Entertainment News Live Updates 12 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये रक्षाबंधनचा उत्साह; कलाकारांनी साजरा केला सण
बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, तुझेच मी गीत गात आहे आणि पिंकीचा विजय असो मालिकेत रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. या खास दिवशी खरतर बहिण भावाला राखी बांधते मात्र ठिपक्यांची रांगोळी मालिकेत मात्र आगळं वेगळं रक्षाबंधन पाहायला मिळणार आहे. अप्पूला भाऊ नाही म्हणून ती उदास आहे. मात्र संपूर्ण कानेटकर कुटुंब एकत्र येऊन अप्पूला राखी बांधणार आहे. एकत्र कुटुंबाचं महत्त्व या विशेष भागाच्या निमित्ताने अधोरेखित होणार आहे.
'गुंजन' आणि 'मधुमालती' शब्द स्वरमालेचा लोकार्पण सोहळा, उत्साहात संपन्न
मीडिया वर्क्स स्टुडिओ, पुणे प्रस्तुत आणि श्री. व्यंकट मुळजकर निर्मित “गुंजन” आणि “मधुमालती” या प्रासादिक, भावगंधित शब्द स्वरमालेचा लोकार्पण सोहळा पुण्यात (Pune) संपन्न झाला. या कार्यक्रमाला रसिकप्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच हे दोन्ही अल्बम म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ नेते माननीय उल्हास दादा पवार हे होते. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की (Ashok Patki) यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी शब्द स्वरमालेचे रसग्रहण केले.
सलमाननं घेतली भारतीय नौदलाच्या जवानांची भेट; INS विशाखापट्टणममध्ये सैनिकांसोबत वर्कआऊट अन् कूकिंग
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने (Salman Khan) INS विशाखापट्टणमध्ये जाऊन भारतीय नौदलाच्या जवानांची भेट घेतली आहे. सैनिकांसोबतचे सलमानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी सलमाननं सैनिकांसोबत संवाद साधला. तसेच त्यांनं INS विशाखापट्टणम ही युद्धनौका पाहिली. तसेच त्यानं यावेळी सैनिकांसोबत पुशअप्स मारले, कूकिंग केलं आणि वर्कआऊट देखील केला. सलमाननं INS विशाखापट्टणमवर तिरंगा फडकवला. उपस्थित सैनिकांनी सलमानचा ऑटोग्राफ देखील घेतला. सैनिकांची देशभक्ती आणि धैर्य पाहून सलमान भारावून गेला.
'लाल सिंह चड्ढा' पाहिल्यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैनाची प्रतिक्रिया
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. नुकतच या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी तसेच चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली होती. स्क्रिनिंगचा व्हिडीओ आमिर खान प्रोडक्शन्स या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि सुरेश रैना (Suresh Raina) हे चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी; प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना काल (10 ऑगस्ट) दिल्लीमधील (Delhi) एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. राजू श्रीवास्तव यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ठिक होण्यासाठी त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी प्रार्थना करत आहेत.
दोनदा अँजिओप्लास्टी, 9 स्टेंट! राजू श्रीवास्तव यांच्यावर आधीही झाल्या शस्त्रक्रिया!
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी केली, तेव्हा 100 टक्के ब्लॉकेज आढळले. राजू श्रीवास्तव हे पूर्वीपासून हृदय रोगाचे रुग्ण आहेत. राजू श्रीवास्तव यांना आधीच नऊ स्टेंट टाकण्यात आले होते. इतकेच नाही, तर याआधीही त्यांची दोनदा अँजिओप्लास्टी झाली आहे. 10 वर्षांपूर्वी मुंबईतील कोकिलाबेन धीरुबेन अंबानी रुग्णालयात पहिल्यांदा त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर सात वर्षांपूर्वी मुंबईतील लीलावती रुग्णालयात पुन्हा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
‘शेरशाह’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण! कियाराने दिल्या हटके शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाला रिलीज होऊन आज (12 ऑगस्ट) एक वर्ष पूर्ण झालं आहे.
One film, one year, one story that inspired us all!
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) August 12, 2022
Your love, support & appreciation for this film has said enough, all I would like to add is, #1YearOfShershaah aur “yeh dil maange more!”🇮🇳🙏🏼https://t.co/Lh7VxaIIsN#Shershaah @Advani_Kiara @vishnu_dir @karanjohar pic.twitter.com/ujbGkTUjUA
Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने प्रतिसाद देणे थांबवले!
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या हृदयाचे ठोके नीट काम करत असले, तरी त्यांच्या मेंदूने प्रतिसाद देणे बंद केले आहे. जेव्हा, राजू जिममध्ये बेशुद्ध झाले, तेव्हा त्याच्या मेंदूतील ऑक्सिजनचा पुरवठा दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ विस्कळीत झाला होता, त्यामुळे मेंदूने प्रतिसाद देणे बंद केले आहे.
Raksha Bandhan Box Office Collection: 'लाल सिंह चड्ढा'च्या तुलनेत ‘रक्षाबंधन’ पडला मागे! पाहा पहिल्या दिवसाचे कलेक्शन...
अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. यावरून असे दिसतेय की, हा चित्रपट काही विशेष दाखवू शकलेला नाही. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, ‘रक्षाबंधन’ने पहिल्या दिवशी केवळ 7.5-8 कोटींचा व्यवसाय केला आहे, जो अक्षयच्या उर्वरित चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत खूपच कमी आहे.
View this post on Instagram
सोशल मीडिया पोस्टवरून ऋषभ पंत-उर्वशी रौतेलामध्ये तूतू-मैंमैं! अभिनेत्री म्हणते, ‘छोटू भैय्या...’
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर ऋषभ पंत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रत्युत्तर दिले आहे. तिने रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.
Chotu bhaiyaa should play bat ball 🏏. Main koyi munni nahi hoon badnam hone with young kiddo darling tere liyee
— URVASHI RAUTELA🇮🇳 (@UrvashiRautela) August 11, 2022
#Rakshabandhan Mubarak ho #RPChotuBhaiyya #Cougarhunter #donttakeadvantageofasilentgirl #love #UrvashiRautela #UR1 pic.twitter.com/AA3APRFViY