एक्स्प्लोर

Jaani Accident: 'पछताओगे' फेम प्रसिद्ध पंजाबी गायक-गीतकार जानी यांच्या गाडीचा भीषण अपघात, पोस्ट लिहिती दिली माहिती!

Jaani Accident : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि गीतकार जानी (Jaani) यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे.

Jaani Accident : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि गीतकार जानी (Jaani) यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. जानी आणि त्यांचा मित्र कामानिमित्ताने प्रवास करत असताना हा अपघात घडला आहे. मोहालीमध्ये त्यांची एसयूव्ही दुसऱ्या एका कारला धडकली आणि पलटी झाली. या अपघातात जानीसह इतर दोन जण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या तिघांचीही प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दोन गाड्यांमधील ही धडक इतकी जोरदार होती की, जानी यांची कार उलटली झाली. मात्र, एअरबॅग्ज असल्याने त्यांचा जीव वाचला. जानी आणि इतर दोघांना सध्या मोहाली येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे, तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. जानी यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असली, तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यासोबत असलेले अन्य दोघेही जखमी झाले. तर, दुसऱ्या गाडीतील प्रवासी सुखरूप आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट लिहित दिली माहिती

यानंतर आता स्वत: जानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर अपघाताची बातमी शेअर केली आहे. या भीषण अपघाताचे वर्णन करताना त्यांनी लिहिले की, ‘आज मी माझ्या डोळ्यांनी मृत्यू पाहिला, मग बाबा नानक पाहिले. आज मी देव आणि मृत्यू एकत्र पहिला… मी आणि माझे मित्र ठीक आहोत… फक्त काही किरकोळ जखमा झाल्या आहेत… तुमच्या शुभेच्छा कायम असू द्या’.  या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहते त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत.

कोण आहेत जानी?

गीतकार जानी यांनी 'पचताओगे' आणि 'बारिश की जाये' सारखी हिट गाणी लिहिली आहेत. त्यांना ‘शांत सिपाही’ या पंजाबी गाण्यासाठी खूप प्रसिद्धी मिळाली. जानी यांची गाणी चाहत्यांना प्रचंड आवडतात. 2013 मधील सुपरहिट 'सोच' हे गाणे देखील जानी यांनीच लिहिले आहे. हे गाणे गायक हार्डी संधूने गायले होते. हेच गाणे पुढे अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटातही वापरले गेले.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 21 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget