एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 25 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 25 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Oscar Nominations 2023: ऑस्करमध्ये आरआरआरचा धमाका!

Oscar Nominations 2023: एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची भुरळ अद्यापही कायम आहे. या चित्रपटातील नाटू नाटू (Natu Natu Songs) या गाण्याला ऑस्करमध्ये (Oscar Nominations 2023) ओरिजनल साँग्स या गटात (Best Score Academy Award)नामांकन मिळालं आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी आरआरआर या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. यामधील नाटू नाटू हे गाणं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. या गाण्याची जादू अद्यापही कायम आहे. या गाण्यावर अनेकजण थिरकले आहेत. आता या गाण्याला ओरिजनल साँग्स या गटात ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे.

Kangana Back on Twitter: ती पुन्हा आली! कंगना रनौत ट्विटरवर परतली

Kangana Ranaut Back on Twitter: बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौत (kangana Ranaut) ट्वीटरवर पुन्हा परतली आहे. कंगना रनौत हिनं ट्वीट करत ट्विटरवर परतल्याचं सांगितलं आहे.  ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कंगना रनौतचं ट्विटर खातं बॅन करण्यात आले होते. आता तब्बल 20 महिन्यानंतर ती पुन्हा ट्वीटरवर परत आली आहे. 

Pathaan : 57 वर्षांचा किंग खान! 30 वर्षांपेक्षा अधिक काळ सिनेविश्वात कार्यरत; आजही चाहत्यांमध्ये शाहरुख खानची क्रेझ

Shah Rukh Khan Pathaan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या तीन दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण तरीही चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. एकीकडे शाहरुखच्या आगामी 'पठाण' (Pathaan) सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना दुसरीकडे मात्र चाहते त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या 30 वर्षांपासून एका पेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा शाहरुख खान गेली चार वर्ष रुपेरी पडद्यापासून लांब होता. पण आता 'पठाण'च्या माध्यमातून तो पुन्हा एकदा चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. 'किंग खान'चा 2018 साली प्रदर्शित झालेला 'झिरो' (Zero) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला होता. त्यानंतर थेट चार वर्षांनी शाहरुख रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. 

18:03 PM (IST)  •  25 Jan 2023

Sai Tamhankar : आज राष्ट्रीय पर्यटन दिनी सई ताम्हणकरची मोठी घोषणा!

Sai Tamhankar : आज 'राष्ट्रीय पर्यटन दिनी' (National Tourism Day) सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) मोठी घोषणा केली आहे. मराठमोळी अभिनेत्री आता जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. सईची 'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' (Postcards From Maharashtra) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

17:24 PM (IST)  •  25 Jan 2023

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर आऊट

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Released : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या रिलीजसोबत 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर आऊट करण्यात आला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

16:18 PM (IST)  •  25 Jan 2023

Pathaan Box Office Collection Day 1 Prediction : 'पठाण'ची उत्सुकता शिगेला

Pathaan Box Office Collection Day 1 Prediction : सिने विश्लेषक रोहित जयसवाल यांच्या ट्वीटनुसार, 'पठाण' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी 56 कोटींची कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर सिने विश्लेषक सुमित कडेलने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपनिंग डेला 'पठाण' 50 कोटींपेक्षा अधिक कमाई करू शकतो. त्यामुळे एकंदरीतच रिलीजच्या पहिल्या दिवशी (Pathaan Box Office Collection) 'पठाण' 50 कोटींचा गल्ला जमवू शकतो. 

15:49 PM (IST)  •  25 Jan 2023

Pathaan Review : पैसा वसूल 'पठाण'; शाहरुख, दीपिका अन् जॉनच्या अॅक्शनने मने जिंकली

Shah Rukh Khan Pathaan Movie Review : 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केलं आहे. शाहरुखचा हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. थरार नाट्यासह या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. शाहरुखसह दीपिका आणि जॉननेदेखील आपल्या अभिनयाने सिनेमाला चार चॉंद लावले आहेत. 

Pathaan Review : पैसा वसूल 'पठाण'; शाहरुख, दीपिका अन् जॉनच्या अॅक्शनने मने जिंकली

14:52 PM (IST)  •  25 Jan 2023

Kangana Ranaut On Twitter : नाव न घेता कंगना रनौतने साधला 'पठाण'वर निशाणा

Kangana Ranaut Takes A Dig On Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तब्बल दीड वर्षानंतर ट्विटरवर पुन्हा आली आहे. ट्विटरवर पुनरागमन करत कंगनाने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. कंगनाने कोणाचेही नाव घेतले नसले तरी तिचे ट्विट पाहता शाहरुख खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पठाण चित्रपटावर निशाणा साधल्याचं दिसतंय. आज शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget