(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vivek Agnihotri: राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चं नावही नाही! दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात...
Vivek Agnihotri: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला एकही पुरस्कार मिळालेला नाही.
Vivek Agnihorti: नुकतीच 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68 National Film Award) घोषणा झाली आहे. यंदा साऊथचा लोकप्रिय अभिनेता सूर्या (Suriya) आणि बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान मिळाला आहे. तर, अभिनेता सूर्याच्या ‘सूरराय पोटरु’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळावला आहे. या पुरस्कारांमध्ये बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला एकही पुरस्कार मिळालेला नाही. यावर आता चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणार ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले होते. सर्वत्र या चित्रपटाचा बोलबाला होता. भारतच नव्हे, परदेशातही या चित्रपटाने बरीच चर्चा निर्माण केली होती. मात्र, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराला गवसणी घालण्यात तो कमी पडला. नुकतीच या पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाल्यावर, ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीत करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत लिहिले की, ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यश मिळवल्याबद्दल सूरराई पोटरु, सूर्या, अपर्णा बालमुरली, सुधा कोंगारा आणि अजय देवगण यांचे खूप अभिनंदन. साऊथ सिनेमासाठी सध्या चांगले दिवस आहेत. त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीला अधिक मेहनत करण्याची गरज आहे.’
पाहा पोस्ट :
माहिती आणि प्रसारण मंत्रालय शुक्रवारी (22 जुलै) 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) घोषणा केली आहे. दरवर्षी हे पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट निवडक चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलाकारांना दिले जातात. या कार्यक्रमात अनेक चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार देण्यात येतात. नुकताच 68वा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट सोहळा नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. अनेक मराठी, दक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांनी या पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.
संबंधित बातम्या