Entertainment News Live Updates 13 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 13 May 2023 03:20 PM
Dharmaveer : 'जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर करायचं नाही'; आनंद दिघे यांच्या जीवनपटाला एक वर्ष पूर्ण!

Dharmaveer Marathi Movie Latest Update : लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) हा सिनेमा आजही चर्चेत आहे. एका वर्षापूर्वी या  सिनेमाचे 400 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर 10,000 हून अधिक शोज लागले होते. आज हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. 

Dahaad Review : प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी सोनाक्षी सिन्हाची 'दहाड'

Dahaad Web Series Review : गेल्या काही दिवसांपासून ओटीटीवर अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. पण या कलाकृतींमधून काही मोजकेच सिनेमे आणि सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. नुकतीच प्रदर्शित झालेली 'दहाड' (Dahaad) ही सीरिज मात्र अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आठ भागांची ही सीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांना विचार करायलादेखील भाग पाडते आहे.


वाचा सविस्तर

Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' मालिकेतील ममताने तृतीयपंथीयांसोबत साजरा केला 'मदर्स डे'

Pratishodh Zunj Astitvachi Mother's Day 2023 Special : 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' (Pratishodh Zunj Astitvachi) ही मालिका आई आणि मुलगी यांच्या नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना त्यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते आहे, हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. आता या मालिकेतील ममताने तृतीयपंथीयांसोबत 'मदर्स डे' (Mothers Day 2023) साजरा केला आहे. 


Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' मालिकेतील ममताने तृतीयपंथीयांसोबत साजरा केला 'मदर्स डे'

The Kerala Story Box Office Collection : कॉन्ट्रोवर्सीचा 'द केरळ स्टोरी'ला फायदा

The Kerala Story Box Office Collection : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण कॉन्ट्रोवर्सीचा या सिनेमाला चांगलाच फायदा झाला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 


वाचा सविस्तर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता'च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

Jennifer Mistry On Asit Modi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बंसीवालाने  (Jennifer Mistry) 14 वर्षांनंतर ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर तिने गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. 


वाचा सविस्तर

Parineeti Chopra Raghav Chadha : अखेर तो दिवस आला.... खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक अन् शाही भोजन; धुमधडाक्यात पार पडणार राघव-परिणीतीचा साखरपुडा!

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज साखरपुडा होणार आहे. नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा होणार आहे. या शाही साखरपुड्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 





Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचीही उडी

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad Latest Update : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणुक (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) नुकतीच पार पडली असून आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 16 मे 2023 रोजी नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीची आणि अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. आता या निवडणुकीत भाजपनेही (BJP) उडी घेतली आहे. 


वाचा सविस्तर

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Yashoda : बयोचा 'श्यामची आई' होण्याचा प्रवास होणार सुरू


Yashoda Marathi Serial Latest Update : 'यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची' (Yashoda Goshta Shyamchya Aaichi) ही मालिका आज एक नवीन वळण घेणार आहे. अवखळ अल्लड तसेच अतिशय धीट असलेल्या बयोच्या आयुष्यात नवीन घटना घडणार आहे ती म्हणजे बयोचा लवकरच सदाशिवरावांबरोबर विवाह होणार आहे. प्रेक्षकांची लाडकी बयो आता यशोदा सदाशिवराव साने होणार आहे. बयोचा आता नवीन जन्म होणार आहे. सदाशिवराव साने यांच्याबरोबर सहचारिणी म्हणून यशोदेचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. बयोचा वैशाख कृष्ण द्वितीयेला विवाह सोहळा संपन्न होणार आहे. 


The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'चा आजपासून नवा अध्याय सुरू


The Kerala Story Worldwide Release : सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा भारतीय सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता आजपासून हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत हा सिनेमा 60 लाखपेक्षा अधिक सिनेप्रेमींनी पाहिला आहे. आता हा सिनेमा 40 पेक्षा अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 


City Of Dreams 3 : सत्तेसाठी अंतिम लढा; 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर आऊट


City Of Dreams 3 Season 3 Teaser Out : 'सिटी ऑफ ड्रीम्स' Citi Of Dreams) या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधील दमदार डायलॉग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या टीझरमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) राज्याच्या राजकीय स्थितीबद्दल बोलताना दिसत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.