Entertainment News Live Updates 2 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Aug 2022 06:31 PM
Siya : 'हमें न्याय चाहिए...'सिया'चे पोस्टर आऊट

Siya : 'सिया' (Siya) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. विनीत कुमार सिंह आणि पूजा पांडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मनीष मुंद्रा सांभाळणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मनीष मुंद्रा (Manish Mundra) दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.

'लाल सिंह चड्ढा'चे नवे पोस्टर आऊट

'लाल सिंह चड्ढा'च्या नव्या पोस्टरमध्ये आमिर खान एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. पोस्टरमध्ये आमिरचा चेहरा दिसण्याऐवजी त्याचे पाय दिसत आहेत. आमिरच्या बूटांवर फोकस करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं आहे,"मेरी मम्मी कहती थी, जूतें बन्दे दा आयडेंटिटी कार्ड होंदे है". 

Koffee With Karan : कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडमध्ये करीना उडवणार आमिरची खल्ली; प्रोमो व्हायरल

Koffee With Karan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण या चॅट शोच्या सातव्या सिझनला (Koffee With Karan 7) प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आता या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हे हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ नुकताच करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


वाचा सविस्तर बातमी 


 

Jaani : पंजाबी गायक जानीची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

Jaani : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि गीतकार जानीनं (Jaani) पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. जानीचं असं मत आहे की, त्याच्या जीवाला धोका आहे. त्याला फोनवरुन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत, असंही त्याचं मत आहे. जानीनं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. जानीनं पत्रात लिहिलं की, त्यानं आधीच आपले कुटुंब परदेशात शिफ्ट केले आहे आणि त्याच्या मॅनेजरच्या जीवाला देखील धोका आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

भूमिकेसाठी काही पण! प्रोमोशूटसाठी ‘फुलाला सुगंध माती’चा फेम कीर्तीची तारेवरची कसरत

Phulala Sugandh Maticha: स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) मालिकेत सध्या कीर्तीची नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत सुरु आहे. आयपीएस ऑफिसर बनण्याचं कीर्तीचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी आता तिची कसोटी सुरु आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांचा शोध घेताना कीर्तीने याआधी आपलं शौर्य दाखवलंच आहे. खास बात म्हणजे ट्रेनिंगपासून ते मालिकेतले हे धाडसी प्रसंग साकारताना कीर्तीने बॉडी डबलचा वापर न करता स्वत: हे फाईट सीक्वेन्स पूर्ण केले आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

दिया मिर्झाच्या भाचीचं निधन; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली, 'माझा जीव...'

Dia Mirza : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza) काल (01जुलै) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं तिच्या भाचीच्या निधनाची माहिती दिली आहे. दिया मिर्झाची भाची तान्या काकडेचं निधन झालं आहे. तान्यानं 21 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, एका कार अपघातामध्ये तान्याचं निधन झालं. दियानं सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


वाचा संपूर्ण बातमी

महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण, तीन शिक्षिकांनी मिळून संभाळली ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाची धुरा!

Preet Adhuri  : ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, असे महाराष्ट्र सरकारचे ब्रीदवाक्य सरकारच्या शिक्षणाबद्दलची आस्था दर्शवते. मुलगी शिकल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात अनेक महिला आघाडीवर दिसताहेत आणि त्यात मनोरंजनसृष्टीही मागे नाही. ‘प्रीत अधुरी’ नावाचा एक मराठी चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियांकाने केले असून, ती पेशाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आहे. याची निर्मिती स्वप्नाली हर्षल पवार यांनी केली असून, त्याही शिक्षिका आहेत. इतकंच नव्हे, तर या दोन महिला शिक्षिकांच्या पंखांना आर्थिक बळ देण्यासाठी अजून एक शिक्षिकाच पुढे सरसावल्या, त्या म्हणजे जिल्हा परिषद शिक्षिका श्रीमती बेबीताई यशवंत वाडकर. या तिघी ‘महिला सक्षमीकरणा’चे उत्तम उदाहरण ठरल्या आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

Maharani Season 2 Trailer : 'ये नया बिहार है'; 'महारानी-2' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Maharani Season 2 Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीनं (Huma Qureshi) मोठ्या पडद्याबरोबरच ओटीटीवर देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. तिच्या 'महारानी' (Maharani) या सीरिजनं प्रेक्षकांची पसंती मिळवली. गेल्या वर्षी या सीरिजचा पहिला सिझन रिलीज झाला होता. आता या सीरिजचा आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. महारानी-2 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत, आता या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील हुमाच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सीरिजमध्ये राजकारण आणि क्राइम या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत, असं ट्रेलर पाहून कळत आहे. 


पाहा ट्रेलर: 


नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जान्हवी कपूर सज्ज

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरकडे (Janhvi Kapoor) सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. नुकताच तिचा ‘गुडलक जेरी’ (Good Luck Jerry) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘गुडलक जेरी’ रिलीज होतो तोच जान्हवीने तिच्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. नुकताच तिने एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली. अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr And Mrs Mahi) चित्रपटाच्या तयारीत व्यस्त झाली आहे. या चित्रपटात ती महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच जान्हवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

‘लायगर’ अन् ‘टायगर’ एकाच मंचावर!

Liger : साऊथ सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आगामी ‘लायगर’ (Liger) या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे देशातील विविध शहरांमध्ये जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. याच प्रमोशन दरम्यान, विजय मेगा स्टार चिरंजीवीच्या (Chiranjeevi) आगामी 'गॉडफादर' (Godfather) चित्रपटाच्या सेटवर पोहोचला. या चित्रपटाच्या सेटवर त्याची भेट बॉलिवूडचा ‘टायगर’ अर्थात अभिनेता सलमान खानशी (Salman Khan) झाली.


वाचा संपूर्ण बातमी

‘समंथा आणि मी आता आयुष्यात पुढे सरकलो आहोत’, पहिल्यांदाच घटस्फोटावर नागा चैतन्यने मोकळं केलं मन!

Naga Chaitanya-Samantha Divorce : साऊथ विश्वातील दोन प्रसिद्ध नावं म्हणजे अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu). दोघांची रील आणि रियल लाईफ जोडी चाहत्यांची अतिशय लाडकी होती. मात्र, गतवर्षी या दोघांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. या घटस्फोटामुळे चाहते प्रचंड नाराज झाले होते. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने घटस्फोटानंतर आपल्या नात्यावर अनेकदा वक्तव्य केली होती. मात्र, नागा चैतन्यने या बाबतीत नेहमीच मौन बाळगले होते. मात्र, आता नागा चैतन्यने देखील यावर भाष्य केलं आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'टाइमपास 3' वादाच्या भोवऱ्यात


'टाइमपास 3' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. काहींना हा सिनेमा आवडत आहे. तर काही जण या सिनेमात काहीही नाविण्य नसल्याचे म्हणत आहेत. अशातच या सिनेमातील एका दृश्यावर आक्षेप नोंदवला जात आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.


जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानला कडेकोट सुरक्षा


काही दिवसांपूर्वी  बॉलिवूडचा 'भाईजान' अशी ओळख असणाऱ्या सलमान खानला आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमानला हे धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.  धमकीचं पत्र मिळाल्यानंतर आता सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नुकताच सलमानला मुंबई पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला आहे.


मराठमोळ्या अमृता सुभाषची बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये भरारी


सध्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे चित्रपट आणि लुघपट प्रेक्षक आवडीनं बघतात. ओटीटीवर आणि छोट्या पडद्यावर अनेक वेळा काही शॉर्ट फिल्म्स लोक पाहतात. या लुघपटांचे कथानक प्रेक्षकांना आवडते. आता एका मराठी लघुपटाचे स्क्रिनिंग थेट कॅलिफोर्नियामधील लॉस एंजलिसमध्ये होणार आहे. मासा या शॉर्ट फिल्मची निवड Hollywood International Diversity Film Festival मध्ये झाली आहे. 


'भूल भुलैया 2'नंतर कार्तिक-कियाराची जोडी दिसणार 'सत्य प्रेम की कथा' सिनेमात


बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'सत्य प्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक-कियाराची जोडी याआधी 'भूल भुलैया 2' या सिनेमात दिसून आली होती. या सिनेमात दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे प्रेक्षकांना आता 'सत्य प्रेम की कथा' या सिनेमाची उत्सुकता आहे.


विक्रांत रोणाला चाहत्यांना तुफान प्रतिसाद


नुकताच रिलीज झालेला 'विक्रांत रोणा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाचे अवघ्या चार दिवसांतील कलेक्शन पाहता, हा चित्रपट नक्कीच मोठा विक्रम करू शकेल, असा अंदाज बांधला जात आहे. किच्चा सुदीप , जॅकलिन फर्नांडिस, निरुप भंडारी आणि नीता अशोक स्टारर ‘विक्रांत रोणा’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.