Entertainment News Live Updates 21 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
KL Rahul Wedding: आथिया-राहुलच्या लग्नाला कोण कोण येणार?
आथिया आणि राहुल या लव्हबर्डच्या लग्नाला कोण कोण येणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेय. अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सलमान खान, शाहरुख खान, विराट कोहली, अर्जुन कपूर लग्नाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. सुनील शेट्टीचे जवळच्या लोकांचं खंडाळ्याला येणं-जाणं सुरु झालं आहे. 21 जानेवारीपासून लग्नाच्या विधीला सुरुवात होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या शाही विवाहात संगीत, हळदी, लेडीज नाइट.. होणार आहे. सुनील शेट्टीने लग्नाला येणाऱ्यांसाठी शानदार सोय केली आहे. अथिया आणि केएल राहुलच्या हळद, मेहेंदी आणि संगीत सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 21 आणि 22 जानेवारीला हळद, मेहेंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 23 जानेवारीला अथिया आणि केएल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
Tamannaah Bhatia: रजनिकांत यांच्या 'जेलर'मधील तमन्नाचा किलर लूक पाहिलात?
Tamannaah Bhatia: प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही बाहुबली-2 (Baahubali 2) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. बाहुबली-2 मुळे तमन्नाला विशेष लोकप्रियता मिळाली. तमन्नाने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता ती लवकरच जेलर (Jailer) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तमन्नाने जेलर या चित्रपटातील तिच्या किलर लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तसेच तमन्नाने या चित्रपटामधील इतर कलाकारांच्या लूकचे देखील फोटो शेअर केले आहेत. तमन्नाने हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'शेवटी मी हे तुम्हा सर्वांसोबत शेअर करु शकले. थलायवा रजनिकांत आणि नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या जेलर या चित्रपटाचा एक भाग होऊन मला खूप आनंद होत आहे.' तमन्नाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Pathaan Ticket Booking : रिलीजआधीच 'पठाण'ची हवा; 19 जानेवारीपर्यंत तब्बल एवढ्या तिकीटांचं अॅडव्हान्स बुकिंग
Pathaan Ticket Booking : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पठाण चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगची माहिती तरण आदर्श यांनी ट्वीट शेअर करुन दिली आहे.
अनंत अंबानीच्या साखरपुड्यात ऐश्वर्या राय बच्चन अन् आराध्याने वेधलं सर्वांचं लक्ष
Anant Radhika Engagement : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. पण या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिची लेक आराध्याने (Aaradhya Bachchan) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
View this post on Instagram
Kantara 2 : ऋषभ शेट्टीने केली 'कांतारा 2' च्या तयारीला सुरुवात
Rishab Shetty Kantara 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (Kantara) हा सिनेमा चांगलाच गाजला. अल्पावधीतच हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता या सिनेमाच्या यशानंतर ऋषभने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'कांतारा 2'च्या (Kantara 2) तयारीला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेनने खरेदी केली New Mercedes Benz कार
Sushmita Sen : शनिवारी सुष्मिता सेनने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर (Instagram Account) नवीन पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून सुष्मिता सेनने चाहत्यांना तिच्या नवीन कारच्या खरेदीची माहिती दिली आहे. सुष्मिता सेनने तिच्या इन्स्टा पोस्टवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुष्मिता तिच्या नवीन मर्सिडीज बेंझबरोबर ब्लँक कलरचा ड्रेस मॅच केला आहे. सुष्मिता सेनच्या या कारचे मॉडेल Mercedes Benz GLE Coupe Mercedes-AMG आहे. या कारची किंमत (Car Price) तब्बल 1.64 कोटी आहे. सुष्मिता सेनने स्वतःला ही अनोखी भेट दिली आहे.
View this post on Instagram
Kantara 2 : ऋषभ शेट्टीने केली 'कांतारा 2' च्या तयारीला सुरुवात
Rishab Shetty Kantara 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (Kantara) हा सिनेमा चांगलाच गाजला. अल्पावधीतच हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता या सिनेमाच्या यशानंतर ऋषभने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'कांतारा 2'च्या (Kantara 2) तयारीला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवने केली नव्या सिनेमाची घोषणा
Siddharth Jadhav On Three Cheers : अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'सर्कस' (Circus) सिनेमानंतर सिद्धार्थ आता एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आपल्या सिद्धू'ने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
View this post on Instagram