Kunal Kapur Birthday: रंग दे बसंती, डिअर जिंदगीसारख्या चित्रपटात झळकलेला 'हा' ॲक्टर अभिताभ बच्चन यांचा जावई, ही गोष्ट माहितीये?
मीनाक्षी चित्रपटातून सुरुवात केलेल्या कुणाल कपूरला रंग दे बसंती चित्रपटानं ब्रेक दिला. त्यानंतर अनेक बॉलिवून चित्रपट त्याला मिळाले.
Kunal Kapur: रंग दे बसंती, डिअर जिंदगीसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनात पाडणारा कुणाल कपूर आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करतोय. मुंबईत 1977 साली जन्माला आलेल्या कुणालनं अमिताभ बच्चन आणि मनोज बाजपेयी यांच्या फिल्म AKS मध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले आहे. आता बॉलिवूडपासून काहीसे लांब असणारा कुणाल अभिनयासोबत एका कंपनीचा मालकही आहे. २०१२ मध्ये सुरु केलेल्या या कंपनीचा तो सहसंस्थापक आहे. जाणून घेऊयात कुणाल कपूरबाबत काही खास गोष्टी...
रंग दे बसंतीनं मिळवून दिली ओळख
मीनाक्षी चित्रपटातून सुरुवात केलेल्या कुणाल कपूरला रंग दे बसंती चित्रपटानं ब्रेक दिला. त्यानंतर अनेक बॉलिवून चित्रपट त्याला मिळाले. डियर जिंदगी, आजा नचले, लगा चुनरी में डाग अशा हिट चित्रपटांमध्ये कुणाल दिसला. डॉन २ मधली त्याची भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.
नसरुद्दिन शहासोबतही केलं काम
कुणालने आपल्या करिअरची सुरुवात नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटरमधून केली. त्यानंतर कुणालने अक्स या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कुणालचा पहिला डेब्यू चित्रपट मीनाक्षी अभिनेत्री तब्बूसोबत होता. 2006 साली कुणालला त्याच्या आमिर खान स्टारर रंग दे बसंती या दुसऱ्या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. या चित्रपटातील कुणालच्या अभिनयाचे लोकांनी खूप कौतुक केले आणि या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे नामांकनही मिळाले.
अमिताभ बच्चनचा जावईही आहे कुणाल
अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी नैना हिच्याशी कुणाल कपूरचे लग्न झाले आहे. २०१५ मध्ये या दोघांनी दक्षिण आफ्रिकेत लग्न केले. ज्यामध्ये फक्त कुणाल कपूरचे कुटुंब आणि बच्चन कुटुंबही उपस्थित होते.
व्यवसायतही मारली उडी
अभिनयाच्या पलीकडे, कुणाल कपूर तंत्रज्ञानाच्या जगात खोलवर मग्न झालेला दिसतो. त्यांनी आशियातील सर्वात मोठ्या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मपैकी एक सह-स्थापना केली आणि रोबोटिक्सपासून स्पेस टेकपर्यंतच्या स्टार्टअपमध्ये सक्रियपणे गुंतवणूक केली. त्याचा सोशल मीडिया अनेकदा या उपक्रमांबद्दलचा त्याचा उत्साह दर्शवतो. कुणाल कपूरने अभिनय सोडून व्यवसायात हात आजमावला, फार कमी लोकांना माहित आहे की कुणाल कपूर "टॉप क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म" कंपनीचा सह-संस्थापक आहे. कुणाल कपूरने 2012 मध्ये हा व्यवसाय सुरू केला.