Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफी 2024-25 हंगाम दोन भागात आयोजित केला जात आहे. पहिला फेरी 11 ऑक्टोबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत खेळवण्यात आली होती. आता दुसरी फेरी 23 जानेवारी ते 2 मार्च या कालावधीत होणार आहे. दुसऱ्या फेरीत, साखळी सामने 23 जानेवारी ते 26 जानेवारी आणि त्यानंतर 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान खेळवले जातील. यानंतर क्वार्टर फायनल फेरी सुरू होईल. ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्या सर्व क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत स्टार खेळाडूंनाही रणजी ट्रॉफी खेळावी लागत आहे.


रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका!


स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli Ranji Trophy 2024-25)2012 नंतर रणजी ट्रॉफीमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दिल्लीच्या रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी त्याने स्वतःला उपलब्ध करून दिले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma Ranji Trophy 2024-25) 10 वर्षांनंतर मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी होताना दिसणार आहे. रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळेल. भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजानेही राजकोटमध्ये सौराष्ट्र संघाच्या सराव सत्रात भाग घेतला आणि 23 जानेवारीपासून दिल्लीविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. जडेजा शेवटचा सौराष्ट्रकडून जानेवारी 2023 मध्ये खेळला होता.


शुभमन गिल पंजाबकडून आणि ऋषभ पंत दिल्लीकडून रणजी सामना खेळतील. 23 जानेवारीपासून राजकोटमध्ये सुरू होणाऱ्या सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या आगामी रणजी ट्रॉफी सामन्यासाठी ऋषभ पंतने स्वतःला उपलब्ध करून दिले आहे. पंतने 2017-18 च्या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच वेळी शुभमन गिल 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत कर्नाटकविरुद्ध पंजाबकडून खेळेल.


2024-25 च्या रणजी ट्रॉफी हंगामाचे स्वरूप काय आहे?


2024-25 च्या रणजी ट्रॉफीमध्ये 38 संघ पाच गटांमध्ये विभागले गेले आहेत. चार एलिट गट (अ, ब, क आणि ड) आहेत, प्रत्येक गटात 8 संघ आहेत. तर, उर्वरित 6 संघांना वेगळ्या प्लेट ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे.


2024-25 रणजी ट्रॉफीचे सर्व गट


एलिट अ : मुंबई, बडोदा, सेवा दल, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा, महाराष्ट्र, ओडिशा, मेघालय
एलिट ब : विदर्भ, आंध्र, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, पाँडिचेरी, हिमाचल प्रदेश, हैदराबाद
एलिट क : मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार
एलिट ड : तामिळनाडू, सौराष्ट्र, रेल्वे, दिल्ली, झारखंड, छत्तीसगड, आसाम, चंदीगड
प्लेट : गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश.


रणजी ट्रॉफी 2024-25 चे सामने किती वाजता आणि टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर  पाहू शकतात?


रणजी ट्रॉफी 2024-25 चे सामने सकाळी 9.30 वाजता सुरू होतील. थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 टीव्ही नेटवर्कवर एसडी आणि एचडी दोन्ही चॅनेलवर उपलब्ध असेल. याशिवाय, लाईव्ह स्ट्रीमिंग जिओसिनेमा अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.


हे ही वाचा -


IND VS ENG सामन्याच्या एक दिवसआधी बोर्डाने केली मोठी घोषणा! अचानक 'या' खेळाडूची उपकर्णधार म्हणून केली नियुक्ती