Devra on OTT: थेटरमध्ये मैदान मारलं, आता घरबसल्या पाहता येणार ज्यु NTR चा 'देवरा', OTT वर या दिवशी होणार रिलिज
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली आहे आणि आता तो OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
Devra on OTT: सिनेप्रेमींमध्ये सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची (South Movies) चांगलीच क्रेझ आहे.'बाहुबली','केजीएफ','पुष्पा','आरआरआर' सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून साऊथ इंडस्ट्री खूपच लोकप्रिय झाली आहे. ज्युनिअर एनटीआरचा बहुचर्चित 'देवारा' चित्रपटगृहांमध्ये चमकल्यानंतर आता ओटीटीवर येणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. 'देवारा' या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरसह सैफ अली खान आणि जान्हवी कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
कोणत्या ओटीटीवर होणार देवरा रिलिज?
नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे 155 कोटी रुपयांत ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत. त्यामुळं ज्यांना थेएटरमध्ये हा चित्रपट पाहता आला नाही त्यांच्यासाठी घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे.
कधी होणार या तारखेला रिलिज?
ज्यु एनटीआरचा गाजलेला देवरा सिनेमा आता ओटीटीवर रिलिज होण्यासाठी सज्ज झालाय. देवराचा ८ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. देवरा सिनेमानं चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं हाऊसफुल प्रेम मिळवलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली आहे आणि आता तो OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मिडिया वृत्तानुसार, "देवारा" येत्या काही दिवसांमध्ये प्रमुख OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाईल. हा चित्रपट घरबसल्या बसून पाहण्याची प्रेक्षकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
दिग्दर्शन आणि अभिनय
देवरा चित्रपटाच्या कथा आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यु एनटीआरच्या उत्कृष्ट अभिनयाने ते अधिक प्रभावी केले आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाची चर्चा ओटीटी रिलीज झाल्यानंतरही सुरूच राहणार हे नक्की. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक कोरटाला सिवा यांनी केले आहे, जे यापूर्वी अनेक हिट चित्रपटांसाठी ओळखले जातात. सामाजिक-राजकीय मुद्द्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.ज्यु. एनटीआरच्या दमदार अभिनयामुळे हा सिनेमा अधिकच प्रभावी झाला आहे.