एक्स्प्लोर

Don 3 Controversy Farhan Akhtar Ranveer Singh: 'डॉन 3'चा वाद चिघळला, रणवीर सिंहनं बॅन करणाऱ्या FWICE ला खेचलं कोर्टात, इंडस्ट्रीत खळबळ माजवणाऱ्या वादात कुणाचं पारडं जड?

Don 3 Controversy Farhan Akhtar Ranveer Singh: रणवीर सिंहनं कायदेशीर नोटीस धाडताच 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज'नं जारी केलेला Non-Cooperation Directive  मागे घेतला आहे.

Don 3 Controversy Farhan Akhtar Ranveer Singh: बॉलिवूडचा (Bollywood News) बाजीराव म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि डॉन 3 (Don 3) या सिनेमाशी संबंधित वादानं आता एक नवं वळण घेतलं आहे. या अभिनेत्यानं 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' (FWICE) विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या संदर्भात, रणवीर सिंहच्या टीमनं फेडरेशनला एक कायदेशीर नोटीस (Legal Notice) देखील पाठवली आहे. हा सर्व प्रकार गेल्याच आठवड्यात घडला, जेव्हा फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) 'एक्सेल एंटरटेनमेंट' या निर्मिती संस्थेनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, FWICE नं रणवीर विरोधात 'सहकार्य न करण्याची नोटीस' (Non-Cooperation Notice) जारी केली होती. तेव्हापासून, या प्रकरणामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता रणवीर सिंहनं या नोटीसला न्यायालयात आव्हान दिल्यानं, हा वाद इतक्या लवकर मिटणार नाही हे स्पष्ट झालं आहे. 

FWICE नं जारी केलेली ही नोटीस म्हणजे, या 41 वर्षीय अभिनेत्यावर घातलेली एक प्रकारची 'बंदी'च ठरते. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत रणवीर आणि फरहान यांच्यातील वाद मिटत नाही, तोपर्यंत या संस्थेशी संलग्न असलेले सुमारे 4 लाख कर्मचारी या अभिनेत्यासोबत काम करण्यास नकार देतील. FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी India Today शी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला की, त्यांना खरोखरच या 'धुरंधर' फेम अभिनेता रणवीर सिंहकडून कायदेशीर नोटीस मिळाली आहे आणि त्यानंतरच त्यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे.

FWICE कडून Non-Cooperation Directive मागे

'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज'ने रणवीर सिंग यांच्या विरोधात जारी केलेला Non-Cooperation Directive  मागे घेतला आहे. फेडरेशननं स्पष्ट केलं आहे की, त्यांनी Non-Cooperation Directive आदेश जारी केल्यानंतर, इतर अनेक संघटनांकडून त्यांना विनंत्या प्राप्त झाल्या होत्या, या संघटनांनी सदर असहकार उपाय मागे घेण्याची त्यांना आग्रहाची विनंती केली होती. 

IMPAA, 'प्रोड्यूसर्स गिल्ड' आणि CINTAA यांसारख्या इतर संघटनांनी सदर आदेश मागे घेण्याची विनंती केली होती; त्यांच्या या विनंत्यांना प्रतिसाद म्हणून हा आदेश त्यानंतर रद्द करण्यात आला. दरम्यान, रणवीर सिंहनं पाठवलेल्या कायदेशीर नोटीसला FWICE कडून औपचारिक उत्तर दिलं जाईल, अशीही माहिती मिळत आहे. 

FWICE नं रणवीर सिंहवर 'बंदी' घालण्याचा निर्णय का घेतलेला?

फरहान अख्तर यांच्या तक्रारीनंतर FWICE नं अभिनेता रणवीर सिंह यांच्याविरोधात 'नॉन-कोऑपरेशन नोटीस' जारी केल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, रणवीर यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीत नेमकं काय नमूद आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, FWICE नं हा निर्णय का घेतला, याबाबत फेडरेशननं यापूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'डॉन 3' सिनेमासाठी जवळपास तीन वर्ष तयारी सुरू होती. मात्र, सिनेमाच्या शुटिंगला अवघे तीन आठवडे शिल्लक असताना रणवीर सिंहनं अचानक प्रोजेक्टमधून माघार घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. फेडरेशनच्या निवेदनानुसार, या प्रकरणी रणवीरला तीन वेळा समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी चर्चेसाठी उपस्थित राहण्यास नकार दिल्याचं सांगण्यात आलं. तसेच, फेडरेशन आणि सिनेमाशी संबंधित व्यक्तींप्रती दाखवलेल्या कथित असहकार्यपूर्ण भूमिकेमुळे रणवीर सिंह यांच्याविरोधात Non-Cooperation Directive जारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं FWICE नं स्पष्ट केलेलं. पण आता, रणवीर सिंहनं कायदेशीर नोटीस धाडल्यानंतर  FWICE रणवीर सिंहवरचा बॅन हटवला आहे. या घडामोडींमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढे या वादावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यातील वादाचा पुढचा अध्याय काय?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फरहान अख्तरनं रणवीर सिंहविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही; तसेच त्यानं कोणत्याही न्यायालयाचा दरवाजा ठोठावलेला नाही. त्याऐवजी, त्यानं सिने क्षेत्रातील एका संस्थेकडे (Film Industry Body) औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या संस्थेकडे त्याच्या 'एक्सेल एंटरटेनमेंट' (Excel Entertainment) या निर्मिती संस्थेनं, Don 3 च्या पूर्व-निर्मितीवर खर्च करण्यात आलेल्या 45 कोटी रुपयांविषयीचे पुरावे सादर केले आहेत. या कंपनीनं रणवीर सिंहनं उपस्थित केलेल्या तक्रारींनाही उत्तर दिलं आहे. ज्या तक्रारींमुळेच रणवीरनं Don 3 मधून माघार घेतल्याचं मानलं जात होतं. या सर्व कागदपत्रांना पुरावा म्हणून ग्राह्य धरून, आणि रणवीरकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यानं 'FWICE' या संस्थेनं आपला निर्णय दिलेला. पण आता संस्थेन आपला निर्णय मागे घेटला असून बंदी हटवली आहे. 

रणवीर सिंहनं FWICE ला कोर्टात का खेचलं?

गेल्या आठवड्यात जेव्हा हा संपूर्ण वाद शिगेला पोहोचला, तेव्हा FWICE नं एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी रणवीर सिंहला तीन वेगवेगळ्या प्रसंगी बोलावणं पाठवलं होतं. मात्र, खुद्द अभिनेत्यानं किंवा त्याच्या टीममधील कोणत्याही व्यक्तीनं तसं करण्यास संमती दर्शवली नाही. त्यानंतर, रणवीर सिंहच्या प्रतिनिधीनं FWICE ला एक ईमेल पाठवून असा दावा केला की, या प्रकरणावर त्या चित्रपट संस्थेचं (FWICE) कोणतंही अधिकारक्षेत्र नाही, कारण हा वाद पूर्णपणे एका अभिनेत्यामध्ये आणि निर्मात्यामध्ये असलेला खाजगी वाद आहे. आता FWICE नं आपला बंदी घातल्याचा निर्णय मागे घेतला असून रणवीर सिंहच्या कायदेशीर नोटीसला उत्तर देण्यात येणार आहे. 

FWICE च्या 'बंदी'बाबत रणवीर सिंहनं निवेदन केलेलं जारी 

FWICE नं रणवीर सिंह विरोधात निर्देश जारी केले, त्याच दिवशी रणवीर सिंहनं एक निवेदन प्रसिद्ध केलेलं. अभिनेत्याच्या टीमच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटलं आहे की, "रणवीर सिंह सिनेसृष्टीचा आणि Don फ्रँचायझीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचा मनापासून आदर करतो. Don 3 संदर्भात अलीकडे घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, त्यानं मौन बाळगण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला. कारण त्याचं असं मानणं आहे की, व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध हे सन्मान, प्रगल्भता आणि परस्पर आदरानेच अधिक चांगल्या प्रकारे हाताळल्या जातात..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Satish Sanpal Dubai Billionaire Success Story: बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Embed widget