Emiway Bantai Injured During Dubai Shoot: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाचा भीषण कार अपघात; गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकला गेला VIDEO
Emiway Bantai Injured During Dubai Shoot: एमीवे बंटाईनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका व्हीलॉगचा टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्टंट करताना दिसतोय, पण स्टंट करत असताना त्याचा अपघात होतो.

Emiway Bantai Injured During Dubai Shoot: भारतातील हिप-हॉपच्या दुनियेतील दिग्गज स्टार एमीवे बंटाई (Raper Emiway Bantai) सध्या त्याच्या 'दुबई कंपनी' (Dubai Company) या नव्या म्युझिक व्हिडीओच्या शुटिंगसाठी दुबईतील शारजाह इथे आहे. त्याचा दुबईतील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे एमीवे बंटाईचे चाहचे भलतेच चिंतेत पडले आहेत. या व्हिडीओमध्ये एमीवे चालत्या बसमधून डोकं वर काढताना दिसतोय. त्यानंतर जे दिसतंय ते मात्र अंगावर शहारे आणणारं आहे. एमीवे बंटाईला गंभीर दुखापत झाली आहे.
शूटिंग दरम्यान, रॅपर एमीवे बंटाई जखमी
एमीवे बंटाईनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका व्हीलॉगचा टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्टंट करताना दिसतोय, पण स्टंट करत असताना त्याचा अपघात होतो. व्हिडीओमध्ये एमीवे पडताना दिसतोय. व्हिडीओमध्ये दिसतंय की एमीवे चालत्या कारच्या खिडकीवर बसलेला आहे. त्याचवेळी कार अचानक जागेवर थांबते आणि बेसावध असलेला एमीवे बंटाई तोल गमावून चालत्या कारमधून बाहेर तोंडावर आपटतो. दरम्यान, हा अपघात जाणूनबुजून केलेला स्टंट होता की, चूक हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
एमीवे बंटाईनं पोस्टमध्ये लिहिलंय, 'स्टंट करताना चूक झाली...'
इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओसोबत एमीवेनं लिहिलंय की, "स्टंट करताना चूक झाली....". रॅपरच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते काळजीत पडले. त्याचे चाहते सध्या रॅपरच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
View this post on Instagram
रॅपरच्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
एमीवेच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "हा खूप कठीण प्रसंग होता भावा, देवाचे आभार, तू सुरक्षित आहेस." तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, "तू आमच्यासाठी खूप मेहनत करतोस, आता प्रेम दाखवण्याची आमची वेळ आहे..."
रॅपर एमीवे बंटाई कोण?
एमीवे बंटाई, ज्याचं खरं नाव मोहम्मद बिलाल शेख, त्यानं 2013 मध्ये 'ग्लिंट लॉक' या इंग्रजी रॅप गाण्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण त्यांच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार, त्यांनी हिंदीमध्ये रॅपिंग सुरू केलं आणि 2014 मध्ये आलेला 'और बंटाई' हा त्यांचा पहिला हिट ट्रॅक ठरला. तेव्हापासून एमीवेनं 'मचेंगे', 'बंटाई', 'फिर से मचेंगे' सारखी हिट गाणी दिलीत आणि भारतीय हिप-हॉपमधील सर्वात टॉप रॅपर्सच्या यादीत मानाचं स्थान मिळवलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























