एक्स्प्लोर

Liger : ‘लायगर’ अन् ‘टायगर’ एकाच मंचावर! विजय देवरकोंडाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सलमानसह दिग्गज कलाकार सहभागी!

Liger : आगामी ‘लायगर’ (Liger) या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Liger : साऊथ सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आगामी ‘लायगर’ (Liger) या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे देशातील विविध शहरांमध्ये जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. याच प्रमोशन दरम्यान, विजय मेगा स्टार चिरंजीवीच्या (Chiranjeevi) आगामी 'गॉडफादर' (Godfather) चित्रपटाच्या सेटवर पोहोचला. या चित्रपटाच्या सेटवर त्याची भेट बॉलिवूडचा ‘टायगर’ अर्थात अभिनेता सलमान खानशी (Salman Khan) झाली.

मुंबईतील एका सेटवर 'गॉडफादर'च्या एका खास गाण्याचे चित्रीकरण सुरु होते. या गाण्यामध्ये सुपरस्टार चिरंजीवी आणि सलमान खान एकत्र थिरकताना दिसणार आहेत. याच वेळी ‘लायगर’ची टीम देखील या चित्रपटाच्या सेटवर पोहोचली होती. या सर्वांचा एकत्र एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'गॉडफादर'च्या सेटवरील या फोटोमध्ये सलमान खान, चिरंजीवी, विजय देवरकोंडा, पुरी जगन्नाथ आणि चार्मे कौर दिसत आहेत.

पाहा फोटो :

या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील विजयच्या अॅक्शननं आणि अनन्या पांडेच्या (Ananya Panday) ग्लॅमरस अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. विजय देवरकोंडा हा ‘लायगर’ या चित्रपटामध्ये फायटरची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील विजयच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री अनन्या पांडेनं विजयच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. तर, राम्या कृष्णन यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली आहे.

‘लायगर’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेत

‘लायगर’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे. 'लायगर' हा चित्रपट 25 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर'  या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'अकडी पकडी' हे गाणं रिलीज झालं.

‘लायगर’चे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. या पोस्टरला अनेकांची पसंती मिळाली. समंथा रुथ प्रभूपासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, अनुष्का शेट्टी, पूजा हेगडे आणि अनन्या पांडे या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींनी या पोस्टरचे कौतुक केले आहे. या पोस्टरने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात जलद गतीने 1 दशलक्ष लाईक्स गाठणारे हे पहिले भारतीय चित्रपट पोस्टर बनले आहे. या पोस्टरने अवघ्या 4 तासांत हा विक्रम केला आहे.

हेही वाचा:

Liger Trailer Launch : विजय देवरकोंडाच्या 'लायगर' चित्रपटाचा ट्रेलर होणार लाँच; 'या' बॉलिवूड अभिनेत्याची विशेष उपस्थिती

Akdi Pakdi Song : 'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' गाणं रिलीज; विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा रोमॅंटिक अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादRavindra Dhangekar Family : आज मतदान, काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांची घरी देवपूजाChhatrapati Sambhajinagar Racket : 19 वर्षाच्या विद्यार्थीनीकडून गर्भनिदान रॅकेट, इंजिनिअरच्या तरुणीचा कारनामाUddhav Thackeray Mumbai Sabha : मोदींना आमची मुलं कडेवर घेऊन जावं लागतात, ठाकरेंनी धू धू धुतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Sushma Andhare: राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Embed widget