एक्स्प्लोर

महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण, तीन शिक्षिकांनी मिळून संभाळली ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाची धुरा!

Preet Adhuri  : या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियांकाने केले असून, ती पेशाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आहे. याची निर्मिती स्वप्नाली हर्षल पवार यांनी केली असून, त्याही शिक्षिका आहेत.

Preet Adhuri  : ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, असे महाराष्ट्र सरकारचे ब्रीदवाक्य सरकारच्या शिक्षणाबद्दलची आस्था दर्शवते. मुलगी शिकल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात अनेक महिला आघाडीवर दिसताहेत आणि त्यात मनोरंजनसृष्टीही मागे नाही. ‘प्रीत अधुरी’ नावाचा एक मराठी चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियांकाने केले असून, ती पेशाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आहे. याची निर्मिती स्वप्नाली हर्षल पवार यांनी केली असून, त्याही शिक्षिका आहेत. इतकंच नव्हे, तर या दोन महिला शिक्षिकांच्या पंखांना आर्थिक बळ देण्यासाठी अजून एक शिक्षिकाच पुढे सरसावल्या, त्या म्हणजे जिल्हा परिषद शिक्षिका श्रीमती बेबीताई यशवंत वाडकर. या तिघी ‘महिला सक्षमीकरणा’चे उत्तम उदाहरण ठरल्या आहेत.

या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद शिव ओंकार, प्रकाशमणी तिवारी, संदीप मिश्रा आणि महादेव साळोखे यांनी लिहिली असून, नावावरूनच समजते की, ‘प्रीत अधुरी’ हा चित्रपट म्हणजे एक प्रेमकथा असणार आहे. अर्थातच या चित्रपटाच्या कथेत रोमान्ससोबतच मनोरंजनाचा इतर मसालाही बघायला मिळेल.

दिग्गजांच्या आवाजाची साथ!

या चित्रपटाचे संगीत म्हणजे याचा प्राण असून, शिव ओंकार - राजेश घायल या संगीतकारद्वयीने त्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. शिव ओंकार व शशिकांत पवार यांनी गीते लिहिली आहेत. तर, सुप्रसिद्ध गायक जावेद अली, कुणाल गांजावाला, साधना सरगम, शाहिद मल्ल्या, रितू पाठक, खुशबू जैन आणि सुदेश भोसले यांनी पार्श्वगायन केले आहे.

दमदार कलाकारांची फौज!

‘प्रीत अधुरी’ या चित्रपटात दोन नवीन चेहरे लाँच होणार आहेत. प्रवीण यशवंत आणि प्रीया दुबे हे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांना अनेक दिग्गज कलाकारांची साथ लाभलीय. संजय खापरे, मिलिंद दास्ताने, शाम निनावे, कमलेश सावंत आणि अरुण नलावडे हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसतील. ‘प्रीत अधुरी’चे चित्रीकरण निसर्गरम्य आशा कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि मुंबई येथे संपन्न झाले असून, हा चित्रपट आता पोस्ट प्रॉडक्शनमध्ये गेला आहे. कार्यकारी निर्माती म्हणून ज्योती प्रवीण वाडकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 2 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Janhvi Kapoor : नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जान्हवी कपूर सज्ज, सोशल मीडियावरील फोटोने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 6 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaRajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget