(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Entertainment News Live Updates 23 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Manasi Naik: मानसी नाईककडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल, विभक्त होण्याच्या चर्चेवर पहिल्यांदाच सोडलं मौन
हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर घटस्फोटाच्या सुरु असलेल्या चर्चेबाबत मानसीनं सांगितलं, 'हे खरं आहे. मी याबाबत खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, त्याची प्रक्रिया सध्या होत आहे. मी सध्या खूप भावूक झाले आहे.' पुढे तिनं सांगितलं, 'काय चूक झाली, याबाबत मी काही सांगू शकत नाही. हे सर्व खूप लवकर घडले. माझा अजूनही प्रेमावर विश्वास आहे, मला पुन्हा प्रेम करायचे आहे. एक काळ असा होता की मला कुटुंब हवे होते आणि मग मी लग्न केले. अर्थात, ते खूप लवकर घडले त्यामुळे मला वाटते की हे सर्व तिथेच चुकले. माझ्यासाठी या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. मला त्यांच्या (प्रदीप खरेरा) कुटुंबाबद्दल आणि त्यांच्याबद्दल खरोखर आदर आहे. पण एक स्त्री म्हणून मला स्वाभिमान आहे.' पुढे मानसीनं सांगितलं की, सध्या ती करिअरकडे लक्ष केंद्रित करणार आहे.
Shehzada Teaser: कार्तिक आणि क्रितीच्या 'शहजादा' चा टीझर रिलीज
Shehzada Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. कार्तिकच्या भूल भूलैया-2 या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच तिचा त्याचा 'शहजादा' (Shehzada) हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकताच 'शहजादा' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : नाटक, सिनेमे, वेबसीरिज कितीही आल्या तरी छोट्या पडद्याची गंमत निराळी आहे. सध्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) असं या मालिकेचं नाव आहे. घराघरात घडणारी सासू सूनांची भांडणं विनोदी पद्धतीने या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सासू सुनेच्या नात्यामध्ये येणारे तीढे विनोदी ढंगाने सोडवत हसत खेळत जगताना त्यांच्यातल्या नात्याची वीण घट्ट होत जाते. घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणाना विनोदाच्या आरशात बघण्याची संधी ही गोष्ट प्रेक्षकांना मिळवून देईल. 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई' ही मालिका प्रेक्षकांना 21 डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 10 वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
Pooja Bhatt: सेलिब्रेटींना पैसे देऊन भारत जोडो यात्रेत आणलं? आरोपानंतर नितेश राणेंना पूजा भटने सुनावले...
Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी नुकताच भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. तसेच अभिनेत्री पूजा भट (Pooja Bhatt), रश्मी देसाई (Rashami Desai) यांनी देखील या यात्रेमध्ये सहभाग घेतला. आता नितेश राणे यांनी एक ट्वीट करुन भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींवर आरोप केला आहेत. या सेलिब्रिटींना भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे दिले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी एक ट्वीट शेअर करुन केला आहे.
“They're certainly entitled to think that, and they're entitled to full respect for their opinions... but before I can live with other folks I've got to live with myself. The one thing that doesn't abide by majority rule is a person's conscience.”
— Pooja Bhatt (@PoojaB1972) November 22, 2022
Harper Lee pic.twitter.com/F1hbBfGf87
IFFI 2022 : 'द कश्मीर फाइल्सच्या स्क्रीनिंगला अनुपम खेर यांची हजेरी
Anupam Kher In IFFI 2022 : 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival 2022) गोव्यात सुरू आहे. या महोत्सवात अनेक सिनेमे दाखवले जात आहेत. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बहुचर्चित 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या उपस्थितीत या सिनेमाचं स्क्रीनिंग पार पडलं.
View this post on Instagram
Annu Kapoor : ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांची फसवणूक करणाऱ्याला बिहारमधून अटक
Annu Kapoor : भारतीय सिनेृसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर (Annu Kapoor) यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीने कपूर यांची 4.46 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दुसरीकडे 3.08 लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
Aindrila Sharma: अँड्रिलाला शेवटचं पाहताना प्रियकराचा भावनांचा बांध फुटला; व्हायरल व्हिडीओनं चाहतेही स्तब्ध
Aindrila Sharma Sabyasachi Chowdhury: अभिनेत्री अँड्रिला शर्माचं (Aindrila Sharma) 20 नोव्हेंबर रोजी निधन झालं. तिनं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अँड्रिलाची प्रकृती चिंताजनक होती. तिला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कार्डियेक अरेस्ट आल्यानं अँड्रिला शर्माचं निधन झालं. अँड्रिलाच्या निधनानं बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अँड्रिलाचा प्रियकर सब्याचीसा चौधरी हा अँड्रिलाला अखेरचा निरोप देताना दिसत आहे.
View this post on Instagram
Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली लेकीची पहिली झलक
Priyanka Chopra : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. आई झाल्यापासून ती लेकीसंबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्रियांकाने तिची लेक 'मालती मेरी चोप्रा जोनास'ची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.