धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली

राज्यातील जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जळगावमधील रेल्वे अपघाताची ही घटना ताजी असताना आता जालना जिल्ह्यात चक्क रेल्वे ट्रॅकवर ट्रक उभा करुन चालकाने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नांदेड-तपोवन एक्सप्रेस समोर अज्ञात आरोपीकडून रेल्वे ट्रॅकवरच ट्रक आडवा लावण्यात आला होता. विशेष म्हणजे ट्रक आडवा लावून वाहनचालकाने धूम ठोकली होती. त्यामुळे, नेमकं प्रकरण काय हे समजू शकलं नाही.
तपोवन एक्सप्रेसमधील लोको पायलटने प्रसंगसावधान राखत वेळीच ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. अज्ञात आरोपी ट्रकचालक फरार असून स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
जालना जिल्ह्यातील सारवाडी येथील ही घटना असून या घटनेचे फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. दरम्यान, रेल्वे लोको पालयटने ट्रकला पाहून रेल्वे थांबवली होती.
मुंबईवरून नांदेडकडे जाणाऱ्या तपून एक्सप्रेस समोर ट्रक आडवा लावण्यात आला होता. अखेर, स्थानिकांच्या मदतीने तो ट्रक बाजुला करण्यात आला असून तपोवन एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली आहे
दरम्यान, रेल्वे पोलीस व प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेऊन ट्रकच्या मालकाचा व ड्रायव्हरचा शोध घेतला जात आहे.