Dahaad Review : प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी सोनाक्षी सिन्हाची 'दहाड'
Dahaad : राजस्थानमधील एका छोट्या गावातील गोष्ट 'दहाड' या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.
Reema Kagti
sonakshi sinha, Vijay Verma, Sohum Shah, Gulshan Devaiah
Dahaad Web Series Review : गेल्या काही दिवसांपासून ओटीटीवर अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. पण या कलाकृतींमधून काही मोजकेच सिनेमे आणि सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. नुकतीच प्रदर्शित झालेली 'दहाड' (Dahaad) ही सीरिज मात्र अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आठ भागांची ही सीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांना विचार करायलादेखील भाग पाडते आहे.
'दहाड'चं कथानक काय आहे? (Dahaad Web Series Story)
राजस्थानमधील एका छोट्या गावातील गोष्ट 'दहाड' या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. या गावातील एक मुलगी अचानक गायब होते पण यागोष्टीची पोलिसांकडून दखल घेतली जात आहे. मुलीचा भाऊ वारंवार पोलिसांकडे जातो. मात्र ते त्याच्या तक्रारीची नोंद करुन घेत नाहीत.
दरम्यान ठाकूर समुदायातील एक मुलगी एका मुस्लीम धर्मातील मुलासोबत स्वत:च्या मर्जीसोबत घरातून पळून जाते. मुलीचं घराणं राजकारणी असल्यामुळे पोलिसदेखील तिचा शोध घेतात. मुस्लीम धर्मातील मुलासोबत पळून जाणं मुलीच्या घरच्यांना पसंत पडलेलं नसतं. पोलीस याप्रकरणाची चौकशी करत असतात. दरम्यान आधी अचानक गायब झालेल्या मुलीचा भाऊ माझी बहिणदेखील एका मुस्लीम धर्माच्या मुलासोबत पळून गेली असू शकते, असा संशय पोलिसांकडे व्यक्त करतो. त्यानंतर सिनेमाच्या कथानकात एक ट्विस्ट येतो. 27 मुलींना मारणारा एक नराधम समोर येतो. हे सर्व कसं घडतं या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सोनाक्षी सिन्हा अन् विजय वर्माच्या भूमिकेचं कौतुक
'दहाड' या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये सोनाक्षीने अंजली भाटी ही भूमिका साकारली आहे. अंजली ही पोलीस अधिकारी आहे. या सीरिजच्या माध्यमातून ती ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. पहिल्याच प्रोजेक्टमध्ये तिने दमदार कामगिरी केली आहे. या सीरिजसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. आपल्या भाषेवर आणि बॉडी लॅंग्वेजवर तिने घेतलेली मेहनत सीरिजमध्ये दिसून येत आहे.
सोनाक्षी ही मुळची राजस्थानची नसूनही ती ही भाषा शिकली आहे. विजय वर्माच्या अभिनयाचं कौतुकचं. आपल्या कामाने सर्वांना थक्क करण्यात तो यशस्वी झाला आहे. सरळ मार्गाने जाणाऱ्या प्रोफेसरच्या आयुष्यात कसा ट्विस्ट येतो हे पाहण्याजोगं आहे. विजय वर्माने आपल्या भूमिकेत वेगवेगळ्या शेड्स दाखवण्यात आलं आहे.
'दहाड' ही सीरिज कशी आहे?
'दहाड' या वेबसीरिजबद्दस संमिश्र भावना माझ्या मनात होत्या. आठ भागांची ही सीरिज प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणारी आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी ही सीरिज आहे. ही सीरिज फक्त हिंदू-मुस्लीम या धर्मासंदर्भातील गोष्टींवर भाष्य करणारी नसून प्रेक्षकांना अनेक गोष्टींचा विचार करायला भाग पाडणारी आहे. या सिनेमातील रहस्यमय वळणे खूप खास आहेत.
रीमा कागती आणि रुचिका ओबरॉने 'दहाड' या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यांना जे सांगायचं आहे ते त्यांनी योग्यपद्धतीने मांडलं आहे. या सीरिजमध्ये राजस्थानचा नजारा उत्तमप्रकारे दाखवण्यात आला आहे. अर्थात हे सिनेमॅट्रोग्राफरचं यश आहे. या सीरिजची लांबी थोडी कमी केली असती तर ही सीरिज आणखी मजेशीर झाली असती.