Entertainment News Live Updates 10 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 10 Oct 2022 04:58 PM
Mararthi Movie: 'सोंग' चित्रपटाची घोषणा; मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर प्रमूख भूमिकेत

Mararthi Movie: अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत येणाऱ्या वैविध्यपूर्ण कथा-विषयांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मनोरंजनासोबतच समाजातील वास्तविकतेला अधिक वाव मिळताना दिसतोय. के.सी.एस प्रोडक्शन निर्मित असाच एक वेगळ्या धाटणीचा मराठी चित्रपट 'सोंग' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्षितिज सी. शिंदे निर्मित आणि संजय कसबेकर लिखित-दिग्दर्शित 'सोंग' चित्रपटाचा मुहूर्त नुकताच कलाकार, तंत्रज्ञ आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 


संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

GG Gandhada Gudi: दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं भावनिक ट्वीट

GG Gandhada Gudi: अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचं 29 ऑक्टोबर रोजी निधन झालं. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुनीत यांचा जीजी गंधाडा गुडी (GG Gandhada Gudi) हा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  जीजी गंधाडा गुडी  (GG Gandhada Gudi) या त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. पुनीत यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार (Ashwini Puneeth Rajkumar) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्वीट शेअर केलं. 



Ti Majhi Premkatha: प्रेम आणि विश्वास यांचा अनोखा मिलाफ! 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेम टिकणार की, नाही हे ज्यावर अवलंबून असते तो म्हणजे विश्वास. अशाच प्रेमाच्या विश्वासाची प्रेमकथा घेऊन, अतिविश्वासमुळे झालेला प्रेमाचा घात घेऊन 'फिल्मी टाईम प्रोडक्शन' सह आणि 'कनिष्क अँड त्रिगेश एंटरटेनमेंट' सोबत निर्माते राजकुमार देगलूरकर, ओमप्रकाश बुक्कावार निर्मित 'ती माझी प्रेमकथा' (Ti Majhi Premkatha) या प्रेममय चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.


 


Tujhech Mi Geet Gaat Aahe: 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Tujhech Mi Geet Gaat Aahe: स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे (Tujhech Mi Geet Gaat Aahe) मालिकेत मल्हार कामत आणि स्वराजचा सांगीतिक प्रवास प्रेक्षक अनुभवतच आहेत. लवकरच मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची एन्ट्री होणार आहे. मल्हारने आपल्या गाण्याचं शिक्षण ज्यांच्याकडून घेतलं ते त्याचे गुरु पंडीत मुकुल नारायण ही व्यक्तिरेखा विक्रम गोखले साकारणार आहेत. बऱ्याच वर्षांनंतर विक्रम गोखले हे तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये विक्रम गोखले यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतली ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते अतिशय उत्सुक आहेत. मालिका लोकप्रिय तर आहेच त्यासोबतच नव्या पीढीसोबत काम करताना नेहमीच आनंद होतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

‘विक्रम वेधा’ने पार केला 100 कोटींचा टप्पा! बॉक्स ऑफिसवर दिसली ह्रतिक-सैफच्या जोडीची जादू!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. बॉक्स ऑफिसच्या जगतात या चित्रपटाने एक मैलाचा टप्पा पार केला आहे. होय, 'विक्रम वेधा'ने जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर, रिलायन्स एंटरटेनमेंटच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत एकूण 69 कोटींहून अधिक कमाई केली आहे.


 


Adipurush: 'काळानुसार धर्म बदलतो'; रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांनी आदिपुरुष चित्रपटाला दिला पाठिंबा

Adipurush: सध्या   'आदिपुरुष' (Adipurush)   हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी देखील या चित्रपटाच्या टीझरवर टीका केली. अशातच आता रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर (Ramanand Sagar) यांचा पुत्र प्रेम सागर (Prem Sagar) यांनी आदिपुरुष चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bebhan : संस्कृती बालगुडेची 'बेभान'मध्ये धमाकेदार एन्ट्री, 11 नोव्हेंबरला चित्रपट होणार रिलीज!

‘मिस्टर वर्ल्ड’ ठाकूर अनुपसिंहचा मराठीतील पदार्पणाचा चित्रपट म्हणून ‘बेभान’ (Bhebhan) या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेची (Sanskruti Balgude) एन्ट्री झाली आहे. संस्कृती बालगुडे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, 11 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘बेभान’ प्रदर्शित होत आहे.


 





S. S. Rajamouli: कोट्यवधींचे मालक; 'आरआरआर', 'बाहुबली'सारख्या चित्रपटांमधून दबदबा निर्माण करणारे एसएस राजामौली!

S. S. Rajamouli: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांचा आज वाढदिवस. 10 ऑक्टोबर 1973 रोजी  कर्नाटकमधील रायचूर येथे एसएस राजामौली यांचा जन्म झाला.  एसएस राजामौली यांचे वडील व्ही. विजयेंद्र प्रसाद (V. Vijayendra Prasad) हे प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर आहेत. कोदुरी श्रीशैला श्री राजामौली असं  एसएस राजामौली  यांचं संपूर्ण नाव आहे. त्यांच्या आईचं नाव राजा नंदिनी आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एसएस राजामौली आंध्र प्रदेश राज्यात गेले. तिथे त्यांनी रेड्डी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

‘आईमुळे मी नैराश्यातून बाहेर पडू शकले!’, दीपिका पदुकोणने पुन्हा एकदा वेधलं ‘मेंटल हेल्थ’कडे लक्ष!

दीपिकाने स्वतः आयुष्यात डिप्रेशनचा सामना केला आहे. केवळ डिप्रेशनच नाही तर कधी कधी तिला आत्महत्येचे विचारही मनात यायचे. या वेळी दीपिकाने तिच्या या कठीण दिवसांत तिला झालेल्या त्रासाचे अनेक प्रसंगही शेअर केले. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने पुन्हा एकदा दीपिकाने तिच्या डिप्रेशनच्या दिवसांवर भाष्य केले आहे.


 





एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा आज 68वा वाढदिवस

अभिनेत्री रेखा (Rekha) म्हटलं की, डोळ्यांसमोर येत ते त्यांचं अतिशय सौंदर्यवान रूप. आपल्या अभिनयाने, अदाकारीने आणि सौंदर्याने रसिक प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे. दर वर्षी माणसाचं वय वर्षाने वाढत जातं. पण रेखा यांच्या बाबतीत मात्र वयाने माघार घेतली असावी असं म्हटलं तर, वावगं ठरणार नाही. सरत्या वर्षांनी त्यांच्या वयात नव्हे तर सौंदर्यात आणखी भर घातली. 


 





Nayanthara-Vignesh’s Babies : नयनतारा अन् विग्नेश झाले ‘अम्मा-आप्पा’, अभिनेत्रीच्या घरी जुळ्यांचं आगमन!

नयनतारा आणि विग्नेश ही जोडी जुळ्या मुलांची पालक झाली आहे. नुकतीच विग्नेश शिवन याने सोशल मीडियावर नयनतारासोबत मुलांच्या पायाचे चुंबन घेतानाची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर नयनतारा आणि विग्नेश्वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


प्रवीण तरडे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक, पुणे सायबर पोलिसामध्ये तक्रार नोंद


प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे.  यासंबंधी त्यांनी पुणे सायबर पोलिसात तक्रार नोंद केली आहे. प्रवीण तरडे यांचे फेसबुक अकाउंट काही दिवसांपूर्वी हॅक झाले होते. त्यांनी इन्स्टाग्रामवरुन त्याची माहितीही दिली होती. आता या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. सायबर चोरट्यांनी प्रवीण तरडे यांचे बनावट पेज तयार करून त्यावरून अनेक जणांना फोन आणि मेसेज केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.  त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना मेसेज देखील करण्यात आले होते. प्रवीण तरडे यांनी ही माहिती दिली आहे. याप्रकरणी आता प्रवीण तरडे यांनी पुण्यातील सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.


इंडियन आयडॉलमधील या स्पर्धकाचा फॅन झाला विराट कोहली; केला खास मेसेज


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'चा 13 वा (Indian Idol 13) सीझन सुरू झाला आहे. या कार्यक्रमामधील स्पर्धकांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच या कार्यक्रमाच्या स्पर्धकांनी केवळ सामान्य लोकांची नाही तर सेलिब्रिटींची देखील मनं जिंकली आहेत. शनिवारी (8 ऑक्टोबर) एका एपिसोड दरम्यान कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणनं स्पर्धक ऋषी सिंहला (Rishi Singh) क्रिकेटर विराट कोहलीनं (Virat Kohli) केलेल्या खास मेसेजबाबत सांगितलं.


उर्वशी रौतेला पोहोचली ऑस्ट्रेलियाला; नेटकरी म्हणाले, 'ऋषभ पंतच्या मागे गेली...'


बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील सोशल मीडिया वॉर नेहमीच चर्चेचा विषय ठरला. उर्वशी आणि ऋषभ यांच्या नात्याची चर्चा देखील जोरदार रंगली होती. आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालाय. या स्पर्धेत भारतीय संघ त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. आता नुकतीच उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे आता अनेक नेटकरी उर्वशीला ट्रोल करत आहेत.


आदिपुरुष चित्रपटावरुन नवा वाद ; दिल्ली न्यायालयात याचिका दाखल


बॉलिवूडमधील प्रसिद्ध सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेता प्रभास (Prabhas) यांच्या  'आदिपुरुष' (Adipurush)  या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज जाला. त्यानंतर अनेकांनी या टीझरवर टीका केली. काहींनी या टीझरमधील सैफच्या लूकवर टीका केली तर काहींनी टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या VFX वर आक्षेत घेतला. आता आदिपुरषचा हा वाद दिल्लीच्या तीस हजारी न्ययालयापर्यंत पोहचला आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या विरुद्ध एक याचिका दिल्ली तीस हजारी न्ययालयात दाखल करण्यात आली आहे.


'माझी भूमिका तू करणार म्हणजे...'; गौरी सावंत यांनी सुष्मिताबद्दल शेअर केली 'ही' पोस्ट


बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen)  काही दिवसांपूर्वी तिच्या 'ताली' (Taali) या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले.  या पोस्टरला सुष्मितानं कॅप्शन दिलं, 'ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! ' साडी, लाल टिंकली, हातात खड्याळ अन् गळ्यात माळ अशा लूकमधील फोटो सुष्मितानं शेअर केले.  या चित्रपटात सुष्मिता एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुष्मिता टाळी वाजवताना दिसत दिसत आहे. सुष्मिता ट्रान्सजेंडर गौरी सावंत (Gauri Sawant)  यांची भूमिका साकारत आहे. नुकतीच गौरी सावंत यांनी सुष्मितासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.