पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर, सोलापुरात जीबीएसचा (GBS) पहिला रुग्ण दगावला होता, ज्यास पुण्यातूनच संसर्ग झाला होता. आता, पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)च्या आणखी एका रूग्णाचा मृत्यू झाला असून पुण्यातील (Pune) रुग्णाचा हा तिसरा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील नांदेडगाव परिसरातील 65 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. या रूग्णावर गेल्या 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे, पुणे महापालिकेकडून काळजी घेण्यात येत असून नागरिकांनाही आवाहन केलं जात आहे. त्यातच, आता पुण्यातील खासगी टँकरमधून (Tanker) येणारं पाणी हे आरोग्यासाठी घातक असून त्यातूनही जीबीएसची लागण होण्याचा धोका असल्याचं पुणे महापालिकेनं म्हटलं आहे.  


पुण्यातील नांदेडगावात अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत, त्यातील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. पुण्यातला तिसरा आणि राज्यातला चौथ्या जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला झाल्याने आता चिंता वाढली आहे. तर पुणे शहरामध्ये नांदेडगाव, सिंहगड रस्ता परिसर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जीबीएस  (Guillain Barre Syndrome) बाधित रूग्ण आढळून आले आहेत. खासगी टँकरने दिल्या जाणारं पाणी धोकादायक असल्याचं महापालिकेच्या तपासातून समोर आलं आहे. पुणे शहरात टँकर भरण्याच्या सगळ्या 15 पॅाईटवरून टँकरने होणारा सगळा पाणीपुरवठा दूषित आहे. या खासगी टँकरच्या पाण्यात कॉलिफार्म आणि इ-कोलाय बॅक्टेरिया आढळून आला आहे. कॉलिफार्म आणि इ-कोलाय बॅक्टेरिया मानवाच्या शरिरासाठी घातक असल्याचं पुणे महापालिकेनं म्हटलं आहे. जीबीएस रोगाचा प्रादुर्भाव होण्यास या टँकरमधील पाण्याने निमंत्रण मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील धायरी, किरकटवाडी, नांदेड तसेच डीएसके विश्व परिसरातील हे ट्रँकर पॉईंट आहेत. 


पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील धायरी, किरकटवाडी, नांदेड तसेच डीएसके विश्व परिसरातील खासगी ट्रँकरने अनेक भागांत पाणी पुरवलं जातं. या भागात पाणी पुरविणाऱ्या सर्व 15 टँकर भरणा केंद्राच्या बोअरवेलच्या पाण्यात दूषीत पाण्यात आढळणारा कॉलिफॉर्म आणि ई-कोलाय हा बॅक्टेरीया सापडला आहे. हे दोन्ही बॅक्टेरिया माणसाच्या शरिरासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे, जीबीएस रोगाचा प्रादुर्भाव किंवा आजारासारखी लक्षणे उद्धभवू शकतात. पुणे महापालिकेकडून आज सिंहगड रस्ता परिसरातील धायरी, किरकटवाडी, नांदेड आणि डीएसके विश्व परिसरातील 15 टँकर भरणा केंद्राच्या पाण्याची तपासणी करण्यात आली होती. त्यात हे बॅक्टेरिया पाण्यात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे, आता या ट्रँकर पॉईंटवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या सर्व केंद्राना महापालिकेकडून तातडीनं नोटीस बजाविण्यात येणार आहे. कारण, हे पाणी पिण्यायोग्य असून आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढला आहे. 


हेही वाचा


धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली