Entertainment News Live Updates 25 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jun 2022 08:09 PM
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; सत्तुच्या घरी फुलणार इंद्रा-दीपूचा सुखाचा संसार

Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य देशपांडे सरांसमोर आले असून आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. सत्तुच्या घरी इंद्रा-दीपूचा सुखाचा संसार फुलताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Shahu Chhatrapati : लोकराजाची कथा 'शाहू छत्रपती'... राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर येणार भव्य मराठी सिनेमा; पोस्टर आऊट

Shahu Chhatrapati : गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरत आहेत. आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या (Rajarshi shahu Maharaj) जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 

काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय'; प्रेक्षकांचा मुक्ता बर्वेला पाठिंबा

काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय' (Y) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी हातात मशाल धरलेले मुक्त बर्वेचे एक थरारक पोस्टर झळकले होते. याचा नेमका अर्थ काय, यावर अनेक चर्चाही रंगल्या होत्या. याचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळाले असून या विषयाचे समर्थन करत पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षकांनी या विषयाला, मुक्ताला तिच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय'; प्रेक्षकांचा मुक्ता बर्वेला पाठिंबा

काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय' (Y) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी हातात मशाल धरलेले मुक्त बर्वेचे एक थरारक पोस्टर झळकले होते. याचा नेमका अर्थ काय, यावर अनेक चर्चाही रंगल्या होत्या. याचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळाले असून या विषयाचे समर्थन करत पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षकांनी या विषयाला, मुक्ताला तिच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

'आयफा' पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार; कलर्सवर होणार प्रक्षेपण

 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' (IIFA) सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच हा पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यार बेटावर पार पडला. आता प्रेक्षकांना हा सोहळा घरबसल्या पाहायला मिळणार आहे. आज कलर्स चॅनलवर या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण होणार आहे. 

बॉक्स ऑफिसवर 'जुग जुग जिओ' फारशी जादू दाखवू शकला नाही; कमाईच्या बाबतीत पडला मागे

'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला आहे. या सिनेमात वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकलेला नाही. कमाईच्या बाबतीत हा सिनेमा मागे पडला आहे. 

अरिजित सिंहच्या आवाजाची जादू, 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील बहुप्रतीक्षित गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Phir Na Aisi Raat Aayegi Song Out : 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे बहुप्रतीक्षित गाणे अखेर आज (25 जून) प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर ते आतापर्यंतचे सर्वात भावपूर्ण संगीत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे गायक अरिजित सिंहने गायले आहे. नुकताच अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर अभिनेत्री करीना कपूर-खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये करीना या चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे गाणे दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे असल्याचे, तिने म्हटले आहे.


आमिर खानने टी-सीरीजच्या सोशल मीडिया हँडलवर काही अत्यंत प्रतिभावान भारतीय निर्मात्यांसह लाईव्ह येत हे गाणे रिलीज केले आहे. यावेळी त्याने प्रेम, वियोग आणि तळमळ या मानवी भावनांवर चर्चा केली. अभिनेता आमिर खानने करीना कपूर खानचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने 'फिर ना ऐसी रात आएगी'ला दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे म्हटले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

मनोरंजनविश्वात शाहरूखची ‘तिशी’! ‘पठाण’च्या रिलीज डेटसह शाहरुख खानचा नवा लूक प्रदर्शित!

30 Years Of Shah Rukh Khan: बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने आज मनोरंजन विश्वात आपल्या कारकिर्दीची 30 वर्ष पूर्ण केली आहेत. याच खास निमित्ताने आज त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज मिळाले आहे. शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केल्याबद्दल, अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देत, त्याच्या बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत.


याच निमित्ताने आज त्याचा ‘पठाण’ चित्रपटातील नवा लूक रिलीज झाला आहे. शाहरुख खाननेही सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता हातात बंदूक घेऊन रक्ताने माखलेला शाहरुख खान दिसत आहे. 'पठाण'चे पोस्टर रिलीज करताना शाहरुख खान लिहिले की, '30 वर्षे... तुमचे प्रेम आणि स्मित असीम आहे. आता हा प्रवास 'पठाण'सोबत पुढे जाणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.’


वाचा संपूर्ण बातमी

‘मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहीले!’, एकनाथ शिंदेंसाठी अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट

Sharad Ponkshe : अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे चित्रपट,  मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आपल्या दमदार अभिनयाने ते प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. केवळ अभिनयच नाही तर, आपल्या बेधडक मतांसाठी देखील ते नेहमी चर्चेत असतात. सध्या महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड तापलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे सत्तेचं राजकारण ढवळून निघालं आहे. मात्र, या सगळ्यात आता अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत आली आहे.


शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट लिहित शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. अर्थात ही पोस्ट राजकीय नसली, तरी राजकीय वादळ सुरु असताना त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. शरद पोंक्षे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील त्यांची मतं ते सोशल मीडियावर मांडतात.


वाचा संपूर्ण बातमी

Michael Jackson Death Anniverasary : पॉप जगताचा बादशाह, अवघ्या 50व्या वर्षी घेतला जगाचा निरोप! वाचा मायकल जॅक्सनबद्दल...

Michael Jackson : पॉप जगताचा बादशाह मायकल जॅक्सन (Michael Jackson) याने आजच्याच दिवशी अर्थात 25 जून 2009 रोजी या जगाचा निरोप घेतला होता. आपल्या गाण्यांनी आणि आपल्या नृत्यशैलीने अवघ्या जगाला भुरळ घालणारा मायकल जॅक्सन सगळ्यांचाच लाडका होता. मायकल जॅक्सनचा जन्म 29 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील गॅरी या शहरात झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेला मायकल 1964मध्ये आपल्या भावाच्या पॉप ग्रुपमध्ये सामील झाला. 1982मध्ये त्याचा 'थ्रिलर' अल्बम रिलीज झाल्यावर त्याला जगभरात ओळख मिळाली.


मायकल जॅक्सनने वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्याला 150 वर्ष जगायचं होतं. यासाठी त्यांनी 12 डॉक्टरांची टीम ठेवली होती, जी नेहमी त्याच्यासोबत सावली सारखी असायची. ही टीम त्याची नियमित तपासणी करायची. मायकल जॅक्सनचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचेही बोलले जाते. मायकलने सुंदर दिसण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या, त्या शस्त्रक्रिया देखील त्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याचे बोलले जाते.


वाचा संपूर्ण बातमी

सिद्धार्थ जाधवची लेकीसाठी खास पोस्ट

सिद्धार्थ जाधवची लेकीसाठी खास पोस्ट





घोड्यावर बसून आलेल्या मिका सिंहने जिंकलं तरुणीचं मन, ‘गब्बर’ बनून केलं मनोरंजन!

Swayamvar Mika Di Vohti : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंह (Mika Singh) याचा स्वयंवर शो 'मिका दी वोटी'मध्ये (Swayamvar Mika Di Vohti ) अगदी पहिल्या दिवसापासूनच धमाल होताना दिसत आहे. या शोमध्ये एकूण 12 तरुणी सहभागी झाल्या होत्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी 4 सुंदरींना थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता नव्या एपिसोडमध्ये मिका पुन्हा एकदा तीन तरुणींसोबत डेटवर गेला आहे, ज्यांचा प्रोमो व्हिडीओ चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आला आहे.


स्टार भारत वाहिनीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर 'स्वयंवर - मिका दी वोटी' चा नवा प्रोमो रिलीज केला आहे. या व्हिडीओमध्ये मिका सिंह आणि तीन तरुणी घोड्यावर बसून रपेट मारताना दिसत आहेत. मिका सोबतच या तीन स्पर्धक तरुणी देखील घोडेस्वारीचा आनंद घेत आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा शो रद्द, बुलढाण्यातील प्रेक्षकांची चित्रपटगृह चालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार!

Sarsenapati Hambirrao : अभिनेते प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी मुख्य भूमिका साकारली असून, चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी होताना दिसत आहे. याच विरोधात आवाज उठवत बुलढाण्यातील प्रेक्षकांनी चित्रपटगृह मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.  


प्रेक्षक कमी असल्याचे कारण देत चित्रपटगृह मालकाने ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा शो रद्द केल्याने संतापलेल्या प्रेक्षकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


नेमकं काय झालं?


बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सनी पॅलेस या चित्रपटगृहात ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे शो अजूनही सुरू आहेत. या चित्रपटाचा शो बघण्याचा प्लॅन शहरातील पेशाने वकील असलेल्या दोन मित्रांनी केला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी काल सायंकाळची सहा ते नऊच्या शोची बाल्कनीची तिकिटे त्यांनी आदल्या दिवशी आधीच आरक्षित केली होती. नियोजित वेळेनुसार हे दोघे चित्रपटगृहात सायंकाळी सहा वाजता पोहचले होते. जवळपास साडे सहा वाजेपर्यंत चित्रपटगृहातील बाल्कनीत बसूनही, चित्रपट सुरू का झाला नाही म्हणून चित्रपटगृहाच्या मॅनेजरला विचारणा केली असता, त्याने चित्रपट सुरु न करण्याचे कारण सांगितले. या शोची फक्त दोनच तिकिटे विकली गेली असून, प्रेक्षक नसल्याने हा शो रद्द करण्यात आल्याची माहिती त्याने या प्रेक्षकांना दिली.


प्रसिद्ध मल्याळम अभिनेते व्हीपी खालिद यांचे निधन

ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही मालिका अभिनेते व्हीपी खालिद यांचे शूटिंगच्या ठिकाणीच निधन झाले. खलिद यांचे शुक्रवारी कोट्टायमजवळील वैकोम येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. व्हीपी खालिद हे टोविनो थॉमस यांच्या आगामी चित्रपटावर काम करत होते आणि शूटिंगदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. 70 वर्षीय खालिद ज्युड अँटोनीच्या आगामी प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होते. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.


 

वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण, हटके भूमिकांमधून आफताब शिवदासानीने उमटवला ठसा!

Happy Birthday Aftab Shivdasani: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानी (Aftab Shivdasani) आज (25 जून) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. 25 जून 1978 रोजी मुंबईत जन्मलेल्या आफताबने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहेत. मात्र, सध्या तो मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आफताबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया...


बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानी आज 44 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 25 जून 1978 रोजी मुंबईत झाला. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आफताबने एकापेक्षा एक हिट चित्रपट केले आहेत. आपल्या अभिनयामुळे त्याने इंडस्ट्रीत वेगळे स्थान मिळवले आहे. आफताब बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, त्याचे स्टारडम आजही कायम आहे. मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतरही आफताबचे लाखोंच्या संख्येने चाहते आहेत, जे आजही त्याला तितकेच प्रेम देतात.


वाचा संपूर्ण बातमी

कुटुंबाची परवानगी नसतानाही अभिनयक्षेत्रात आली करिश्मा कपूर! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Karisma Kapoor Birthday : कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. आज (25 जून) ती आपला वाढदिवस साजरा करत आहे. आजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही. अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते. करिश्मा चित्रपटांमुळे चर्चेत राहिलीच, पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.


करिश्माने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून अनेक चाहत्यांची हृदयं तोडली. संजय कपूरसोबतच्या नात्यामुळे अभिनेत्री करिश्मा कपूर चांगलीच चर्चेत आली होती. कुटुंबाची संमती नसतानाही तिने बॉलिवूड विश्वात पदार्पण केले होते.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'ये कहानी है शमशेरा की'; 'शमशेरा' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज


शमशेरा (Shamshera) या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि  संजय दत्त (Sanjay Dutt) अशी तगडी स्टार कास्ट असणारा 'शमशेरा' (Shamshera) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 21 जून रोजी या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज झाला आहे. आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे.


'नेटफ्लिक्स' तोट्यात... 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं


Netflix Lays Off 300 Employees : लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) चक्क 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनीला लागलेली घरघर याला कारणीभूत आहे. नेटफ्लिक्स कंपनीला झालेल्या तोट्यामुळे कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना कामारून कमी केलं आहे. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने गुरुवारी यासंदर्भात माहिती देत सांगितलं आहे की, 'गेला काही काळ कंपनीला नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे, उत्पन्नात घट झाली आहे. आम्ही व्यवसायात लक्षणीय गुंतवणूक करत आहोत. परिणामी आगामी काळात खर्च वाढत जातील. यामुळे कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे.'


किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोणा’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खाननेही केलं कौतुक!


साऊथ स्टार किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeep) बहुप्रतीक्षित चित्रपट 'विक्रांत रोणा' (Vikrant Rona) 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. सुदीप त्याच्या चित्रपटामुळे आधीच चर्चेत आला आहे. त्याच्या चित्रपटाचे पोस्टरच खूपच जबरदस्त होते. या पोस्टर रिलीजपासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वादळी होती. नुकताच या चित्रपटाचा हिंदीतील ट्रेलर रिलीज झाला आहे. बॉलिवूड स्टार सलमान खानने या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर शेअर केला आहे. एका कार्यक्रमात सुदीपने ‘भाईजान’ सलमान खानबद्दल बरेच कौतुक केले होते. यानंतर आता सलमान खानने त्याच्या इंस्टावर चित्रपटाचा हिंदी ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करत सुदीपचे खूप कौतुक केले आहे.


'वुमन लाईक हर'; डिस्कव्हरीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार चार महिलांचा रोमांचक प्रवास


डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. लवकरच 'वुमन लाइक हर' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना चार महिलांचा रोमांचक प्रवास जाणून घेता येणार आहे.


सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाचव्या आठवड्यातही उसळतेय गर्दी


'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आता या सिनेमाने पाचव्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.