एक्स्प्लोर

Naga Chaitanya-Samantha Divorce : ‘समंथा आणि मी आता आयुष्यात पुढे गेलो आहोत’, पहिल्यांदाच घटस्फोटावर नागा चैतन्यने मोकळं केलं मन!

Naga Chaitanya : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने घटस्फोटानंतर आपल्या नात्यावर अनेकदा वक्तव्य केली होती. मात्र, नागा चैतन्यने या बाबतीत नेहमीच मौन बाळगले होते.

Naga Chaitanya-Samantha Divorce : साऊथ विश्वातील दोन प्रसिद्ध नावं म्हणजे अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu). दोघांची रील आणि रियल लाईफ जोडी चाहत्यांची अतिशय लाडकी होती. मात्र, गतवर्षी या दोघांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. या घटस्फोटामुळे चाहते प्रचंड नाराज झाले होते. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने घटस्फोटानंतर आपल्या नात्यावर अनेकदा वक्तव्य केली होती. मात्र, नागा चैतन्यने या बाबतीत नेहमीच मौन बाळगले होते. मात्र, आता नागा चैतन्यने देखील यावर भाष्य केलं आहे.

नागा चैतन्यने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने या घटस्फोटावर भाष्य केलं. समंथापासून विभक्त होण्याबद्दल बोलताना नागा चैतन्य म्हणाला की, ‘माझ्या व्यावसायिक कामगिरीपेक्षा माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक बोलले जाते हे खरंच खूप निराशाजनक आहे.’

हे अतिशय दुर्दैवी आहे...

अभिनेता पुढे म्हणाला, ‘दुर्दैवाने हा या कामाचा एक भाग आहे, जिथे तुमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक कथा गुंफल्या जातात. या गोष्टी आम्हाला सोबत घेऊन फिराव्या लागतात. त्याचा परिणाम आपल्या कामावर होऊ देणे किंवा न होऊ देणे, ही आपापली जबाबदारी आहे. माझ्या व्यावसायिक यशापेक्षा वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलले जाते हे खूप निराशजनक होते. परंतु, मला वाटते की या सगळ्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्त्वाचे आहे. वैयक्तिक आयुष्यात या गोष्टी येतील आणि जातील. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच हेच केले आहे. आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून आलो आहोत. आम्हाला आमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे.’

या मुलाखतीत नागा चैतन्यला विचारण्यात आले की, यापुढे तो कधी समंथा प्रभूसोबत काम करताना दिसणार आहे का? या प्रश्नाला नागा चैतन्यने अतिशय सकारात्मक उत्तर दिले. तो म्हणाला की, 'असं कधी झालं तर छान होईल, पण घडेल की नाही, हे फक्त देवालाच माहीत नाही.'

बॉक्स ऑफिसवर होणार तगडी स्पर्धा

साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर नागा चैतन्य आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेल्या आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात नागा चैतन्य देखील दिसणार आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिरची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारशी स्पर्धा होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ देखील रिलीज होणार आहे.

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Kavya Wedding Card: काय सांगता! अनिरुद्ध - काव्या मारनच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल, गोल्डन प्लेटेड वेडिंग कार्डमागचं सत्य काय?
काय सांगता! अनिरुद्ध - काव्या मारनच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल, गोल्डन प्लेटेड वेडिंग कार्डमागचं सत्य काय?
Ramesh Pardeshi father Death: प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या वडिलांचं निधन, 'मुळशी पॅटर्न' फेम रमेश परदेशींवर दु:खाचा डोंगर
प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या वडिलांचं निधन, 'मुळशी पॅटर्न' फेम रमेश परदेशींवर दु:खाचा डोंगर
Smita Jaykar Recalls Meeting Late Actor Sushant Singh Rajput: रिया चक्रवर्तीनं माझ्याकडे सुशांत सिहं राजपूतच्या उपचारांसाठी मदत मागितलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाली?
रिया चक्रवर्तीनं माझ्याकडे सुशांत सिहं राजपूतच्या उपचारांसाठी मदत मागितलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाली?
Salman Khan Aishwarya Rai: 'तू ऐश्वर्याला स्पर्श का केलास?'; 'हम दिल दे चुके सनम'मध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून सलमान खान झाला फिदा, संजय लीला भन्साळी भडकले
'तू ऐश्वर्याला स्पर्श का केलास?'; 'हम दिल दे चुके सनम'मध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून सलमान खान झाला फिदा, संजय लीला भन्साळी भडकले

व्हिडीओ

KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
Embed widget