक्स ऑफिसवर मिळतेय पसंती, दुसऱ्या दिवशीच्या कमाईत वाढ!