big boss18: बोलणी कुठे फिस्कटली? निया शर्मानं दिला चाहत्यांना धक्का, बिग बॉसच्या ग्रँड प्रिमियरआधीच लिहिलं सॉरी!
बिग बॉसच्या घरात निया शर्मा हिट ठरली असती! पण सध्या तरी तिच्या चाहत्यांना तिच्या रिॲलिटी शोच्या पदार्पणासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
![big boss18: बोलणी कुठे फिस्कटली? निया शर्मानं दिला चाहत्यांना धक्का, बिग बॉसच्या ग्रँड प्रिमियरआधीच लिहिलं सॉरी! Entertainment Big Boss 18 Nia sharma Sorry post viral rejection in Big boss shoking to her fans big boss18: बोलणी कुठे फिस्कटली? निया शर्मानं दिला चाहत्यांना धक्का, बिग बॉसच्या ग्रँड प्रिमियरआधीच लिहिलं सॉरी!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/07/cfa389358133828988bc4fb49869c95c17282814285411063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Big Boss 18: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची एकीकडे सांगता होत असून या फिनालेनंतर लगेचच बिगबॉस हिंदीच्या १८ व्या पर्वाकडे प्रेक्षक वळले. बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची जोरदार चर्चा होती. यात सर्वात अग्रणी नाव होतं सुप्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री निया शर्मा हिचं. नियाचा मोठा चाहतावर्ग तिच्या नावाची कधी घोषणा होते याकडे डोळे लावून बसला होता. पण बिग बॉस 18 च्या ग्रँड प्रिमियरला सुरुवात होण्याला काहीच तास शिल्लक असताना तिची 'सॉरी' ची पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पर्वाची सर्वात स्ट्राँग स्पर्धक म्हणून गणली जात असताना तिनं चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. तिनं सॉरी असं ठळक अक्षरात लिहीत चाहत्यांची माफी मागितली आहे.
निया या शोची पहिली अधिकृतपणे पुष्टी झालेली स्पर्धक होती. 'खतरों के खिलाडी १४'च्या ग्रँड फिनालेमध्ये या कार्यक्रमाचा होस्ट रोहित शेट्टीने घोषणा केली होती की, निया लवकरच सलमानच्या या शोमध्ये दिसेल. असेही बोलले गेले की, ती या शोमध्ये पाहुणी म्हणून येईल. आता नियाच्या पोस्टनंतर मात्र चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला. तिने निराशा केल्याच्या असंख्य कमेंट तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर आल्या आहेत.
काय म्हटलंय नियानं?
सहा ऑक्टोबर रोजी निया शर्मानं इन्स्टाग्रॅमवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, ज्या चाहत्यांची आणि हितचिंतकांची मी निराशा केली त्यांच्यासाठी... मला माफ करा. जबरदस्त पाठिंबा, प्रेम आणि विलक्षण प्रचार पाहून मी खरोखर भारावून गेले. यामुळे मी एकदा तरी घरात जावे, असे वाटू लागले आणि गेल्या १४ वर्षांत मी काय कमावले याची जाणीव करून दिली. मी असे म्हणणार नाही की ही हाइप आणि वेधून घेतलेले लक्ष मला आवडले नाही, परंतु कृपया मला दोषी ठरवू नका, ती मी नव्हते.'
सलमान खानने फायनलिस्टचा खुलासा केला
बिग बॉसच्या 18 व्या पर्वाच्या ग्रँड प्रीमियर लाच टॉप दोन फायनलिस्ट स्पर्धक निवडले गेले आहेत. कलर्स टीव्ही नाईन नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमो मध्ये सलमान खान स्वतः या दोन फायनलिस्ट चा खुलासा करताना दिसत आहे. बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा कधीच शेवटपर्यंत जाणाऱ्या स्पर्धकाविषयी सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. विशेष म्हणजे दोन फायनलिस्ट ची घोषणा केल्यानंतर खुद्द त्या स्पर्धकांनाही आश्चर्य वाटतंय. ते स्वतः ही गोष्ट खरी आहे का असं सलमान खानला विचारताना दिसतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)