एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates : मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates :  मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Saif Ali Khan : सैफ अली खानच्या 'Devara'चा फर्स्ट लूक आऊट! वाढदिवशी चाहत्यांना खास भेट

Saif Ali Khan Devara First Look Out : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खाननेदेखील (Karina Kapoor Khan) सैफसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान सैफच्या आगामी 'देवरा' (Devara) या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. वाढदिवशी फर्स्ट लूक आऊट करत अभिनेत्याने चाहत्यांना खास भेट दिली आहे.

Pinkicha Vijay Aso : 'पिंकीचा विजय असो' मालिका रोमांचक वळणावर; पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य! किशोरी शहाणे सहा वर्षांनी करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

Pinkicha Vijay Aso : 'पिंकीचा विजय असो' (Pinkicha Vijay Aso) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत नव-नवीन ट्वीट आणण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. पिंकीला नवा चेहरा आणि नवं आयुष्य मिळणार आहे. त्यामुळे आता मालिकेचे आगामी भाग पाहण्याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे.

Aishwarya Narkar: 'खरं नाव का नाही लावत?' ते 'तुमच्या कपाळावर काय झालंय?'; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ऐश्वर्या नारकरनं दिली उत्तरं

Aishwarya Narkar:  अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो आणि वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. ऐश्वर्यानं नुकतेच Ask Me A Question हे सेशन इन्स्टाग्रामवर केलं. या सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची ऐश्वर्यानं उत्तरं दिली आहे.

ऐश्वर्यानं अनेक हिंदी आणि मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, श्रीमंतघरची सून या मालिकांमधील ऐश्वर्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  ये प्यार ना होगा काम,घर की लक्ष्मी बेटियां या हिंदी मालिकांमध्ये तिनं काम केलं. 

17:49 PM (IST)  •  17 Aug 2023

New OTT Release: 'गन्‍स अँड गुलाब्स'ते एपी ढिल्लों: फर्स्ट ऑफ अ काइंड ; वीकेंडला ओटीटीवर पाहा या वेब सीरिज

New OTT Release:  ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपट लोक आवडीनं बघतात. विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. अनेक वेळा प्रेक्षक ओटीटीवरील वेब सीरिज बिंच वॉच करतात. या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर रिलीज झालेल्या या वेब सीरिज पाहू शकता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

15:10 PM (IST)  •  17 Aug 2023

Uorfi Javed: एका व्यक्तीनं दिली धमकी; उर्फी जावेद म्हणाली, 'माझ्या आयुष्यातील...'

Uorfi Javed:   उर्फी जावेद  (Uorfi Javed)  ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. उर्फीला ही विविध आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. काही लोक उर्फीचं कौतुक करतात तर काही जण तिला ट्रोल करतात.  नुकतीच उर्फीला एका व्यक्तीनं धमकी दिली आहे. या व्यक्तीच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

14:15 PM (IST)  •  17 Aug 2023

Taali : हेमंत ढोमे ते सुबोध भावे; 'या' मराठी कलाकारांनी केलं सुष्मिताच्या 'ताली' वेब सीरिजचं कौतुक

Taali: अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen)'ताली'  (Taali)  ही वेब सीरिज 15 ऑगस्टला या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. या सीरिजमधील सुष्मिताच्या अभिनयाचं तसेच या सीरिजच्या कथानकाचं अनेकजण कौतुक करत आहेत. आता काही मराठी कलाकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ताली या वेब सीरिजचं कौतुक केलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

13:55 PM (IST)  •  17 Aug 2023

Baipan Bhaari Deva: 'सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात...'; केदार शिंदे यांची खास पोस्ट

Baipan Bhaari Deva: केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटात सहा महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. अनेक सेलिब्रिटींनी तसेच प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटानं स्वातंत्र्य दिनाला देखील कोट्यवधींची कमाई केली आहे. याबाबत केदार शिंदे यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

12:40 PM (IST)  •  17 Aug 2023

Sai Lokur: कुणीतरी येणार येणार गं! सई लोकूर होणार आई, पतीसोबतचे फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज

Sai Lokur: अभिनेत्री सई लोकूरच्या (Sai Lokur) घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन होणार आहे. सईनं सोशल मीडियावर पती तीर्थदीप रॉयसोबतचे (Tirthadeep Roy) खास फोटो शेअर करुन गुडन्यूज दिली आहे. सईनं फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला आणि तीर्थदीपला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Embed widget