Entertainment News Live Updates 11 october : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
करण जोहरचा ट्विटरला अलविदा; नेटकरी म्हणाले, 'भारतामध्ये सुख, शांती...'
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि कॉफी विथ करण या कार्यक्रमामुळे चर्चेत असतो. नुकतच एक ट्वीट करणनं शेअर केलं. या ट्वीटमधून त्यानं सांगितलं की, तो ट्विटर अकऊंट बंद करत आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं. करणनं हे ट्वीट शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. 'पॉझिटिव्हग एनर्जी मिळवण्यासाठी आयुष्यात जागा निर्माण करत आहे.त्यासाठी हे पहिलं पाऊल उचललं आहे. गुडबाय ट्विटर', असं ट्वीट शेअर करुन करणनं ट्विटर अकऊंट बंद केलं. त्याचं हे ट्वीट पाहून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं भावनिक ट्वीट
अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचं 29 ऑक्टोबर रोजी निधन झालं. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुनीत यांचा जीजी गंधाडा गुडी (GG Gandhada Gudi) हा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जीजी गंधाडा गुडी (GG Gandhada Gudi) या त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. पुनीत यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार (Ashwini Puneeth Rajkumar) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्वीट शेअर केलं.
कतरिना, सिद्धांत आणि ईशान यांच्या 'फोन भूत' चा ट्रेलर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) , अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टर (Ishaan khatter) अभिनीत 'फोन भूत'च्या पहिल्या पोस्टरपासूनच प्रेक्षक चित्रपटाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दर्शकांची उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी 'फोन भूत' (PhoneBhoot) चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित केला. हॉरर कॉमेडी या मनोरंजक शैलीसाठी हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतानाच, कतरिना कैफला प्रथमच सुंदर भूताच्या रुपात पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. अखेरीस, आता प्रतीक्षा संपली असून, निर्मात्यांनी आज 'फोन भूत'चा विस्मयकारक ट्रेलरचे अनावरण केले आहे.
‘विक्रम वेधा’ने पार केला 100 कोटींचा टप्पा! बॉक्स ऑफिसवर दिसली ह्रतिक-सैफच्या जोडीची जादू!
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. बॉक्स ऑफिसच्या जगतात या चित्रपटाने एक मैलाचा टप्पा पार केला आहे. होय, 'विक्रम वेधा'ने जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर, रिलायन्स एंटरटेनमेंटच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत एकूण 69 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपती' चं सूत्रसंचालन करण्यासाठी बिग बी किती घेतात मानधन? जाणून घ्या...
Kaun Banega Crorepati 14: बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटांबरोबरच अमिताभ हे छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करतात. या कार्यक्रमाचा सद्या 14 वा सीझन सुरु आहे. केबीसीच्या 14 व्या सीझनसाठी अमिताभ बच्चन हे किती रुपये मानधन घेतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. जाणून घेऊयात त्यांच्या मानधनाबाबत...
Doctor G: 'डॉक्टर जी' चित्रपटाचं डॉक्टर्ससाठी स्पेशल स्क्रीनिंग; आयुष्मान खुरानानं लावली हजेरी
View this post on Instagram
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा! ‘हर हर महदेव’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यकथेवर आधारित 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या चित्रपटातील काही दमदार गाणी आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. तर, चित्रपटाची एक छोटीशी झलक देखील प्रेक्षकांनी पहिली होती. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. ‘स्वराज्यात सामील व्हा, नाहीतर मरा..’, अशा जबरदस्त संवादासह चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते.
View this post on Instagram
Bigg Boss 16 : घराच्या नियमांचे उल्लंघन, ‘बिग बॉस’ने निमरितकडून हिसकावले कॅप्टनपद!
मात्र, दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरात चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. सोमवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अर्चना आणि शालीन यांच्यात जेवणावरून झालेल्या वादापासून ते निमरितकडून कर्णधारपद हिसकावण्यापर्यंत असे अनेक जोरदार धमाके पाहायला मिळाले.
View this post on Instagram
Ram Setu Trailer: प्रतीक्षा संपली! खिलाडी अक्षय कुमारच्या 'राम सेतू' चा ट्रेलर रिलीज; नेटकरी म्हणाले, 'अंगावर शहारे आले'
Ram Setu Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. त्यानंतर नेटकरी या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता 'राम सेतू' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram