Entertainment News Live Updates 11 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jul 2022 05:21 PM
Thor Love And Thunder : 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' प्रेक्षकांच्या पसंतीस; भारतात केली रेकॉर्डब्रेक कमाई

'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी या सिनेमाने रिलीजच्या एक दिवस आधीच भारतात 18 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे विकेंडला हा सिनेमा चांगलाच धमाका करणार अशी शक्यता वर्तवली गेली होती. रिलीजच्या पहिल्या विकेंडला या सिनेमाने 64.80 कोटींचा गल्ला जमवला आहे. 





Guru Purnima 2022 : मराठी मालिकांचा रंगणार गुरुपौर्णिमा विशेष भाग; 13 जुलैला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म .... भक्ताला परमेश्वराची ओळख गुरूमुळेचे होते. त्यामुळे परमेश्वर आणि गुरू यांपैकी आधी नमस्कार कुणाला करावा हा प्रश्नं नेहेमीच पडत असतो. गुरुच्या थोरवीचे काही शब्दांत वर्णन करता येणे अशक्यच ! गुरू-अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात. आता 13 जुलैला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. मराठी मालिकांचा (Marathi Serial) गुरुपौर्णिमा विशेष भाग रंगणार आहे.

Mika Di Vohti : 'स्वयंवर मिका दी वोटी'मध्ये मिकाच्या एक्स गर्लफ्रेंडची वाइल्ड कार्ड एन्ट्री; कार्यक्रमाच्या टीआरपीत वाढ

Akanksha Puri Entered In Mika Di Vohti : लोकप्रिय गायक मिका सिंहचा (Mika Singh) 'स्वयंवर मिका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या होत्या. स्वयंवरात सहभागी झालेल्या मुली मिकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असताना आता या कार्यक्रमात मिकाची एक्स गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीची (Akanksha Puri) वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. 

Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' मालिकेतून अनिता दाते करणार पुनरागमन

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनिता दातेचा (Anita Date) हार घातलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या फोटो सोबत 'जो आवडतो सर्वांना' असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे, या फोटोमुळे तिचे चाहतेच नाही तर इतर सेलिब्रिटींना देखील प्रश्न पडलाय की, नेमका या फोटो मागचा अर्थ काय?. हा फोटो शेअर करण्यामागचं कारण आता प्रेक्षकांसमोर आलं आहे. नुकतंच एका नवीन मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर सादर करण्यात आला. 'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता दाते पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

Timepass 3 : टाईमपास-3 मधील ‘लव्हेबल’ गाणं रिलीज; हृता आणि प्रथमेशचा रोमँटिक अंदाज

Timepass 3 : झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास 3' (Timepass 3) येत्या 29 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दगडूचे वेड लावणारे प्रेम याआधी आपण सर्वांनीच पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या ‘लव्हेबल’ भावना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 'टाइमपास 3' मधील ‘लव्हेबल’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून हे गाणे प्रथमेश परब (prathamesh parab) आणि हृतावर (Hruta Durgule) चित्रित करण्यात आले आहे. 


पाहा गाणं 


कार्तिकीला कळणार दीपिका आपली बहिण असल्याचं सत्य! दीपा-कार्तिकमध्ये सुरु होणार नवा संघर्ष

Rang Majha Vegla : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) सध्या प्रचंड गाजते आहे. या मालिकेत सध्या बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या मोठा गोंधळ पाहायला मिळतो आहे. आता दीपाला दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य कळलं आहे. यामुळे ती सौंदर्यावर प्रचंड संतापली आहे. आता दीपा दीपिकाला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. तर, दुसरीकडे आता कार्तिकीला देखील दीपिका आपलीच बहिण असल्याचे सत्य कळणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

जॉन अब्राहमने सुरु केले ‘तेहरान’चे शूटिंग, चित्रपटाचा टीझर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!

Tehran Movie : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स'(Ek Villain Returns)  या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता जॉनने त्याचा आगामी नवीन चित्रपट 'तेहरान'चे (Tehran) शूटिंग सुरू केले आहे. मॅडॉक फिल्म्स अंतर्गत बनणाऱ्या ‘तेहरान’ या चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. नुकताच याचा टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जॉन खूपच इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन करत आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

'ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत, काळजी नसावी'; अपघातानंतर मंगेश देसाईंची पहिली सोशल मीडिया पोस्ट

Mangesh Desai : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते मंगेश देसाई (Mangesh Desai) यांच्या कारचा काल (10 जुलै) अपघात झाला होता. मंगेश देसाई हे कुटुंबासोबत कर्जत येथे जात होते. यावेळी  वाशी, कोकण भवन परिसरात कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने मंगेश देसाई आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोणालाही दुखापत झालेली नाही. या अपघातात मंगेश यांच्या गाडीचे नुकसान झाले. अपघातानंतर मंगेश यांनी सोशल मीडियावर  एक पोस्ट शेअर केली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Dhanush : चित्रपटाचा हीरो पण सेटवरील लोक म्हणत होते रिक्षावाला; बॉडी शेमिंगमुळे धनुषला झाले होते अश्रू अनावर

Dhanush : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री धनुष (Dhanush) हा त्याच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. धनुषनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील काम केलं आहे. पण धनुषला बॉडी शेमिंगचा देखील सामना करावा लागला आहे. सेटवरील काही लोक त्याला रिक्षावाला म्हणत होते. धनुषनं त्याच्या या अनुभवाबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं. 


वाचा सविस्तर बातमी 

Alia Bhatt, Karan Johar : लग्नाआधीच प्रेग्नंट होती आलिया भट्ट? करण जोहरच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण!

Alia Bhatt : बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतरच गुडन्यूज दिली आहे. अनेकांना ही बातमी ऐकून आनंद झाला. आलियाने ही गुडन्यूज दिल्यानंतर लाखो चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, काही जणांनी ती लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या अटकळी बांधल्या. यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागला की, आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती का? मात्र, आता करण जोहरने (Karan Johar) केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा या चर्चांना उधान आले आहे. करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या एपिसोडमध्ये नुकतीच आलिया भट्ट आणि रणवीर सिंहने हजेरी लावली होती. यावेळी करण जोहरने एक असे वक्तव्य केले की, सर्वांच्याच भुवया उंचावल्या.


वाचा संपूर्ण बातमी

Radhika Apte : स्वतःच्याच लग्नात पतीसोबत फोटो काढायला विसरली राधिका आपटे!

Radhika Apte : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या राधिका आपटेचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. केवळ चित्रपटच नाही तर, राधिकाला ओटीटी विश्वाची राणी म्हटले जाते. अनेक वेब सीरिजच्या माध्यमातून तिने आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. आता राधिका तिच्या आगामी ‘फॉरेन्सिक’ (Forensic) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी ती जोरदार प्रमोशन करत आहे. याच प्रमोशन दरम्यान तिने तिच्या लग्नाविषयी एक अशी गोष्ट सांगितली, जी ऐकून तुम्ही देखील त्यावर विश्वास ठेवणार नाही.


वाचा संपूर्ण बातमी

Rashmika Mandanna : लाल रंगाचा हिजाब परिधान करून रश्मिका मंदनाने दिल्या ईदच्या शुभेच्छा! फोटोमागे दडलंय खास कारण!

Rashmika Mandanna : नुकतीच देशभरात ईद साजरी करण्यात आली. या निमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. यात ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हिने देखील एक फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, रश्मिकाचा हा फोटो प्रचंड चर्चेत आला आहे. या फोटोत राष्मिकाने लाल रंगाचा हिजाब परिधान केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमागे कारणही खास आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य'; 8 ऑगस्टपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला


मराठी मालिकाविश्वात सध्या नवनवीन विषयांवरील मालिकांचे प्रयोग होत आहेत. आता 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका 8 ऑगस्टपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


शाहरुख खानच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा


आज जगभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किंग खान आणि त्याचा धाकटा मुलगा अबरामने मन्नतच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतानाचे शाहरुखचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


स्वप्नील जोशीच्या 'बळी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी', 'स्टेपनी' नंतर आता 'बळी' या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 17 जुलैला  दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत आहे.


'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ


आज महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त अनेक कलाकार चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळनेदेखील आषाढी एकादशीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


मंगेश देसाईच्या कारला अपघात; गाडीचे नुकसान


अभिनेता, निर्माता मंगेश देसाई गेल्या अनेक दिवसांपासून 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता मंगेश देसाई एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. कर्जतला जात असताना मंगेशच्या कारला अपघात झाला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.