एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 16 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 16 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

नागराज मंजुळेंचा लाडका, ज्याला प्रत्येक चित्रपटात संधी मिळाली, कोण आहे अटकेची टांगती तलवार असलेला सुरज पवार?

नोकरीचे आमिष दाखवून अहमदनगरमध्ये एकाची फसवणूक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात सैराट (Sairat marathi movie) फेम प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार (Suraj Pawar) याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता सुरजला अटक होण्याची शक्यता आहे. राहुरीचे पोलीस लवकरच सुरज पवार याला अटक करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिलीय. त्यामुळे सैराट नंतर सुरज आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

दबंग खानला जीवे मारण्याचा रचला होता कट; 'असा' होता लॉरेन्स बिश्नोईचा 'प्लॅन बी'

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि वडील सलीम खान यांना धमकीची चिठ्ठी मिळाली होती. आता लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या हत्येचा प्लॅन बी (Plan B) उघड केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक कपिल पंडित याने उघड केले आहे की, त्याने सचिन बिश्नोई आणि संतोष यादव यांच्याबरोबर सलमान खानला टार्गेट करण्यासाठी मुंबईत एक रेकी केली होती. सलमानच्याच पनवेलच्या फार्महाऊसमध्ये मारण्याची योजना त्यांनी आखली होती.

गायक दलेर मेहंदीला मोठा दिलासा, पंजाब कोर्टाकडून तीन वर्षाची शिक्षा रद्द

पंजाबी गायक दलेर मेहंदीला मोठा दिलासा मिळालाय. मानव तस्करी प्रकरणी झालेली शिक्षा पंजाब कोर्टाकडून रद्द करण्यात आलीय. दलेर मेहंदी याला मानवी तस्करी प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरोधात दलेर मेहंदी यांने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  त्याचे अपील उच्च न्यायालयाने मान्य करत त्याला दिलासा दिलाय. 19 वर्ष जुन्या मानवी तस्करी प्रकरणात पटियालाच्या कोर्टाने दलेर मेहंदीला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

लग्नानंतर सहा वर्षांनी उर्मिला आणि मोहसिन झाले आई-वडील? व्हायरल पोस्टवर उर्मिलानं दिली प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा (Urmila Matondkar) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मार्च 2016 मध्ये उर्मिलानं  मोहसिन अख्तरसोबत (Mohsin Akhtar) लग्रनगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी मोहसिननं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मोहसिनसोबत एक चिमुकली मुलगी दिसत आहे. फोटो शेअर करुन मोहसिननं त्याला खास कॅप्शन देखील दिलं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. फोटो व्हायरल झाल्यानंतर उर्मिला आणि मोहसिन हे आई-वडील झाले आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. यावर आता उर्मिलानं प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूड फोटोबाबत रणवीर सिंहचा पोलिसांसमोर जबाब; न्यूड फोटो मॉर्फ केल्याचा दावा

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीरनं  केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. न्यूड फोटोशूट केल्यामुळे काही लोक रणवीरला सोशल मीडियावर ट्रोल देखील करत होते. तर काही लोक त्याचं समर्थन करत आहेत. आता रणवीरनं न्यूड फोटोशूट प्रकरणी पोलिसांसमोर जबाब नोंदवला आहे. यामध्ये त्यानं  न्यूड फोटोशूटमधील एक फोटो हा मॉर्फ करण्यात आला आहे, असा दावा केला आहे. फोटो जसा दाखवला आहे, तसा तो शूट केलेला नाव्हता, असं रणवीरनं  पोलिसांना सांगितलं. न्यूड फोटोशूटबाबत सध्या पोलीस रणवीरची चौकशी करत आहेत. कारण त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.

23:32 PM (IST)  •  16 Sep 2022

जॉनी डेप आणि अँबर हर्ड प्रकरण चित्रपटाच्या माध्यमातून येणार समोर

अभिनेता जॉनी डेप आणि अभिनेत्री अँबर हर्ड यांच्या घटस्फोटाचं प्रकरण मध्यंतरी चांगलंच गाजलं. त्यांची कोर्टातली सुनावणी ही चक्क लाईव्ह दाखवण्यात येत होती. सामान्य लोकांनी यामध्ये चांगलाच रस घेतला आणि बऱ्यापैकी लोकं ही जॉनी डेपच्या बाजूने उभी होती. या सुनावणीदरम्यान दोघांनी एकमेकांवर खूप आरोप केले. अखेर निकाल जॉनीच्या बाजूने लागला. आता या नाट्यमय घटनेवर चित्रपट बनणार असल्याची बातमी समोर येत आहे.

23:32 PM (IST)  •  16 Sep 2022

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका बंद होणार की नाही?

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद होणार होती. पण आता या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या मालिकेची वेळ आता बदलण्यात आलीए. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

23:31 PM (IST)  •  16 Sep 2022

Shivpratap Garudzep : 'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमात मनवा नाईक दिसणार सोयराबाईंच्या भूमिकेत

Shivpratap Garudzep : अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर मुशाफिरी करत अभिनेत्री मनवा नाईकने (Manava Naik) आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती अभावानेच दिसली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर आता ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. 

23:30 PM (IST)  •  16 Sep 2022

Vikrant Rona : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'विक्रांत रोना' ओटीटीवर रिलीज

Vikrant Rona OTT Release : दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप (Kichcha Sudeep) गेल्या अनेक दिवसांपासून 'विक्रांत रोना'मुळे (Vikrant Rona) चर्चेत आहे. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

18:15 PM (IST)  •  16 Sep 2022

INT : 'आयएनटी'चं बिगुल वाजलं

'आयएनटी' ही एकांकिका विश्वातील अत्यंत मानाची एकांकिका स्पर्धा आहे. या मानाच्या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 20 सप्टेंबरला पार पडणार आहे. 

18:14 PM (IST)  •  16 Sep 2022

Dream Girl 2 Teaser : 'ड्रीम गर्ल 2'ची रिलीज डेट जाहीर;

Dream Girl 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या चर्चेत आहे. आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.  टीझर आऊट झाल्याने आयुष्मानचे चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

15:50 PM (IST)  •  16 Sep 2022

Brahmastra Box Office Week 1 Collection :

Brahmastra Box Office Week 1 Collection : 'ब्रह्मास्त्र'ने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 300 कोटींचा आकडा पार केला आहे. अयान मुखर्जीने एक खास व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

13:37 PM (IST)  •  16 Sep 2022

चित्रपटातील संवादांवर आक्षेप, बेळगावात ‘बॉईज 3’च्या प्रदर्शनाला विरोध!

‘बॉइज थ्री’ (Boyz 3) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने विरोध दर्शवला असून, त्यामुळे हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित होऊ शकला नाही. आज अर्थात 16 सप्टेंबरला ‘बॉईज 3’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे आधीचे दोन भाग सुपरहिट ठरले होते. त्यानंतर प्रेक्षक ‘बॉईज 3’ची आतुरतेने वाट बघत होते. मात्र, या चित्रपटातील काही संवादवर आक्षेप घेतला गेल्याने बेळगावात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला नाही.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

13:04 PM (IST)  •  16 Sep 2022

सातव्या दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ची कमाई गडगडली! बॉक्स ऑफिसवर जमवला अवघा ‘इतका’ गल्ला!

पहिल्या दिवशी धमाकेदार ओपनिंग केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला होता. पण, वीकेंडला दमदार कमाई केल्यानंतर, सोमवारपासून 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईत घट झालेली पाहायला मिळाली. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता आठवडा उलटला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सातव्या दिवशी अवघी 9 कोटींची कमाई केली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

10:24 AM (IST)  •  16 Sep 2022

‘ती मी नव्हेच’, चिंचि चेटकिणीच्या भूमिकेतून वैभव मांगलेंची एक्झिट! पोस्ट शेअर करत दिली माहिती

अभिनेते वैभव मांगले यांनी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातील चिंचि चेटकिणीच्या भूमिकेतून आता एक्झिट घेतली आहे. वैभव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Navneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हानRajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळRahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानातMVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Embed widget