Adipurush: 'काळानुसार धर्म बदलतो'; रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांनी आदिपुरुष चित्रपटाला दिला पाठिंबा
आता रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर (Ramanand Sagar) यांचा पुत्र प्रेम सागर (Prem Sagar) यांनी आदिपुरुष चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.
Adipurush: सध्या 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी देखील या चित्रपटाच्या टीझरवर टीका केली. अशातच आता रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर (Ramanand Sagar) यांचा पुत्र प्रेम सागर (Prem Sagar) यांनी आदिपुरुष चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.
काय म्हणाले प्रेम सागर?
आदिपुरुष चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याला प्रेम सागर यांनी पाठिंबा दिला आहे. एका मुलाखतीमघ्ये त्यांनी सांगितलं की, "तुम्ही कोणाला काहीही बनवण्यापासून कसे रोखू शकता? काळानुसार धर्म बदलतो आणि ओम राऊत यांनी त्यांना जे योग्य वाटले ते केले. चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाला 'रामायण' म्हटलेलं नाही.' प्रेम सागर हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. अलिफ लैला, विक्रम वेताळ या मालिकांचे दिग्दर्शन प्रेम सागर यांनी केलं आहे.
रामायण मालिकेच्या कलाकारांनी चित्रपटावर केली टीका
रामायण मालिकेमध्ये राम ही भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये अरुण गोविल यांनी सांगितलं, 'मला सर्व जण प्रतिक्रिया द्या असे म्हणतं होते मी त्यांना नकार दिला. नंतर मी ठरलवं की मी तुमच्यासमोर या विषयावर प्रतिक्रिया मांडावी. खूप दिवसांपासून मी बऱ्याचं गोष्टींचा विचार करत होतो. त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याची वेळ आली आहे. 'रामायण' आणि 'महाभारत' हे सर्व पौराणिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ हा आपला सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे. ते बदलले जाऊ शकत नाही. त्याची छेडछाड करणे योग्य नाही.'
'चित्रपटातील पात्र प्रेक्षकांना आवडले पाहिजे. जर पात्र श्रीलंकेचे असेल तर ते मुघलांसारखे दिसू नये. टीझरमध्ये आम्ही त्याला फक्त 30 सेकंद पाहतो म्हणून मला जास्त समजू शकले नाही, परंतु तो वेगळा दिसतो. मी मान्य करतो की काळ बदलला आहे आणि VFX हा एक आवश्यक भाग आहे पण त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. हा फक्त टीझर आहे, यावरुन चित्रपट कसा असेल याचा अंदाज लावता येणार नाही.' असं रामायण मालिकेमध्ये सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सांगितलं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: