(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Runway 34 on Amazon Prime : अजय देवगण, अमिताभ बच्चन यांचा ‘रनवे 34’ आता घरबसल्या पाहता येणार! खर्च करावे लागतील केवळ ‘इतके’ पैसे!
Runway 34 : ‘रनवे 34’ची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटातील अजयच्या पात्राचे नाव कॅप्टन विक्रांत खन्ना आहे.
Runway 34 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) दिग्दर्शित-निर्मित ‘रनवे 34’ (Runway 34) हा चित्रपट आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहता येणार आहे. प्रेक्षक डिजिटल सबस्क्रिप्शन घेण्याऐवजी केवळ काही पैसे मोजून हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. ‘रनवे 34’ हा अजयचा तिसरा दिग्दर्शकीय चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांनी पायलटची भूमिका साकारली होती. त्याचवेळी ‘महानायक’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील एका खास व्यक्तिरेखेत दिसले आहेत.
‘रनवे 34’ची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटातील अजयच्या पात्राचे नाव कॅप्टन विक्रांत खन्ना आहे, जो एक कुशल पायलट आहे. कॅप्टन विक्रांतचे विमान आंतरराष्ट्रीय स्थळावरून टेक ऑफ केल्यानंतर एका रहस्यमयी मार्गाने जाते.
प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हेच माझे ध्येय : अजय देवगण
चित्रपटाविषयी बोलताना अभिनेता-दिग्दर्शक अजय देवगण म्हणाला की, ‘रनवे 34 हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर चित्रपट रेंटलद्वारे प्रेक्षकांना हा चित्रपट लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी मी देखील खूप उत्सुक आहे. मी बनवलेल्या प्रत्येक चित्रपटाला जास्तीत जास्त प्रेम मिळावे, असे नेहमी वाटते. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हेच माझे ध्येय आहे. या सर्व्हिसद्वारे, चित्रपट देशाच्या कानाकोपऱ्यातील चित्रपट प्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध होईल, जे त्यांच्या आवडत्या वेळी आणि कोणत्याही डिव्हाईसवर चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.’
अवघ्या ‘इतक्या’ पैशांत पाहता येईल चित्रपट!
प्रेक्षक ‘रनवे 34’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर फक्त 199 रुपयांमध्ये पाहू शकतात. हा चित्रपट पाहण्यासाठी primevideo.com वरील 'स्टोअर' टॅब आणि अँड्रॉइड स्मार्ट फोन, स्मार्ट-टीव्ही, कनेक्टेड एसटीबी आणि फायर टीव्ही स्टिक्सवरील प्राईम व्हिडीओ अॅपद्वारे रेंटल सर्व्हिसचा उपयोग करता येईल.
प्लेबॅक सुरू झाल्यानंतर, ग्राहकांना पूर्ण चित्रपट पाहण्यासाठी 48 तासांचा अवधी दिला जातो. रेंटल सर्व्हिस घेतल्यापासून 30 दिवसांच्या आत चित्रपट कधीही पाहता येऊ शकतो. हा चित्रपट 24 जूनपासून अॅमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शनचा भाग म्हणून देखील उपलब्ध होईल.
हेही वाचा :