Entertainment News Live Updates 13 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jul 2022 05:57 PM
Titeeksha Tawde : तापसीच्या 'शाबास मिथू'मध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे

Shabaash Mithu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) 'शाबास मिथू' (Shabaash Mithu) 'शाबास मिथू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या (Mithali Raj) भूमिकेत दिसणार आहे. तर या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडेदेखील (Titeeksha Tawde) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 





Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) या मालिकेत सध्या नव-नवीन ट्विस्ट येत असून सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या या मालिकेतून काही पात्रांची एक्झिट झाली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे इंद्रा-दीपूचे चाहते नाराज झाले आहेत. 

Aryan Khan : आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्स प्रकरणी क्लीन चिट मिळालेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन (Aryan Khan) याने 30 जून रोजी विशेष एनडीपीएस कोर्टात आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आता आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. एनसीबीनं जप्त केलेला पासपोर्ट आर्यन खानला परत देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. 

Emmy Awards 2022 : 74 व्या एमी पुरस्काराचे नामांकन जाहीर;

Emmy Awards 2022 Nominations List : 74 व्या एमी पुरस्कार सोहळ्याचे (Emmy Awards 2022) नामांकन आज (मंगळवारी) जाहीर झाले आहेत. यात 'सक्सेशन' या वेबसीरिजला 25 नामांकन मिळाले आहेत. तर स्क्विड गेम: द चॅलेंज' (Squid Game: The Challenge) या वेबसीरिजच्या चाहत्यांसाठीदेखील एक आनंदाची बातमी आहे. या वेबसीरिजला सर्वोत्कृष्ट नाट्य या विभागासह आणखी 13 नामांकन जाहीर झाले आहेत. 

के. एल. राहुलसोबत लग्नाच्या चर्चेवर अथियानं सोडलं मौन; म्हणाली, 'मला या लग्नाला...'

अथियाची पोस्ट
अथियानं इन्स्टाग्रामवरील स्टोरी सेक्शनमध्ये एक स्टोरी अपलोड केली. या स्टोरीमध्ये अथियानं लिहिलं, 'मला आशा आहे की, तीन महिन्यानंतर होणाऱ्या या लग्न सोहळ्याचे आमंत्रण मला देखील दिले जाईल.'


Tamasha Live : पुण्यातील मेट्रो स्थानकात ‘गरमा गरम’वर थिरकली सोनाली कुलकर्णी;‘तमाशा लाईव्ह’चे नवीन गाणे प्रदर्शित





Tamasha Live : सध्या पावसाळ्यामुळे वातावरणात सर्वत्र गारवा आहे. त्यामुळे हे गारगार वातावरण थोडे उबदार करण्यासाठी ‘तमाशा लाईव्ह’ घेऊन येत आहे एक ‘गरमा गरमा’ गाणे. नुकतेच हे गाणे पुण्यातील गरवारे मेट्रो स्थानकात अनेक प्रवाशांच्या, चाहत्यांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. या वेळी  चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या जबरदस्त नृत्याने उपस्थितांना घायाळ केले. तर या कार्यक्रमात अधिकच रंगत आणली ती, ‘गरमा गरम’च्या गायिका वैशाली सामंत यांनी. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह प्रवाशांनीही ‘गरमा गरम’वर ठेका धरला. एकंदरच मेट्रो स्थानकात सगळे जण ‘फील दि हीट’ चा अनुभव घेत होते. 






‘डान्स महाराष्ट्र डान्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘हा’ अभिनेता सांभाळणार परीक्षकाची भूमिका!

Dance Maharashtra Dance : झी मराठीवर लवकरच डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘चिंचि चेटकीण’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून खास स्पर्धक शोधून आणतेय. पण, या कार्यक्रमात परीक्षक कोण असणार हा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला आहे. या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत एक हरहुन्नरी अभिनेता, डान्सर आणि कोरिओग्राफर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) आहे. आपल्या अभिनय कौशल्यासोबतच गश्मीर एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणूनच त्याला ‘डान्स महाराष्ट्र डान्स’मध्ये (Dance Maharashtra Dance) परीक्षकाच्या खुर्चीत पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होईल यात शंकाच नाही.


वाचा संपूर्ण बातमी

एक-दोन नव्हे तब्बल चार नव्या चित्रपटांमधून हृतिक रोशन येणार चाहत्यांच्या भेटीला!

Hrithik Roshan Upcoming Movies: ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘जोधा अकबर’ ते ‘काबिल’ अशा दमदार चित्रपटांमधून हृतिक रोशन (Hrithik Roshan) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता पुन्हा एकदा हृतिक त्याच्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. एक दोन नव्हे, तर हृतिक तब्बल चार नव्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

'ह्रदयविकाराचा झटका? नाही! माझे एडिट केले फोटो व्हायरल झाले'; साऊथ स्टार विक्रमनं अफवांवर दिली रिअॅक्शन





Vikram : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील  प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रमला (Chiyaan vikram) काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे चैन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  छातीत दुखत असल्यानं विक्रमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी विक्रमला ह्रदयविकाराचा झटका आला आहे, अशी अफवा काही लोक पसरवत होते. चियान निक्रमचा मुलगा ध्रुवनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विक्रमच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. आता नुकत्याच एका इव्हेंटमध्ये विक्रमनं त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. 


वाचा सविस्तर बातमी






Hawahawai : ‘हवाहवाई’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज!

Hawahawai : ‘द ग्रेट इंडियन किचन’ यासारख्या बहुचर्चित, तसेच अनेक मल्याळम सिनेमातून आपल्या सशक्त अभिनयाचं दर्शन घडवलेली अभिनेत्री निमिषा सजयन (Nimisha Sajayan) आता ‘हवाहवाई’ (Hawahawai) या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘हवाहवाई’ हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून, अभिनेत्री निमिषा सजयन आणि अभिनेता विजय आंदळकर (Vijay Andalkar) ही फ्रेश जोडी याचित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Rhea Chakraborty Drugs Case : सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढल्या!

Rhea Chakraborty Drugs Case : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी NCB मोठा खुलासा केला आहे. एनसीबीने आपल्या आरोपपत्रात दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) तिचा भाऊ शौविकसह (Showik) इतर आरोपींकडून अनेकदा गांजा विकत घेतला होता आणि तो अभिनेता सुशांत सिंहला दिला होता. ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांमध्ये रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकसह, सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांच्या नावाचा देखील समवेश आहे.


वाचा संपूर्ण बातमी

सारा अली खान म्हणाली ‘डेटवर जायचंय’, प्रतिक्रिया देत अभिनेता विजय देवरकोंडा म्हणाला...

Vijay Deverakonda : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोच्या (Koffee With Karan 7) आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत. या शोचा एक प्रोमो नुकताच समोर आला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सारा आणि जान्हवी मजेशीर स्टेटमेंट देत आहेत. प्रोमोमध्ये, करण जोहर (Karan Johar) साराला विचारतो की, तिचा क्रश कोण आहे आणि तिला आता कोणाला डेट करायला आवडेल? यावर सारा अली खानने साऊथचा लोकप्रिय स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याचे नाव घेतले. साराच्या या उत्तराने करण जोहर आणि जान्हवी कपूरही हैराण झाले होते. तर, सारा जान्हवीलाही विचारते की, तुलाही विजय आवडतो का? यावर आता खुद्द विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया आली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

मराठी मनोरंजन विश्वातील ‘लाडके’ खलनायक! वाचा अभिनेते निळू फुले यांच्याविषयी...

Nilu Phule : मराठी रंगभूमी, तसेच मोठ्या पडद्यावर आपल्या बहारदार अभिनयाने ‘खलनायक’ वठवणारे अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांचा आज (13 जुलै) स्मृतिदिन. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी पडद्यावर साकारल्या. मात्र, या सगळ्या भूमिकांमध्ये ते ‘खलनायक’ म्हणून अधिक ठळकपणे प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. त्यांनी पडद्यावर साकारलेला ‘खलनायक’  इतका जिवंत वाटायचा की, महिला प्रेक्षक तर अक्षरशः त्यांच्या नावाने बोटं मोडायच्या. केवळ मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


गृहिणीचं आयुष्य दाखवणारी नवी मालिका, ‘तू चाल पुढं’मधून दीपा परबचं छोट्या पडद्यावर पुनरागमन!


अभिनेत्री दीपा परब हिने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


कविवर्य शांताराम नांदगावकरांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न


शब्दांचा राजा आणि एक अजातशत्रू म्हणजेच डॅडी कविवर्य शांताराम नांदगावकर यांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा नुकताच भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शांताराम नांदगावकर फाउंडेशनतर्फे मिरा रोड येथे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत या सोहळा पार पडला.


कॉफी विथ करणमध्ये साराचा गौप्यस्फोट


बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोच्या सातव्या सिझनला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी हजेरी लावली होती. कॉफी विथ करण 7 चा पहिला एपिसोड सुपरहिट ठरला आहे. या एपिसोडने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कॉफी विथ करणचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड आहे.  आता या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि जाह्नवी कपूर या दोघी हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल शेअर करण्यात आला आहे.


... तर सलमान खानला जीवानिशी मारू! लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा एकदा ‘भाईजान’ला धमकी


बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चौकशीदरम्यान मोठी गोष्ट सांगितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई या चौकशीत म्हणाला की, काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला माफ करणार नाही.


'मन उडू उडू झालं' मालिकेतून सोनटक्के सरांनी घेतला निरोप


'मन उडू उडू झालं' या मालिकेत सध्या नव-नवे ट्विस्ट येत आहेत. मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. काही दिवसांपूर्वी कानविंदे कुटुंबाने या मालिकेतून निरोप घेतलेला पाहायला मिळाला. आता या मालिकेतून सोनटक्के सर एक्झिट घेत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.