Entertainment News Live Updates 16 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा
मनी लाँड्रिंग प्रकरणी पटियाला कोर्टानं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) जामीन मंजूर केला आहे. कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास जॅकलिनला मनाई करण्यात आली आहे. दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जॅकलिनला जामीन मिळाला आहे. यापूर्वी जॅकलिनच्या जामिनावर 11 नोव्हेंबरला निर्णय होणार होता. मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज (15 नोव्हेंबर) पटियाला कोर्टामध्ये जॅकलिनच्या जामिना आर्जावर सुनावणी झाली.
Surya Marathi Movie: ‘सुर्या’ च्या विरोधात खलनायकांची फौज
चित्रपटात मुख्य नायक - नायिकेइतकाच नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचाही महत्त्वाचा वाटा असतो. नायक खलनायकाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर आव्हान देणारा खलनायक प्रेक्षकांनाही पहायला आवडतो. आगामी ‘सुर्या’ (Surya) या मराठी चित्रपटात मराठी-हिंदीतील सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. ‘सुर्या’ या चित्रपटाच्या नायकाचा सामना या सर्व खलनायकांशी होणार आहे. ‘सुर्या’ या चित्रपटात अखिलेन्द्र मिश्रा, हेमंत बिर्जे, हॅरी जोश, उदय टिकेकर, गणेश यादव ही मंडळी आपल्या खलप्रवृत्तीतून ‘सुर्या’ला बेजार करताना दिसतील. प्रसाद मंगेश हा युवा अभिनेता आपल्याला ‘सुर्या’च्या डॅशिंग भूमिकेत पहायला मिळणार आहे.
'त्या राक्षसाला...' श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया
श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. दिल्लीतील (Delhi) मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. हे तुकडे त्यानं फ्रीजमध्ये ठेवले. आफताबनं केलेल्या या अमानुष हत्येवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नुकतच अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिनं, हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे.' असं लिहिलं आहे.
Ameya Khopkar: 'कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर...'; अमेय खोपकर यांचा इशारा
Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच पाकिस्तानी कलाकारांबाबत एक ट्वीट केलं आहे. बॉलिवूडबरोबच इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी जर काम केलं तर चित्रपट निर्मात्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेय यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांना दिला आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) November 16, 2022
Aishwarya Rai Bachchan: आराध्यासोबत लिप किसचा फोटो शेअर केल्यानं ऐश्वर्या ट्रोल; नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
Aishwarya Rai Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच ऐश्वर्यानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. पण काही युझर्स या फोटोला कमेंट करुन ऐश्वर्याला ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
Govinda Naam Mera: गोविंदा नाम मेरा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; विकी, कियारा आणि भूमी साकारणार प्रमुख भूमिका
Govinda Naam Mera Will Release On Ott: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. विकीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात विकीसोबतच अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. धर्मा प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
Sundara Manamadhe Bharli: 'सुंदरा मनामध्ये भरली'मधील लतिकानं चालवला ट्रक; व्हिडीओ व्हायरल
Sundara Manamadhe Bharli: सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकार आणि मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेमध्ये अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) आणि अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात. अक्षया आणि समीर यांच्या मालिकेमधील केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. या मालिकेतील कलाकार हे शूटिंग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. नुकताच अक्षया नाईकनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया ही ट्रक चालवताना दिसत आहे.
View this post on Instagram
Urmilla Kothare : उर्मिला कोठारे सायबर क्राइमची शिकार होता होता वाचली
Urmilla Kothare : देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात डिजीटल व्यवहार करताना दिसत आहेत. डिलीटल व्यवहारामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तर दुसरीकडे या व्यवहारामुळे सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) सायबर क्राइमची शिकार होता होता वाचली आहे.