Hrithik Roshan Upcoming Movies: एक-दोन नव्हे तब्बल चार नव्या चित्रपटांमधून हृतिक रोशन येणार चाहत्यांच्या भेटीला!
Hrithik Roshan Upcoming Movies: पुन्हा एकदा हृतिक त्याच्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.
Hrithik Roshan Upcoming Movies: ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘जोधा अकबर’ ते ‘काबिल’ अशा दमदार चित्रपटांमधून हृतिक रोशन (Hrithik Roshan) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता पुन्हा एकदा हृतिक त्याच्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. एक दोन नव्हे, तर हृतिक तब्बल चार नव्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हृतिकच्या नव्या चित्रपटांचे बजेट तब्बल 850 कोटींहून अधिक आहे. या चित्रपटांमध्ये ‘विक्रम वेधा’ ते ‘क्रिश 4’ या चित्रपटांचा समावेश आहे. चला तर, जाणून घेऊया त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल...
विक्रम वेधा
अभिनेता हृतिक रोशनच्या या चार चित्रपटांच्या यादीतील पहिला चित्रपट म्हणजे ‘विक्रम वेधा’. 'विक्रम वेधा' हा तमिळ अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘विक्रम वेधा’चा रिमेक आहे. या रिमेक चित्रपटासाठी 175 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटात हृतिक रोशनसह सैफ अली खान, राधिका आपटे हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
फायटर
या यादीत दुसरा चित्रपट ‘फायटर’ आहे. अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट बनवण्यासाठी 250 कोटी रुपयांचे बजेट खर्च होणार आहे.
वॉर 2
हृतिकचा तिसरा चित्रपट ‘वॉर 2’ आहे. हा चित्रपट 2019मध्ये रिलीज झालेल्या 'वॉर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘वॉर’ या चित्रपटात अभिनेता हृतिक आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. मीडिया रिपोर्टनुसार, 'वॉर 2'चे बजेट 200 कोटींपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे.
क्रिश 4
या यादीत चौथा चित्रपट ‘क्रिश 4’ आहे. 'क्रिश 4' हा 2003 मध्ये आलेल्या 'कोई मिल गया' चित्रपटाचा सिक्वेल आहे. यापूर्वी 'क्रिश' आणि 'क्रिश 3' या नावाने या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले होते. 'क्रिश 4' या चित्रपटाचा बहुतांश भाग VFX द्वारे बनवला जाणार आहे. सध्या या चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा :
Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..
Vikram Vedha : सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...