Entertainment News Live Updates 3 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jul 2022 09:27 PM
Y Marathi Movie : 'वाय'च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Y Marathi Movie : काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय' (Y) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
समाजात वावरताना आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात. ज्यांचा आपल्याला थांगपत्ताही नसतो आणि अगदीच या घटनांबाबत कळले तर त्याकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. त्याचेच मिश्र स्वरूपातील पडसाद मग आपल्या समाजात उमटतात. अजित वाडीकर दिग्दर्शित 'वाय' या सिनेमात अशाच गोष्टीवर भाष्य करण्यात आले आहे.

गुरमित-देबिनाच्या लाडक्या लेकीची पहिली झलक समोर; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरीच्या घरी नुकतेच छोट्या पाहुणीचे आगमन झाले आहे. गुरमीत चौधरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता गुरमित-देबिनाने लाडक्या लेकीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 





Stepney : 'स्टेपनी' सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Stepney :  'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी' नंतर आता 'स्टेपनी' (Stepney) या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 10 जुलैला दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात विनोदाचा बादशहा भरत जाधव (Bharat Jadhav) मुख्य भूमिकेत आहे. 

माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेकून विश्वजित काका घेणार ब्रेक; 'कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख' सफर करणार

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत विश्वजित चौधरी हे पात्र आनंद काळे साकारत आहे. या मालिकेमुळे आनंद काळे यांना वेगळी ओळख मिळाली आहे. पण आता आनंद काळे काही दिवसांसाठी या मालिकेतून ब्रेक घेणार आहेत. ‘कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख’ अशी सफर आनंद काळे बाईकवरुन करणार आहेत. त्यामुळेच त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. 

आदित्य रॉय कपूरच्या 'राष्ट्र कवच ओम'नं दुसऱ्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन

Rashtra Kavach Om Box Office Collection : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या (Aditya Roy Kapur) राष्ट्र कवच ओम (Rashtra Kavach Om) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. एक जुलै रोजी हा चित्रपट रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटानं पहिल्या दिवशी 1.51 कोटींची कमाई केली. तर आता दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाली आहे. पाहूयात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...


वाचा सविस्तर बातमी 

Captain Miller : धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट झाला आहे. धनुषने टीझर शेअर करत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सध्या हा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 





Jug Jugg Jeeyo Box Office : 'जुग जुग जियो'चा विकेंड धमाका

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणीच्या (Kiara Advani) 'जुग जुग जियो'  (Jug Jugg Jeeyo) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहेत. रिलीजच्या आठव्या दिवशी या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. जगभरात आतापर्यंत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.





R Madhavan : 'विक्रम वेध' मधील सैफ अली खानच्या भूमिकेबाबत आर. माधवन म्हणाला; 'बघू तो मला हरवू शकतो की..'

R Madhavan On Saif Ali Khan : अभिनेता आर माधवन (R Madhavan) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. काही दिवसांपूर्वी त्याचा रॉकेट्री: द नांबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect)हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आर. माधवननं हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केलं आहे. त्याच्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha)या साऊथ सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता विक्रम वेधा या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हे काम करणार आहेत. चित्रपटात वेधा ही भूमिका ह्रतिक साकारणार आहे तर विक्रम ही भूमिका सैफ अली खान साकारणार आहे. विक्रम वेधा चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये विक्रम ही भूमिका आर. माधवननं साकारली होती तर वेधा ही भूमिका अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) साकारली होती. एका मुलाखतीमध्ये आर. माधवननं विक्रम या भूमिकेबाबत सांगितलं. 


वाचा सविस्तर बातमी

दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य अखेर दिपासमोर येणार! मालिकेत पुढे काय घडणार? जाणून घ्या...

Rang Majha Vegla : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) सध्या प्रचंड गाजते आहे. या मालिकेत सध्या बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या मोठा गोंधळ पाहायला मिळतो आहे. आता लवकरच दीपाला दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य कळणार आहे. आयेशा आणि कार्तिकच्याच्या वादानंतर आयेशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, आपण तुझे लग्न कार्तिकशी लावून देऊ असा शब्द दीपाने आयेशाला दिला होता. मात्र, दुसरीकडे सौंदर्या दीपाने असं करू नये म्हणून शक्य ते प्रयत्न करत असते.


आता दीपिका दीपाचीच मुलगी आहे, हे तिला कळावं म्हणून सौंदर्या इनामदार एक योजना तयार करते. त्यानुसार दीपाला सगळे पुरावे मिळावे अशी व्यवस्था ती करून ठेवते. तिच्या योजनेनुसार आता दीपाला सगळी खरी गोष्ट कळली आहे. सोबतच आपली दुसरी मुलगी देखील जिवंत असून, ती दीपिकाच असल्याचं देखील तिला कळतं. आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य तिच्या समोर आल्यानंतर दीपा प्रचंड हादरली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

मलायका आरोरानं शेअर केला खास फोटो

'...म्हणून मी खतरों के खिलाडीचं सूत्रसंचालन करतो'; रुबिनाच्या प्रश्नाला रोहित शेट्टीनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

Rubina Dilaik : छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या 12 व्या (Khatron Ke Khiladi Season 12) सिझनला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. खतरों के खिलाडीच्या 12 व्या सिझनमध्ये अभिनेत्री  रूबीना दिलैक (Rubina Dilaik) ही सहभागी होणार आहे. नुकताच रुबीनानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये रुबीना ही रोहित शेट्टीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. 


वाचा सविस्तर बातमी

मारहाण झाली, विनयभंगही झाला!, तुरुंगात जाताना केतकी चितळेसोबत काय काय घडलं?

Ketaki Chitale : मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. जूनच्या अखेरीस केतकीला जामीन मिळाला, त्यानंतर आता केतकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाणे जिल्हा कारागृहात नेत असताना आपला विनयभंग झाल्याचे केतकीचे म्हणणे आहे.


केतकी चितळेने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये केतकीने पोलिस कोठडीदरम्यान मिळालेल्या वागणुकीचा खुलासा केला आहे. केतकी चितळे हिने नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'मला ते दिवस आठवतात आणि वाटते की, आपली न्याय व्यवस्थाही किती विचित्र आहे. दुसऱ्याची कविता कॉपी-पेस्ट केल्याबद्दल मला माझ्याच घरातून उचलून तुरुंगात टाकण्यात आले. ते माझे शब्द नव्हते.' भारताच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभिनेत्री म्हणाली, ‘कुठल्याही माहितीशिवाय, कोणत्याही नोटीसशिवाय आणि अटक वॉरंटशिवाय एखाद्याला अटक बेकायदेशीर नाही का? मी माझ्या पोस्टने कोणालाही टार्गेट केलेले नाही. लोकांनी माझी पोस्ट चुकीच्या पद्धतीने घेतली.’


वाचा संपूर्ण बातमी

समुद्र किनाऱ्यावर शहनाज गिलची धमाल, अभिनेत्रीचा क्युट व्हिडीओ पाहिलात?

Shehnaaz Gill Video:  ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) आता लाखोंच्या हृदयाची धडकन बनली आहे. शहनाज जेव्हा 'बिग बॉस 13' मध्ये आली, तेव्हा तिची ओळख फक्त पंजाबपुरती मर्यादित होती. पण, आता ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. इतकंच नाही तर, सोशल मीडियावर अभिनेत्रीचा प्रत्येक नवीन फोटो आणि व्हिडीओही धुमाकूळ घालत असतो. दरम्यान, शहनाजने आता तिचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती समुद्रकिनारी धमाल करताना दिसत आहे. या व्हिडीओवर तिचे चाहते भरभरून लाईक्स करत आहेत.


या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाच्या ग्राफिक्स टीशर्टमध्ये सना खूपच क्यूट दिसत आहे. शहनाजने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणतेय, 'बघा अजून चंद्र नाही, तरीही इतकं पाणी आलंय, यांना सूर्य आकर्षित करतोय का?, मी ऐकलं होतं की, चंद्र पाण्याला आकर्षित करतो, मला वाटतं की मीच पाण्याला आकर्षित करत आहे. या व्हिडीओमधील तिचा अंदाज सगळ्यांनाच भुरळ घालत आहे.


वाचा संपूर्ण बातमी

गावातील मुलगी ते टीव्हीची ‘लाफ्टर क्वीन’ बनण्यापर्यंतचा भारतीचा संघर्षमय प्रवास!

Bharti Singh Birthday : टीव्हीची ‘लाफ्टर क्वीन’ कॉमेडियन-अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आज (3 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेल्या भारती सिंहचे यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. तिच्या आईवडिलांनी तर तिला गर्भातच मारण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही, तर जेव्हा भारती सिंहने कॉमेडियन बनण्याचा निर्णय घेतला, तेव्हा देखील तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बहिष्कार टाकला होता.


भारती सिंह नेहमीच तिच्या चाहत्यांना हसवण्यात यशस्वी ठरते. ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून टीव्ही विश्वावर राज्य करणाऱ्या भारती सिंहचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. खुद्द भारती सिंहने एका मुलाखतीदरम्यान याबद्दल सांगितले होते.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


अभिनेता राजपाल यादवला पोलिसांनी पाठवली नोटीस; 20 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप


ajpal Yadav Cheating Case : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) हा त्याच्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. राजपाल यादव  त्याच्या चित्रपटामधील अभिनयामुळे चर्चेत असतो. पण सध्या राजपाल हा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. राजपाल यादव याच्यावर 20 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता इंदूर पोलिसांनी त्याला नोटिस पाठवली आहे.


रिपोर्टनुसार, राजपाल यादव यांच्यावर एका बिल्डरनं वीस लाखांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. राजपालवर सुरिंदर नावाच्या बिल्डरनं फसवणूकीचा आरोप केला आहे.  पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सुरिंदरनं सांगितले आहे की, राजपाल यादवनं सुरिंदरच्या मुलाला बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्यासाठी सुरिंदरकडून  20 लाख रुपये घेतले होते. पण राजपालनं सुरिंदरच्या मुलाला बॉलिवूडमध्ये काम मिळवून दिलं नाही आणि त्यानंतर  राजपालनं सुरिंदरचा फोन उचलणं देखील बंद केलं. सुरिंदर म्हणाला की, 'राजपाल यादवनं फोन उचलणं बंद केल्यानं कंटाळून त्यानं पोलिसात तक्रार दाखल केली.'  त्यानंतर या प्रकरणावर कारवाई करत पोलिसांनी राजपालविरोधात नोटीस बजावली असून त्याला 15 दिवसांत हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.


पाच कोटींची फसवणूकी केल्याच्या प्रकरणी राजपाल यादवला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. काही दिवसांपूर्वी 'भूल भूलैय्या-2' हा राजपाल यादवचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हंगामा, रेस अगेन्स्ट टाइम, चुप चुप के, गरम मसाला, फिर हेरा फेरी, ढोल या चित्रपटांमध्ये राजपालनं काम केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.