Entertainment News Live Updates 08 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Pushpa 2: गळ्यात लिंबाची माळ, भरजरी साडी अन् हातात बंदुक; पुष्पा-2 मधील अल्लू अर्जुनच्या लूकनं वेधलं लक्ष
Pushpa 2: सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक खास व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पुष्पा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये गेलेला दिसला. आता नुकताच अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर त्याचा पुष्पा-2 चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला आहे. फोटोमधील अल्लू अर्जुनच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Pushpa 2: तुरुंगातून फरार झालेला पुष्पा कुठं गेलाय? उत्तर मिळालं, पाहा पुष्पा-2 चा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ
टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर पुष्पा-2 या चित्रपटाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक वृत्तनिवेदक पुष्पाबद्दल माहिती देताना दिसत आहे. तो म्हणतो, 'तिरुपती तुरुंगातून पुष्पा फरार झाला आहे.' तर दुसरी न्युज अँकर म्हणते, 'पुष्पाला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या' आता तुरुंगातून फरार झालेला पुष्पा हा कुठे गेला आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. पण याचं उत्तर या व्हिडीओच्या शेवटी कळते. पुष्पा हा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये जातो. एका कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पुष्पाची झलक दिसते.
Saas Bahu Aur Flamingo Poster: 'सास बहू और फ्लेमिंगो' सीरिजचं पोस्टर रिलीज; डिंपल कपाडियाचा खतरनाक लूक
Saas Bahu Aur Flamingo Poster: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. डिंपलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता 'सास बहू और फ्लेमिंगो' (Saas Bahu Aur Flamingo) या सीरिजमध्ये डिंपल कपाडिया काम करणार आहे. या सीरिजचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये डिंपल कपाडिया खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. हे पोस्टर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये या सीरिजबद्दल उत्सुकता वाढली आहे. 'सास बहू और फ्लेमिंगो' च्या या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Raveena Tandon: राष्ट्रपतींकडून पद्मश्री स्वीकारणं हा माझ्यासाठी अद्भुत अनुभव : रवीना टंडन
Raveena Tandon On Padma Shri Award : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये रवीनानं काम केले. काही दिवसांपूर्वी रवीनाला सिनेसृष्टीतील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर रवीनानं एबीपी न्यूजच्या मुलाखतीत तिच्या भावना व्यक्त केल्या.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
#WATCH | Actor Raveena Tandon receives the Padma Shri from President Droupadi Murmu pic.twitter.com/9BaFYP3TZi
— ANI (@ANI) April 5, 2023
Anupam Kher Latest Video: अनुराग बासुने 'मेट्रो इन दिनों' च्या सेटवर अनुपम खेर यांच्यासाठी बनवला 'अंडा डोसा'; व्हिडीओ व्हायरल
Anupam Kher Latest Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात. अनुपम खेर हे दिग्दर्शक अनुराग बसुच्या 'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुराग बसु (Anurag Basu) हा अनुपम खेर यांच्यासाठी 'अंडा डोसा' बनवताना दिसत आहे.
View this post on Instagram
Shahid Kapoor-Kriti Sanon Movie: शाहिद अन् क्रितीचा रोमँटिक अंदाज; आगामी चित्रपटाच्या पोस्टरमधील केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष
Shahid Kapoor-Kriti Sanon Movie: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही जोडी लवकरच एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच क्रितीनं तिच्या आणि शाहिदच्या आागमी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. क्रिती आणि शाहिदच्या या आगामी चित्रपटाची टॅगलाइन 'अॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' अशी आहे. क्रितीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये शाहिद आणि तिची जबरदस्त केमिस्ट्री नेटकऱ्यांना बघायला मिळत आहे.
View this post on Instagram
Adnan Sami: एक्स वाईफच्या पॉर्न DVD ते भारताचे नागरिकत्व; छोट्या भावानं अदनाम सामीबद्दल केले 'हे' गौप्यस्फोट
Adnan Sami: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामी (Adnan Sami) हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. नुकतीच त्याचा छोटा भाऊ जुनैद सामीनं (Junaid sami) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून जुनैदनं अदनान सामीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अदनान सामीच्या भारतातील नागरिकत्वाबद्दल तसेच त्याच्या एक्स वाईफबद्दल देखील जुनैदनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
Allu Arjun birthday:7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन, प्रायव्हेट जेट अन् आलिशान घर; अल्लू अर्जुन आहे कोट्यवधींचा मालक
Allu Arjun birthday: अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा साउथ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनचा आज 41 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अल्लू अर्जुनकडे अनेक लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. तसेच त्याच्याकडे 7 कोटींची व्हॅनिटी आणि प्रायव्हेट जेट देखील आहे. जाणून घेऊयात अल्लू अर्जुनच्या संपत्तीबाबत...