Entertainment News Live Updates 12 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
KL Rahul-Athiya Wedding : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर के एल राहुल (Kl Rahul) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट केलं जात आहे. त्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रिपोर्टनुसार, पुढल्या तीन महिन्यांत के एल राहुल आणि अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकणार आहेत.
पाहा व्हिडीओ:
Ranveer Singh, Bear Grylls : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) नुकताच बेयर ग्रील्सच्या (Bear Grylls) शोमध्ये झळकला होता. या शोमधून रणवीरची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ क्लीप बेयर ग्रील्सच्या शो मधली आहे. मात्र, या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता रणवीर सिंह बेयर ग्रील्सवर चुंबनाचा वर्षाव करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.
छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi 12) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमाच्या 12 व्या सिझनचं शूटिंग हे केपटाऊनमध्ये सुरु आहे. या सिझनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. सेटवर मज्जा, मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. रिपोर्टनुसार या सिझनचा एक टास्क करताना स्पर्धक प्रतीक सहजपालनं (Pratik Sehajpal) गेमच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा प्रतीकवर भडकला होता.
Tu Chal Pudha : अभिनेत्री दीपा परब (Deepa Parab) हिने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये (Tu Chal Pudha) दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Nick Jonas, Priyanka Chopra : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती-गायक निक जोनास (Nick Jonas) यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या जोडीच्या लग्नाला आता चार वर्ष झाली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ही जोडी एका मुलीची पालक बनली आहे. निक आणि प्रियांकाने त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास असे ठेवले आहे. मुलीच्या जन्मानंतरही निक आणि प्रियांका एकमेकांना वेळ देत असतात. अनेकदा ही जोडी रोमँटिक अंदाजात स्पॉट होत असतात. नुकतेच दोघे टाहो तलावाजवळ (Lake Tahoe) रोमँटिक अंदाजात स्पॉट झाले.
Pran Death Anniversary : अभिनेते प्राण (Pran) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायकांपैकी एक होते. आज (12 जजुलै) प्राण यांचा स्मृतिदिन आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या खलनायकाने बॉलिवूड विश्व गाजवले होते. प्राण हे असे खलनायक होते, जे चित्रपटातील नायकापेक्षा अधिक मानधन घेत होते. प्राण यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक ‘खानदान’ या चित्रपटातून मिळाला होता. प्राण अभिनय करताना त्यात इतके तल्लीन होत की, ते पात्र पडद्यावर अक्षरशः जिवंत वाटायचे.
Sonam Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) घरी लवकरच नव्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. सोनमचा पती आनंद आहूजानं (Anand Ahuja) काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केलं होतं. या बेबी शॉवर पार्टीला सोनम आणि आनंदच्या मित्र मैत्रीणींनी हजेरी लावली होती.आता सोनमचे बेबी शॉवर मुंबईत देखील होणार आहे.
Salman Khan, Lawrence Bishnoi: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चौकशीदरम्यान मोठी गोष्ट सांगितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई या चौकशीत म्हणाला की, काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला माफ करणार नाही.
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) आणि ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतकंच नाही तर, तो लवकरच बाबा देखील बनणार आहे. यंदाचं वर्ष हे रणबीरसाठी खूपच आनंदाचं असणार आहे. यंदा रणबीरचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण तब्बल पाच वर्षांपूर्वी सुरु झाले होते. मात्र, हा चित्रपट आता पाच वर्षांनंतर रिलीज होणार आहे. या चित्रपटाला पाच वर्ष का लागली याचा खुलास आता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) केला आहे.
Sulakshana Pandit Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit) या 70-80च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले होते. चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत असणाऱ्या सुलक्षणा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या. आज (12 जुलै) सुलक्षणा पंडित यांचा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या सुलक्षणा पंडित स्वतः मात्र आयुष्यभर दुःखी राहिल्या. जाणून घेऊया त्यांच्या याच जीवनकथेबद्दल...
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
जॉन अब्राहमने सुरु केले ‘तेहरान’चे शूटिंग, चित्रपटाचा टीझर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता जॉनने त्याचा आगामी नवीन चित्रपट 'तेहरान'चे शूटिंग सुरू केले आहे. मॅडॉक फिल्म्स अंतर्गत बनणाऱ्या ‘तेहरान’ या चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. नुकताच याचा टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जॉन खूपच इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन करत आहेत.
‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहने चाहत्यांसोबत शेअर केली लेकाची पहिली झलक
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री, ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया नुकतेच आई-बाबा झाले असून सध्या ते त्यांच्या लाडक्या लेकासोबत म्हणजेच 'लक्ष्य' सोबत वेळ घालवत आहेत. मुलाबाबतचे सर्व अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता भारती आणि हर्षने लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
'मी पुन्हा येईन' वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज
महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' नावाची वेबसीरिज येणार आहे.
'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' गाणं रिलीज
'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे थिरकताना दिसत आहेत.
'स्वयंवर मिका दी वोटी'मध्ये मिकाच्या एक्स गर्लफ्रेंडची वाइल्ड कार्ड एन्ट्री
लोकप्रिय गायक मिका सिंहचा 'स्वयंवर मिका दी वोटी' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या होत्या. स्वयंवरात सहभागी झालेल्या मुली मिकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असताना आता या कार्यक्रमात मिकाची एक्स गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -