'तिच्या कुंडलीत बालमृत्यूचा योग होता..', दिव्या भारतीच्या आईने केला होता धक्कादायक खुलासा VIDEO
Divya Bharti mother Meeta Bharati : बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीने 1993 मध्ये तिच्या घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली होतीय. तिच्या आईने तिच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला होता.

Divya Bharti mother Meeta Bharati : ‘विश्वात्मा’, ‘दीवाना’, ‘शोला और शबनम’, ‘दिल का क्या कसूर’ यांसारख्या आयकॉनिक चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री दिव्या भारती हिनं केवळ 19 व्या वर्षीच 21 चित्रपटांत काम करून बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आपलं नाव नोंदवलं होतं. मात्र तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सगळे हादरले होते. आजही दिव्या भारतीचा मृत्यू गूढच राहिलाय . काहींनी तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं, तर काहींनी तो खून असल्याचा संशय व्यक्त केला. अशा वेळी तिची आई मीता भारती यांचा एक जुना मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या सांगतात की दिव्याच्या अकाली मृत्यूचा संकेत आधीच मिळालेला होता.
दिव्याच्या मृत्यूबाबत तिच्या आई मीता भारती काय म्हणाल्या?
इंस्टाग्रामवर ig_divyabharti या नावाने असलेल्या पेजवर दिव्या भारतीच्या आई मीता भारती यांचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, “माझ्या लक्षात आधीच आलेलं होतं, कारण दिव्याच्या जन्मकुंडलीत बालमृत्यूचा योग होता.” त्या पुढे म्हणाल्या, “मी हे दुर्लक्षित केलं आणि विसरूनही गेले होते, पण जेव्हा दिव्याचा मृत्यू झाला, तेव्हा ही भविष्यवाणी आठवली.” त्यांनी सांगितलं की दिव्याच्या आठव्या वर्षी बालमृत्यूचा योग होता, पण 18–19 व्या वर्षी ती घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.
View this post on Instagram
छोटं पण प्रभावी करिअर
25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत ओमप्रकाश भारती आणि मीता भारती यांच्या घरी जन्मलेली दिव्या भारती हिला अभ्यासात फारसा रस नव्हता. लहानपणापासूनच तिला अभिनय आणि नृत्याची आवड होती. 1990 मध्ये तिनं साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तिचा पहिला चित्रपट ‘बबली राजा’ हा सुपरहिट ठरला. त्यानंतर तिला बॉलीवूडमधूनही ऑफर्स मिळू लागल्या. 1992 मध्ये ‘विश्वात्मा’ या चित्रपटातून तिनं हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि हा चित्रपटही सुपरहिट ठरला.
यानंतर दिव्याने ‘दिल का क्या कसूर’, ‘शोला और शबनम’, ‘दीवाना’, ‘जान से प्यारा’, ‘दिल आशना है’, ‘बलवान’, ‘दिल ही तो है’, ‘दुश्मन ज़माना’, ‘गीत’ यांसारख्या अनेक उत्तम चित्रपटांत काम केलं. 10 मे 1992 रोजी तिनं निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्याशी विवाह केला आणि इस्लाम धर्म स्वीकारला. पण केवळ काही महिन्यांतच – 5 एप्रिल 1993 रोजी दिव्याने घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आणि अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूमागील सत्य आजही उलगडलेलं नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या























