Marathi Natya Vishwa : गिरगावात उभारले जाणार 'मराठी नाट्य विश्व' नाट्यगृह; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण
Marathi Natya Vishwa : गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून 'मराठी नाट्य विश्व' ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे.
Marathi Natya Vishwa : गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून 'मराठी नाट्य विश्व' (Marathi Natya Vishwa) ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे आज करण्यात आले.
उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, अशी कल्पना माझ्या मनात होती. ती लवकरच 'मराठी नाट्य विश्व' इमारतीच्या रुपाने प्रत्यक्ष साकारणार आहे. याचा मनापासून आनंद आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला नाटकांची मोठी व अभिमानास्पद परंपरा आहे. त्यामुळे माझ्या मनात काही काळापासून नाट्य संग्रहालयाची कल्पना होती
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नाट्यसृष्टी हे महाराष्ट्राचं वैभव आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते सामाजिक वेदना-व्यथा यावर नेमकं बोट ठेवून उपाय शोधण्यास प्रवृत्त करणारं माध्यम आहे. काळाच्या पाऊलखुणा जपणं हे महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टी व रंगभूमीचा इतिहास सांगणारी मराठी नाट्य विश्वाची इमारत कागदावरुन आता प्रत्यक्षात जमिनीवर साकारणार आहे, याचा आनंद आहे. तसा माझा नाटकांशी काही थेट संबंध नाही, पण माझ्या आजोबांनी सामाजिक समस्यांवर नाटकं लिहिली होती. त्याकाळी ठाकरेंना थिएटर मिळू नये म्हणून देखील प्रयत्न व्हायचे. आणि मिळालेच थिएटर तर, ते अतिशय अस्वच्छ, आतमध्ये कचऱयाचे ढिगारे, उंदीर आणि घुशी यांचे साम्राज्य असायचे.
जुनी नाटके रेकॉर्ड व्हावीत : उद्धव ठाकरे
गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून 'मराठी नाट्य विश्व' ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत साकारणार आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 27, 2022
त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण @CMOMaharashtra श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी करण्यात आले. pic.twitter.com/XjxplNBR1G
दरम्यान ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगाची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. हा प्रयोग खास बाळासाहेबांसाठी दिलीपजींनी मातोश्रीवर आयोजित केला होता. बाळासाहेबांना प्रकृतीच्या कारणामुळे नाट्यगृहात जाऊन पाहणे शक्य नव्हते. म्हणून प्रभावळकर यांनी स्वतः हा प्रयोग घरी येऊन सादर करतो म्हणून सांगितले आणि हा दीड तासांचा प्रयोग प्रभावळकर यांनी इतका रंगवला की, बाळासाहेब उत्स्फूर्तपणे म्हणाले "अरे माणूस आहेस का भूत आहेस तू?". अशी आठवण सांगून थ्रीडी, फोरडी सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जुनी नाटके रेकॉर्ड व्हावीत, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
संबंधित बातम्या