(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Deverakonda : सारा अली खान म्हणाली ‘डेटवर जायचंय’, प्रतिक्रिया देत अभिनेता विजय देवरकोंडा म्हणाला...
Vijay Deverakonda : करण जोहरने साराला विचारले की, तिला आता कोणाला डेट करायला आवडेल? यावर सारा अली खानने साऊथचा लोकप्रिय स्टार विजय देवरकोंडा याचे नाव घेतले.
Vijay Deverakonda : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोच्या (Koffee With Karan 7) आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत. या शोचा एक प्रोमो नुकताच समोर आला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सारा आणि जान्हवी मजेशीर स्टेटमेंट देत आहेत. प्रोमोमध्ये, करण जोहर (Karan Johar) साराला विचारतो की, तिचा क्रश कोण आहे आणि तिला आता कोणाला डेट करायला आवडेल? यावर सारा अली खानने साऊथचा लोकप्रिय स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याचे नाव घेतले. साराच्या या उत्तराने करण जोहर आणि जान्हवी कपूरही हैराण झाले होते. तर, सारा जान्हवीलाही विचारते की, तुलाही विजय आवडतो का? यावर आता खुद्द विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया आली आहे.
करणने साराला विचारले होते की, तुला ज्या व्यक्तीला डेट करायला आवडेल, त्याचे नाव सांग? या प्रश्नावर उत्तर देण्यास आधी सारा नकार देते आणि नंतर हसत हसत विजय देवराकोंडाचे नाव घेते. आता या शोचा हा व्हिडीओ पाहून साऊथ स्टार विजय देवरकोंडाने देखील ही क्लिप त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आणि लिहिले की, 'ज्या प्रकारे तुम्ही देवरकोंडाचा उच्चार केलात, ते खूप क्युट होते. माझ्याकडून तुला आणि जान्हवीला एक प्रेमळ मिठी’.
पाहा पोस्ट :
कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा आणि जाह्नवी या दोघी हजेरी लावणार आहेत. या शोच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सारा आणि जान्हवी करणसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये दिसत आहे की, करण साराला विचारतो की, तिला कोणत्या व्यक्तीला डेट करायला आवडेल? यावर सारा म्हणते, 'विजय देवरकोंडा' सारा जेव्हा विजयचं नाव घेते, तेव्हा जान्हवी तिला पाहून हसायला लागते. त्यानंतर करण जान्हवीला म्हणतो की, 'तू नेहमी विजयसोबत असते तुला तो आवडतो का?'
एक्सबाबत सारा म्हणते....
कार्यक्रमाच्या एका सेगमेंटमध्ये करण साराला तिच्या एक्सबाबत विचारतो. यावेळी सारा म्हणते, 'माझा एक्स हा सर्वांचा एक्स होता' सारा आणि जाह्नवीचा हा एपिसोड 14 जुलै रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
हेही वाचा: