Entertainment News Live Updates 24 July: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jul 2022 07:01 PM
The Sandman Trailer : 'द सॅंडमॅन'चा ट्रेलर आऊट

Netflix The Sandman Trailer : नेटफ्लिक्सवर (Netflix) नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. अशाच वेगळ्या विषयावर भाष्य करणारी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द सॅंडमॅन' (The Sandman) असे या वेबसीरिजचे नाव आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

SRK's Mannat Pics : गौरी खानने चाहत्यांना दाखवली मन्नतची झलक

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानप्रमाणेच (Shah Rukh Khan) गौरी खानदेखील (Gauri Khan) लोकप्रिय आहे. गौरी खान सिनेमांत काम करत नसली तरी ती बॉलिवूडची एक नामांकित इंटीरियर डिजायनर आहे. तसेच ती शाहरुखच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊसचे कामदेखील सांभाळते. 'मन्नत'चा एक-एक कोपरा गौरीने सजवला आहे. अशातच आता गौरीने 'मन्नत'मधील काही फोटो शेअर करत चाहत्यांना 'मन्नत'ची झलक दाखवली आहे.





KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती 14'चा 7 ऑगस्टला होणार प्रीमियर

Kaun Banega Crorepati 14 Premier Date : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या लोकप्रिय कार्यक्रमाचा प्रीमियर 7 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी प्रीमियरला हजेरी लावणार आहेत. 



मराठी मालिकांचा रंगणार एक तासाचा विशेष भाग

'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) आणि 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) या दोन्ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. आज रविवारी या दोन्ही मालिकांचा एक तासाचा विशेष भाग होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव बांधावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक जिल्हा प्रशासनाला निर्देश

मुंबई  - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह इतर अधिकारी यांनी आज पाहणी केली. या पाहणीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी मागवून घेतला होता. त्यानुसार लगेचच पाऊले उचलत नवीन पुलाच्या उभारणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सावरपाडा गावातील गावकऱ्यांच्या पूल, रस्ते आदी समस्यांची गंभीरपणे दख़ल घेतली जाईल.  पुढील काही दिवसांत गावांत सकारात्मक बदल दिसतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी गावकऱ्यांना दिला आहे.

‘त्याचं फोटोशूट, त्याची मर्जी’, रणवीर सिंहच्या न्यूड फूटशूटवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया

Arjun On Ranveer Photoshoot: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने न्यूड फोटोशूट करत इंटरनेटवर चांगलाच गदारोळ माजवला होता. रणवीर सिंहने 'पेपर' मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे रणवीर सिंह चर्चेत आला आहे. रणवीरचे हे फोटो पाहून काही लोकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर, काहींनी त्याला खूप ट्रोल देखील केले आणि त्याच्यावर बरेच मीम्स देखील बनवले आहेत. आता रणवीरला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये अभिनेत्यांच्या यादीत अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) नावाचाही समावेश झाला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

‘ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर’च्या टीझरमध्ये दिसली चॅडविक बोसमनची झलक

Black Panther : Wakanda Forever : ‘ब्लॅक पँथर’च्या (Black Panther) चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर'चा  (Black Panther : Wakanda Forever) ट्रेलर रिलीज झाला आहे. मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'ब्लॅक पँथर’ हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे, जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पँथरच्या पात्रावर आधारित आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर' हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Bunny : 'बनी' देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये!

Bunny : निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित–दिग्दर्शित 'बनी' (Bunny) या चित्रपटाचा फर्स्टलूक 75व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये 'बनी'च्या प्रवेशिका सादर करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी ढाका येथील प्रसिद्ध 'सिनेमेकिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' निवड झाल्यानंतर स्पेन येथील जगप्रसिद्ध 'माद्रिद' आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी या चित्रपटाची निवड झाली.


वाचा संपूर्ण बातमी

Deepesh Bhan Last Post: सोशल मीडियावरही लोकांना हसवलं, ‘भाभीजी घर पर है’ फेम दीपेश भानची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल!

Deepesh Bhan Last Post: छोट्या पडद्यावरील ‘भाभीजी घर पर है’ (Bhabi ji Ghar Par Hai) या मालिकेतील ‘मलखान’ हे लोकप्रिय पात्र साकारणारे अभिनेते दीपेश भान (Deepesh Bhan) यांचे काल (23 जुलै) निधन झाले. दिपेशच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. दीपेशच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ‘भाभीजी घर पर है’ या शोमध्ये दीपेश ‘मलखान’च्या भूमिकेत दिसले होता. आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणाऱ्या दीपेशच्या जाण्याने सगळेच दुःखी झाले आहेत. दरम्यान आता त्यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Vivek Agnihotri: राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चं नावही नाही! दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात...

Vivek Agnihorti: नुकतीच 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68 National Film Award) घोषणा झाली आहे. यंदा साऊथचा लोकप्रिय अभिनेता सूर्या (Suriya) आणि बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान मिळाला आहे. तर, अभिनेता सूर्याच्या ‘सूरराय पोटरु’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळावला आहे. या पुरस्कारांमध्ये बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला एकही पुरस्कार मिळालेला नाही. यावर आता चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आर. माधवनचा 'रॉकेट्री' ओटीटीवर होणार रिलीज

Rocketry OTT Release : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा चर्चेत आला होता. 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. 


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आर. माधवनचा 'रॉकेट्री' ओटीटीवर होणार रिलीज


बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन सध्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा चर्चेत आला होता. 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.


अमिताभ बच्चनच्या 'गुडबाय'ची रिलीज डेट जाहीर


अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना सध्या 'गुडबाय' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांचा 'गुडबाय' हा सिनेमा 7 ऑक्टोबर 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.


विनाकारण ट्रोल करू नका; रणवीर भावाला 'व्हिलन'चा सपोर्ट


बॉलिवूडचा बाजीराव अर्थात अभिनेता रणवीर सिंह सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर रणवीरचे न्यूड फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकरी एकीकडे रणवीरचे कौतुक करत आहेत तर दुसरीकडे त्याच्यावर टीकादेखील करत आहेत. मात्र अभिनेता अर्जुन कपूरने रणवीरला पाठिंबा दिला आहे.


‘डंकी’च्या चित्रीकरणासाठी ‘किंग’ शाहरुख खान लंडनमध्ये!


बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान याने एप्रिलमध्येच त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'डंकी'ची घोषणा केली होती. अभिनेत्याच्या या घोषणेनंतर त्याचे चाहते आणि प्रेक्षक खुश झाले होते. त्याच्या या आगामी चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू झाले असून, शाहरुख खान या चित्रपटाच्या सीक्वन्स शूट करण्यासाठी लंडनला पोहोचला आहे. नुकतेच त्याच्या या शूटच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटातील अभिनेता शाहरुख खान याचा हा लूक पाहून चाहते खुश झाले आहे.


'भाभीजी घर पर है' फेम अभिनेता दीपेश भान यांचे निधन


‘भाभी जी घर पर हैं’या मालिकेत ‘मलखान’ची भूमिका साकारणारे अभिनेते दीपेश भान यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपेश क्रिकेट खेळत होते आणि अचानक बेशुद्ध होऊन पडले. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सोशल मीडियावर ‘मलखान’च्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता दीपेश भान यांच्या निधनाने अवघ्या टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.