एक्स्प्लोर

Happy Birthday Karisma Kapoor : कुटुंबाची परवानगी नसतानाही अभिनयक्षेत्रात आली करिश्मा कपूर! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Karisma Kapoor Birthday : अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. आज (25 जून) ती आपला वाढदिवस साजरा करत आहे.

Karisma Kapoor Birthday : कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. आज (25 जून) ती आपला वाढदिवस साजरा करत आहे. आजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही. अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते. करिश्मा चित्रपटांमुळे चर्चेत राहिलीच, पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.

करिश्माने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून अनेक चाहत्यांची हृदयं तोडली. संजय कपूरसोबतच्या नात्यामुळे अभिनेत्री करिश्मा कपूर चांगलीच चर्चेत आली होती. कुटुंबाची संमती नसतानाही तिने बॉलिवूड विश्वात पदार्पण केले होते.

कुटुंबाकडून झाला होता विरोध?

करिश्मा कपूरने 1991मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. करिश्माने आपल्या कुटुंबाच्या संमतीशिवाय बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अनेकदा करिश्माने ही गोष्ट नाकारली होती. तिने म्हटले होते की, असे काहीच नाही. उलट कपूर घराण्यात सगळ्यांनाच अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. जरा नीतू कपूर आणि बबिता कपूर यांनी लग्नानंतर जर चित्रपटविश्वात काम करणे सोडले असेल, तर तो त्यांचा स्वतःचा निर्णय होता.

अभिषेक बच्चनसोबत जोडले गेले नाव!

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. बच्चन आणि कपूर कुटुंबात चांगले संबंध होते. यामुळे जेव्हा करिश्मा आणि अभिषेकच्या नात्याबद्दल घरच्यांना कळाले, तेव्हा दोघांचाही साखरपुडा पार पडला. त्यानंतर करिश्मा आणि अभिषेक अनेक प्रसंगी एकत्र दिसायला लागले, पण त्यानंतर लवकरच दोघांचे नाते तुटल्याची बातमी आली. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्माची आई बबिता या रिलेशनशिपवर खूश नव्हती. कारण अभिषेकचे करिअर चांगले सुरु नव्हते. त्याचवेळी, काही रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन आणि बबिता या दोघींनाही या नात्यावर आक्षेप होता. यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.

संजयसोबत लग्न आणि घटस्फोट

अभिषेकसोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्षांनी करिश्मा तिचा मित्र संजयसोबत रिलेशनशिपमध्ये होती. संजय कपूर बिझनेसमन होता. दोघांनीही थाटामाटात लग्न केलं, पण लग्नानंतर लगेचच नात्यात दुरावा आला. त्यांचे नाते इतके बिघडले होते की, करिश्माने संजय आणि त्याच्या आईवर अत्याचार, मारहाणीचा आरोप केला होता आणि एफआयआरही केली होती. त्याचवेळी संजय कपूरनेही करिश्मावर अनेक गंभीर आरोप केले होते. यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आता करिश्मा आपल्या मुलांसोबत आणि कपूर कुटुंबासोबत राहत आहे.

संबंधित बातम्या

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Judaa Hoke Bhi Trailer : भयपंटाचा बादशाह विक्रम भट्ट पुन्हा एकदा सज्ज; 'जुदा होके भी'चा ट्रेलर रिलीज

Sarsenapati Hambirrao : सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाचव्या आठवड्यातही उसळतेय गर्दी; प्रविण तरडेंनी केली खास पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Embed widget