Harshit Rana T20I Debut as Concussion Sub : इंग्लंडविरुद्धच्या पुणे टी-20 मध्ये असे काही पाहिला मिळाले, ज्यामुळे लाखो चाहते आश्चर्यचकित झाले. या सामन्यात सामना सुरू झाल्यानंतर दोन तासांनी, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अचानक एक मोठा बदल झाला. संघातून बाहेर असलेल्या खेळाडूने अचानक संघात एन्ट्री मारली, हा खेळाडू म्हणजे हर्षित राणा.
हर्षित राणाला पुणे टी-20 मध्ये कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून खेळण्याची संधी मिळाली. सामन्यादरम्यान शिवम दुबे जखमी झाल्यामुळे राणाला अचानक पुण्यात स्थान मिळाले. 20 व्या षटकात जेमी ओव्हरटनच्या गोलंदाजीवर शिवम दुबेला दुखापत झाली. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाचा बाउन्सर दुबेच्या हेल्मेटला लागला, त्यानंतर त्याला चक्कर आली. परिणामी तो सामन्यातून बाहेर पडला आणि त्याच्या जागी हर्षित राणाला खेळण्याची संधी मिळाली. आणि तो सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरला. कारण यानंतर टीम इंडियाने मॅच रेफ्रीकडे लेखी अर्ज सादर करून पर्यायी खेळाडूची मागणी केली. अशाप्रकारे, हर्षित राणाला खेळण्याची संधी मिळाली.
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू! हर्षित राणाने घातला धुमाकूळ
शिवम दुबेची वगळणे ही हर्षित राणासाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरली, कारण तो पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. हो, हे हर्षित राणाचे टी-20 पदार्पण ठरले आणि मोठी गोष्ट म्हणजे या खेळाडूने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. हर्षित राणाने लिव्हिंगस्टोनला बाद करून टीम इंडियाला चौथे यश मिळवून दिले आणि तो त्यांचा पहिला बळी ठरला. त्यावेळी कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. त्याने या सामन्यात 33 धावांत 3 बळी घेत इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्याने इंग्लंडचे 3 फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि एव्हर्टन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर वरुण चक्रवर्तीनेही 2 आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोईनेही 3 विकेट घेतल्या
कंकशन पर्यायाचा नियम काय?
कन्कशन सबस्टिट्यूट नियमानुसार, जर चेंडू एखाद्या खेळाडूच्या डोक्याला लागला तर संघाचे वैद्यकीय अधिकारी त्याची तपासणी करतील. जर तो खेळाडू खेळण्याच्या स्थितीत नसेल तर संघाने बदली खेळाडूचे नाव मॅच रेफ्रीला लेखी स्वरूपात द्यावे लागेल. यानंतर सामनाधिकारी बदली खेळाडूला मान्यता देतात.
हे ही वाचा -