एक्स्प्लोर

Alia Bhatt, Karan Johar : लग्नाआधीच प्रेग्नंट होती आलिया भट्ट? करण जोहरच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण!

Alia Bhatt : बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतरच गुडन्यूज दिली आहे.

Alia Bhatt : बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतरच गुडन्यूज दिली आहे. अनेकांना ही बातमी ऐकून आनंद झाला. आलियाने ही गुडन्यूज दिल्यानंतर लाखो चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, काही जणांनी ती लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या अटकळी बांधल्या. यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागला की, आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती का? मात्र, आता करण जोहरने (Karan Johar) केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा या चर्चांना उधान आले आहे. करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या एपिसोडमध्ये नुकतीच आलिया भट्ट आणि रणवीर सिंहने हजेरी लावली होती. यावेळी करण जोहरने एक असे वक्तव्य केले की, सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

यादरम्यान, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात एकत्र काम करत असलेल्या रणवीर (Ranveer Singh) आणि आलियाने शोमध्ये मजेदार गोष्टी सांगितल्या आणि काही गुपितेही उघड केली. यावेळी आलियाने रणबीरने आपल्याला कसं प्रपोज केलं, आणि त्या खास क्षणाचा फोटो दाखवण्यावर रणवीर सिंहच्या डोळ्यांत कसं पाणी आलं, हा एक किस्सा सांगितला. याचवेळी आलिया म्हणाली की, मी हि गोष्ट सांगितल्यावर रडू कोसळणारा रणवीर सिंह हा पहिला व्यक्ती नाही. या आधी करण जोहरच्या बाबतीतही असेच घडले आहे.

काय म्हणाली आलिया?

हा किस्सा सांगताना आलिया म्हणाली की, ‘मी एकदा करण जोहरच्या ऑफिसमध्ये गेले होते. तो त्याच्या खुर्चीवर बसला होता. त्या दिवशी त्याचा ‘बॅड हेअर डे’ होता. त्यामुळे वैतागलेल्या करणने केसांमध्ये मोठी हेअर कॅप घातली होती. त्याच वेळी मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले आणि हीच गोष्ट त्याला सांगितली. ते ऐकून करणलाही आनंदाने रडू आलं होतं.’

करणने काय गडबड केली?

आता आलियाने सांगितलेला हाच किस्सा करण जोहरने या आधी देखील सांगितला होता. मात्र, त्यात प्रपोज डे नव्हे, तर आई होणार असल्याची गुडन्यूज होती. अर्थात, त्याने हा किस्सा सारखाच सांगितलेला, पण त्यात त्याने आलियाच्या प्रेग्नन्सीचा उल्लेख केला होता. आलियाने गुडन्यूज दिल्यावर जेव्हा करण जोहरने मध्मांना प्रतिक्रिया दिली तेव्हा कारण जोहरने हाच किस्सा सांगितला होता. तो म्हणाला, आलिया जेव्हा ऑफिसमध्ये आली, तेव्हा मी हेअर कॅप लावून बसलो होतो. ती आली आणि तिने मला तिची गुडन्यूज सांगितली. आलिया माझी मानलेली मुलगी असल्याने माझ्या बाळाला आता बाळ होणार हे ऐकून मला आनंदाने रडू आलं होतं.’

आता, आलिया आणि करण जोहरने सांगितलेला हा किस्सा ऐकून गोंधळलेले चाहते पुन्हा स्वतःचे अंदाज बांधत आहेत.

संबंधित बातम्या

Alia Bhatt Pregnant : आलिया लंडनमध्ये करतेय हॉलिवूडच्या सिनेमाचे शूटिंग; लवकरच परतणार भारतात

Darlings Official Teaser : 'क्या एक मेंढक और बिच्छू दोस्त हो सकते है?'; डार्लिंग्सचा धमाकेदार टीझर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget