Rang Majha Vegla : कार्तिकीला कळणार दीपिका आपली बहिण असल्याचं सत्य! दीपा-कार्तिकमध्ये सुरु होणार नवा संघर्ष
Rang Majha Vegla : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) सध्या प्रचंड गाजते आहे. या मालिकेत सध्या बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे.
Rang Majha Vegla : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) सध्या प्रचंड गाजते आहे. या मालिकेत सध्या बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या मोठा गोंधळ पाहायला मिळतो आहे. आता दीपाला दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य कळलं आहे. यामुळे ती सौंदर्यावर प्रचंड संतापली आहे. आता दीपा दीपिकाला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. तर, दुसरीकडे आता कार्तिकीला देखील दीपिका आपलीच बहिण असल्याचे सत्य कळणार आहे.
दीपिका दीपाचीच मुलगी आहे, हे तिला कळावं म्हणून सौंदर्या इनामदारने एक प्लॅन तयार केला होता. त्यानुसार दीपाला सगळे पुरावे मिळावे अशी व्यवस्था तिने करून ठेवली होती. तिच्या योजनेनुसार दीपाला सगळी खरी गोष्ट कळली आहे. सोबतच आपली दुसरी मुलगी देखील जिवंत असून, ती दीपिकाच असल्याचं देखील तिला कळलं आहे. आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य तिच्या समोर आल्यानंतर दीपा प्रचंड हादरली आहे. मात्र, आता कार्तिक आणि दीपामध्ये पुन्हा एकदा नवा वाद सुरु होणार आहे.
दीपिका कोणाकडे राहणार?
दीपिका आपली मुलगी असल्याचे कळताचदीपा तिला आपल्या घरी घेऊन गेली आहे. तर, सत्य परिस्थिती माहित नसलेला कार्तिक दीपिकाला घरी आणण्यासाठी दीपाच्या घरी जातो. यावेळी दीपा दीपिकाला परत पाठवण्यास नकार दिला. यावेळी दीपाने कार्तिकला सगळी सत्य परिथिती सांगितली. दीपिका दीपाची मुलगी असल्याचे सत्य आता कार्तिकला देखिला कळले आहे. मात्र, दीपा आणि आणि कार्तिकचे वाद सुरु असताना कार्तिक देखील तिथे येते आणि त्यांच्यात चाललेली गोष्ट ऐकते. त्यांच्यात सुरु असलेल्या वादावरून आता कार्तिकीला देखील दीपिका तिची बहिण असल्याचे कळले आहे. ती याबाबत आता दीपाला विचारणार आहे.
सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर तुम्ही ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका पाहू शकता. एका मध्यमवर्गीय घरातील उपेक्षित आणि सावळ्या रंगाच्या दीपा या मुलीची कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. तिच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत तिने नेहमीच यश मिळवले आहे, असं मालिकेच्या कथानकामध्ये दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे, अभिनेता आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर हे कलाकार या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारतात. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
हेही वाचा :
Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' मालिका सुपरहिट, सलग सहा आठवडे प्रेक्षकांच्या पसंतीस अव्वल...
Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मधील नवी कार्तिकी; मैत्रेयी दाते दिसणार कार्तिकीच्या भूमिकेत