Salman Khan: ... तर सलमान खानला जीवानिशी मारू! लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा एकदा ‘भाईजान’ला धमकी
Salman Khan, Lawrence Bishnoi: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Salman Khan, Lawrence Bishnoi: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चौकशीदरम्यान मोठी गोष्ट सांगितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई या चौकशीत म्हणाला की, काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला माफ करणार नाही.
गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल लॉरेन्स बिश्नोईची सतत चौकशी करत आहे. यादरम्यान पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा एकदा सलमान खानला धमकी दिली आहे. ई-टाईम्सच्या बातमीनुसार, लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, काळवीट शिकार प्रकरणात मी सलमान खानला कधीही माफ करणार नाही. याप्रकरणाचा निर्णय न्यायालयाच्या न्यायानुसार होणार नाही. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जनतेसमोर येऊन जाहीररित्या आपल्या समाजातील लोकांची माफी मागावी लागेल. जर, सलमान खान तसे करू शकला नाही, तर आम्ही त्याला मारून टाकू.
काय आहे कळवीट शिकार प्रकरण?
राजस्थानमधील बिश्नोई समाज कळवीट प्राण्याला देव मानतात. 1998मध्ये 'हम साथ-साथ है' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानवर राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केल्याचा आरोप झाला होता. या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानलाही तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. मात्र, आता या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीने उडी घेतली आहे.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई अवघ्या 28 वर्षांचा आहे, तर त्याच्या टोळीतील सदस्य वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत. मात्र, इतक्या कमी वयात या सर्वांवर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. स्वतः लॉरेन्सवर पन्नास पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने आतापर्यंत केलेले गुन्हे पाहता त्याच्या टोळीकडून सलमान खानला देण्यात आलेल्या हत्येच्या धमकीला मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी गांभीर्याने घेतलंय.
संबंधित बातम्या :
Lawrence Bishnoi : सिद्धू मुसेवालाची हत्या असो, सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न; तुरुंगातून कारभार चालवतो 28 वर्षांचा 'लॉरेन्स बिष्णोई'!
Salman Khan : 'सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागे हात नाही'; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा दावा