Pinkicha Vijay Aso : 'पिंकीचा विजय असो' मालिकेत विजय आंदळकरची एन्ट्री; साकारणार महत्वाची भूमिका
‘पिंकीचा विजय असो’ (pinkicha vijay aso) या मालिकेत युवराज ही व्यक्तिरेखा साकरणार आहे अभिनेता विजय आंदळकर (Vijay Andalkar).
Pinkicha Vijay Aso : ‘पिंकीचा विजय असो’ (pinkicha vijay aso) या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. मालिकेच्या प्रोमोला देखिल भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत युवराज ही व्यक्तिरेखा साकरणार आहे अभिनेता विजय आंदळकर (Vijay Andalkar). विजयला याआधी बऱ्याच मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षक भेटले आहेत. स्टार प्रवाहच्या गोठ या मालिकेत त्याने खलनायक साकारला होता.
पिंकीचा विजय असो मालिकेतील युवराज साकारण्यासाठी तो खुपच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना विजय म्हणाला, ‘राजकारणातील मोठं प्रस्थ असणाऱ्या गजराज धोंडे पाटील यांचा युवराज हा मुलगा. वडिलोपार्जित सत्ता-संपत्ती यामुळे रॉयल कारभार असलेला. आपल्याला फक्त मान पाहिजे, जान गेली तरी चालेल हे युवराजचं ब्रीदवाक्य आहे. मान मिळवण्यासाठी युवराज काहीही करु शकतो. मालिकांमध्ये राजकारण हा विषय फार क्वचित हाताळला जातो. त्यामुळे पिंकीचा विजय असो मालिकेतील युवराज ही भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. सातारी भाषा शिकण्यासाठी मी बरीच मेहनत घेतोय. माझ्या सातारच्या मित्रांना मी आवर्जून फोन करतो आणि सातारी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो.
पुढे त्यानं सांगितलं, 'आमच शूट साताऱ्यामध्ये सुरु असल्यामुळे आजुबाजूच्या दुकानदारांशीही बोलीभाषेत बोलतो. या भाषेत एक वेगळाच गोडवा आहे. साताऱ्यातलं वातावरण अतिशय सुंदर आहे. डोंगर दऱ्यांमध्ये आम्ही शूट करतोय. इथे कायमस्वरुपी रहाणारी लोकं नशिबवान आहेत असं मला वाटतं. शुद्ध हवा, घरगुती जेवण यामुळे मी शूटिंगचा मनापासून आनंद लुटतोय. तेव्हा पिंकीचा विजय असो ही नवी मालिका नक्की पहा लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.'
संबंधित बातम्या
Honeymoon Movie : जास्मिन भसीन आणि गिप्पी ग्रेवालच्या 'हनीमून' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात
Happy Birthday Vamika : विराट -अनुष्काच्या लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha