Entertainment News Live Updates 28 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 May 2022 10:10 PM
सुबोध भावेने राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे मानले आभार

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतो. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी नाट्य विश्व या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. आता यासंदर्भात अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत. 

कान्स चित्रपट महोत्सवात भारताच्या All That Breathes माहितीपटाला पुरस्कार

'कान्स चित्रपट महोत्सवा'ची (Cannes 2022) आज सांगता होणार आहे. 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय सिनेतारकांसह सिनेमांचादेखील दबदबा आहे. कान्स चित्रपट महोत्सवात आता दिग्दर्शक शौनक सेन (Shaunak Sen) यांच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) या माहितीपटाने गोल्डन आय अवॉर्ड (Golden Eye) पटकावला आहे. 

मल्टीस्टारर 'झोलझाल' सिनेमाचे पोस्टर आऊट

 'झोलझाल' (Zol Zaal) हा सिनेमा 1 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा मल्टीस्टारर सिनेमा असणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विनोदाची मेजवानी हे महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. अशाच मनोरंजनाची आणि हास्याची मेजवानी 'झोलझाल' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सासूबाईंनी लावली 'किचन कल्लाकार'च्या मंचावर हजेरी

अभिनेत्री उषा नाडकर्णी, सविता मालपेकर आणि देवमाणूस मधील सरू आजी म्हणजेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार या अभिनेत्रींनी 'किचन कल्लाकार'च्या मंचावर हजेरी लावली आहे. या अभिनेत्रींनी छोटा पडदा चांगलाच गाजवला आहे. या सगळ्या सासू एकाच मंचावर असल्याने प्रेक्षकांना मात्र चांगलाच दंगा पाहायला मिळाला. कुठली सासू भारी ठरतेय याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. 

किंग खानच्या 'मन्नत'वरील 25 लाखाची नेम प्लेट अचानक गायब

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पण यंदा शाहरुख नेम प्लेटमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखने मन्नत (Mannat) बंगल्याची नेम प्लेट बदलली होती. पण आता ही 25 लाखाची नेम प्लेट अचानक गायब झाली आहे.   

नेहा-यशचं होणार ग्रॅंड वेडिंग

'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेत लवकरच यश-नेहाचा साखरपुडा पार पडणार आहे. तर नेहा-यशचं ग्रॅंड वेडिंग होणार आहे. 

'कान्स चित्रपट महोत्सवा'त अमृता फडणवीसांना पुरस्कार

कान्स चित्रपट महोत्सवात अन्न आरोग्य आणि शाश्वत विकास यासंबंधी जनजागृती केल्यामुळे अमृता फडणवीस यांना पुरस्कार मिळाला आहे.

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 100 कोटींचा टप्पा गाठणार!

कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणी स्टारर 'भूल भुलैया 2' ने जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये शतक ठोकले आहे. आता बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा गाठणार आहे.


 





ओडिशातील 18 वर्षीय श्रिया लेंकालाठरली भारताची पहिली के-पॉप स्टार!

ओडिशातील 18 वर्षीय श्रिया लेंका ही भारतातील पहिली के-पॉप कलाकार बनली आहे. श्रिया लेंका हिची ब्राझीलच्या गॅब्रिएला दलसिनसोबत कोरियन पॉप बँड 'ब्लॅकस्वान'चा भाग होण्यासाठी निवड झाली आहे.


 



रणदीप हुडाचा 'वीर सावरकर' लूक प्रेक्षकांच्या भेटीला

वीर सावरकर सिनेमातील रणदीप हुडाचा लूक रिलीज. महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमा. आज सावरकरांच्या जयंती निमित्ताने लूक लाँच


 





ट्रोलर म्हणाला ‘ती तिच्या कुत्र्या-मांजरासोबत एकटीच मरेल’, सडतोड उत्तर देत समंथा म्हणते...

समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाळीव कुत्र्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोवर कमेंट करत ट्विटर हँडलवर समंथा रुथ प्रभूला एका ट्रोलरने वाईटरित्या ट्रोल केले. समंथाच्या एका पोस्टवर कमेंट करताना त्याने लिहिले की, ‘ती तिच्या कुत्रे आणि मांजरींसह एकटीच मरेल.’ यावर समंथानेही त्याला उत्तर दिले. ती म्हणाली की, ‘असे झाले तर, मी स्वतःला भाग्यवान समजेन.’ समांथाच्या जबरदस्त उत्तरानंतर ट्रोल करणाऱ्या व्यक्तीने त्याचे ट्विट डिलीट केले.


वाचा संपूर्ण बातमी

कतरिना कैफ व्यतिरिक्त सलमान खान 'या' अभिनेत्रींना इन्स्टाग्रामवर करतो फॉलो!

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला इंस्टाग्रामवर 42 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात आणि त्याबदल्यात तो केवळ 34 लोकांना फॉलो करतो. या यादीत फक्त सात अभिनेत्री आहेत. सलमान खान इन्स्टाग्रामवर कतरिना कैफ व्यतिरिक्त, संगीता बिजलानी, डेझी शाह, वालुशा डीसुजा, जॅकलीन फर्नांडिस, युलिया वंतूर आणि इसाबेल कैफ यांना फॉलो करतो.

अजय देवगण, अमिताभ बच्चन यांचा ‘रनवे 34’ आता घरबसल्या पाहता येणार!

Runway 34 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) दिग्दर्शित-निर्मित ‘रनवे 34’ (Runway 34) हा चित्रपट आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहता येणार आहे. प्रेक्षक डिजिटल सबस्क्रिप्शन घेण्याऐवजी केवळ काही पैसे मोजून हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. ‘रनवे 34’ हा अजयचा तिसरा दिग्दर्शकीय चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांनी पायलटची भूमिका साकारली होती. त्याचवेळी ‘महानायक’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील एका खास व्यक्तिरेखेत दिसले आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

देशसेवेचं व्रत घेतलं हाती, कीर्तीचं ‘आयपीएस’ बनण्याचं स्वप्न अखेर झालं पूर्ण!

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) मालिकेत कीर्तीचं आयपीएस बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. कीर्तीच्या स्वप्नपूर्तीचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीय. घरच्या जबाबदाऱ्या आणि खडतर प्रशिक्षणाची कसोटी पार करत कीर्तीने आपलं ध्येयं साध्य केलं आहे. जामखेडकर कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.


कीर्तीचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. गेले दोन महिने या खास भागासाठी विशेष मेहनत घेण्यात आली. कीर्तीच्या मालिकेतल्या प्रशिक्षणासाठी खऱ्याखुऱ्या एनसीसी कॅडेट टीमची नेमणूक करण्यात आली होती. एनसीसी कॅडेट व्हॅलेण्टाईन फर्नांडिस आणि त्यांच्या टीमने मालिकेतले हे रोमांचक प्रसंग साकारण्यासाठी मेहनत घेतली. कीर्तीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) हे आव्हान स्वीकारलं आणि सुरु झाला ध्येयपूर्तीचा प्रवास. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समृद्धीने हे खडतर प्रशिक्षणाचे सीन पूर्ण केले. अर्थात मालिकेत यापुढेही कीर्तीच्या शौर्याचे प्रसंग पाहायला मिळतीलच.

शाहीद कपूरच्या 'कबीर सिंह'चा येणार सिक्वेल, निर्मात्यांनी दिली माहिती

Kabir Singh Sequel : शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'कबीर सिंह' (Kabir Singh) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला होता. हा सिनेमा 250 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 'कबीर सिंह'नंतर भूषण कुमार आणि मुराद खेतानी या जोडीने 'भूल भुलैया 2' हा सिनेमावर लक्ष केंद्रीत केले. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. दरम्यान भूषण कुमार यांनी 'कबीर सिंह'च्या सिक्वेलसंदर्भात माहिती दिली आहे. 


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेन्ण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


गिरगावात उभारले जाणार 'मराठी नाट्य विश्व' नाट्यगृह; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण


गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून 'मराठी नाट्य विश्व' (Marathi Natya Vishwa) ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे आज करण्यात आले.


उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, अशी कल्पना माझ्या मनात होती. ती लवकरच 'मराठी नाट्य विश्व' इमारतीच्या रुपाने प्रत्यक्ष साकारणार आहे. याचा मनापासून आनंद आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला नाटकांची मोठी व अभिमानास्पद परंपरा आहे. त्यामुळे माझ्या मनात काही काळापासून नाट्य संग्रहालयाची कल्पना होती


मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नाट्यसृष्टी हे महाराष्ट्राचं वैभव आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते सामाजिक वेदना-व्यथा यावर नेमकं बोट ठेवून उपाय शोधण्यास प्रवृत्त करणारं माध्यम आहे. काळाच्या पाऊलखुणा जपणं हे महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टी व रंगभूमीचा इतिहास सांगणारी मराठी नाट्य विश्वाची इमारत कागदावरुन आता प्रत्यक्षात जमिनीवर साकारणार आहे, याचा आनंद आहे. तसा माझा नाटकांशी काही थेट संबंध नाही, पण माझ्या आजोबांनी सामाजिक समस्यांवर नाटकं लिहिली होती. त्याकाळी ठाकरेंना थिएटर मिळू नये म्हणून देखील प्रयत्न व्हायचे. आणि मिळालेच थिएटर तर, ते अतिशय अस्वच्छ, आतमध्ये कचऱयाचे ढिगारे, उंदीर आणि घुशी यांचे साम्राज्य असायचे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.