(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pathaan Review : पैसा वसूल 'पठाण'; शाहरुख, दीपिका अन् जॉनच्या अॅक्शनने मने जिंकली
Pathaan Movie Review : शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे.
Siddharth Anand
शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम
Shah Rukh Khan Pathaan Movie Review : 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केलं आहे. शाहरुखचा हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. थरार नाट्यासह या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. शाहरुखसह दीपिका आणि जॉननेदेखील आपल्या अभिनयाने सिनेमाला चार चॉंद लावले आहेत.
'पठाण'ची कथा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी आहे. देशाच्या बरबादीची स्वप्न पाहणारा एक दहशतवादी गट आणि त्यांच्या मतांना दुय्यम स्थान देणाऱ्या एजंटमधील चकमक आणि त्याला अपेक्षित शेवट. या सिनेमात भारत-पाकिस्तान आणि धर्म हे काही मुद्दे जाणूनबुजून अधोरेखित करण्यात आले आहेत. मिशन पूर्ण करण्यासाठी दीपिका पादुकोणदेखील ज्याप्रकारे शाहरुखची मदत करते ते वाखाण्याजोगे आहे. तर दुसरीकडे जॉन अब्राहम शाहरुख आणि दीपिकावर भारी पडला आहे.
पैसा वसूल 'पठाण'!
'पठाण'ची कथा जुनीच असली तरी नव्याने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिद्धार्थ आनंदने खूप चांगल्याप्रकारे या सिनेमाची बांधणी केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये शाहरुखची झलक पाहण्याजोगी आहे. सिनेमातील अॅक्शन, ट्वीस्ट खूपच मनोरंजनात्मक आहेत. सिनेमाचा पहिला भाग थोडा कंटाळवाणा असला तरी दुसऱ्या भागाने मात्र प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे. त्यामुळे एकंदरीतच 'पठाण' हा सिनेमा पैसावसुल आहे.
शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा कौटुंबिक सिनेमा आहे. या सिनेमातील गाण्यांनीदेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कलाकारांचा कमाल अभिनय, उत्तम एडिटिंग, वाखाण्याजोगं दिग्दर्शन यासगळ्या गोष्टींमुळे 'पठाण' हा सिनेमा उजवा ठरत आहे.
शाहरुखचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता चार वर्षांनी 'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून किंग खान रुपेरी पडद्यावर झळकत आहे. जगभरात किंग खानचा चाहतावर्ग आहे. 'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने कमबॅक केलं असून त्याच्या या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. पण तरीही चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कायम आहे.
'पठाण' या बहुचर्चित सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत आहे. तर दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमदेखील (John Abrham) महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. तसेच सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संबंधित बातम्या