एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 22 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 22 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Suchandra Dasgupta : बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दास गुप्ताचं रस्ते अपघातात निधन

Suchandra Dasgupta Death : बंगाली मालिकांमध्ये काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री सुचंद्रा दास गुप्ताचं (Suchandra Dasgupta) निधन झालं आहे. रस्ते अपघातात अभिनेत्रीचं निधन झालं आहे. सुचंद्राच्या निधनाने बंगाली मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी रात्री सुचंद्रा दासगुप्ता एका बाईकवरुन शूटिंग करुन घरी परतत होत्या. दरम्यान बारानगर पोलीस ठाण्याच्या घोसपाडाजवळ एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बीटी रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पण नंतर पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली. आता ट्रक चालकालाही पोलिसांनी अटक केली आहे. 

Aaliya Kashyap : अनुराग कश्यपच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा

Aaliyah Kashyap Gets Engaged To Shane Gregoire : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक (Anurag Kashyap) आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) सध्या चर्चेत आहे. आलियाने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. बॉयफ्रेंडसोबतचा रोमॅंटिक फोटो शेअर करत तिने यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.  आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आता आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आलियाने तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरेसोबत (Shane Gregoire) गुपचूप साखरपुडा उरकला आहे. आलिया गेल्या काही दिवसांपासून शेन ग्रेगोइरेसोबतचे फोटो शेअर करत होती. 

Salman Khan : 'Tiger 3'च्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्यानंतर सलमानने शेअर केला नवा फोटो; चाहते म्हणाले,"टायगर इज बॅक"

Salman Khan New Photo : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. दोन दिवसांपूर्वी त्याने 'टायगर 3'च्या (Tiger 3) शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. अशातच आता भाईजानने आणखी एक फोटो शेअर केला आहे. त्याचा नवा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 

13:43 PM (IST)  •  22 May 2023

Akash Thosar : नाद करायचा नाय! आकाश ठोसर रमला शेतीच्या कामात

Akash Thosar Video : अभिनेता आकाश ठोसरला (Akash Thosar) 'सैराट' (Sairat) या सिनेमाच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता आकाश ठोसरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आकाश ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Akash Thosar (@akashthosar)

12:35 PM (IST)  •  22 May 2023

Ankur Wadhave : "लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून...";'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेची पत्नीसाठी खास पोस्ट

Ankur Wadhave : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहेचलेला अभिनेता अंकुर वाढवेला (Ankur Wadhave) अल्पावधीतच प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. अंकुर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट लिहिली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official)

12:35 PM (IST)  •  22 May 2023

Sara Ali Khan : सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफ दर्ग्यात

Sara Ali Khan Zara Hatke Zara Bachke : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सारा सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं प्रमोशन करत असून आता या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिने राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

10:32 AM (IST)  •  22 May 2023

Cannes 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये सिने-समीक्षक अशोक राणेंना पुरस्कार

Ashok Rane Cannes Film Festival 2023 : सिनेसृष्टीतील मानाचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' (Cannes Film Festival) सध्या फ्रान्समध्ये पार पडत आहे. या फेस्टिव्हलदरम्यान सिने-समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणेंना (Ashok Rane) यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' (Satyajit Ray Memorical Awards 2023) प्रदान करण्यात आला आहे. 'फिप्रेस्की' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षा इसाबेल डॅनल यांच्या हस्ते अशोक राणे यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. 

10:22 AM (IST)  •  22 May 2023

Cannes 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये अशोक राणेंना पुरस्कार

Ashok Rane Cannes Film Festival 2023 : सिनेसृष्टीतील मानाचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' (Cannes Film Festival) सध्या फ्रान्समध्ये पार पडत आहे. या फेस्टिव्हलदरम्यान सिने-समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणेंना (Ashok Rane) यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' (Satyajit Ray Memorical Awards 2023) प्रदान करण्यात आला आहे. 'फिप्रेस्की' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षा इसाबेल डॅनल यांच्या हस्ते अशोक राणे यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखीBeed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Beed Crime: बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत विवाहितेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Embed widget