एक्स्प्लोर

Director Karl Rinsch Sentenced To Two And Half Year Jail: सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?

Director Karl Rinsch Sentenced To Two And Half Year Jail: सरकारी वकिलांनी न्यायालयात सिद्ध केलं की, दिग्दर्शकानं नेटफ्लिक्ससाठी तयार होत असलेल्या 'व्हाइट हॉर्स' या सायन्स-फिक्शन सीरिजच्या निर्मितीदरम्यान सुमारे 1.1 कोटी अमेरिकन डॉलर्सची आर्थिक फसवणूक केलेली.

Director Karl Rinsch Sentenced To Two And Half Year Jail: '47 रोनिन'चे दिग्दर्शक कार्ल रिन्श (Director Karl Rinsch) यांना सोमवारी (29 जून) फेडरल न्यायालयानं अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. न्यायमूर्ती जेड राकॉफ यांनी '47 रोनिन' मधील अभिनेता कीनू रीव्ह्स (Actor Keanu Reeves) आणि इतर साक्षीदारांनी दिलेल्या रिन्श यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित पुराव्यांचा विचार करत सरकारनं मागितलेल्या शिक्षेपेक्षा निम्मी शिक्षा सुनावलीय.

डिसेंबर महिन्यात ज्युरीनं कार्ल रिन्श यांना वायर फ्रॉड आणि मनी लॉन्ड्रिंग या आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. सरकारी वकिलांनी न्यायालयात सिद्ध केलं की, रिन्श यांनी नेटफ्लिक्ससाठी तयार होत असलेल्या 'व्हाइट हॉर्स' या सायन्स-फिक्शन सीरिजच्या निर्मितीदरम्यान सुमारे 1.1 कोटी अमेरिकन डॉलर्सची आर्थिक फसवणूक केलेली. पण, खेदाची बाब म्हणजे, ही फिल्म कधीच पूर्ण झाली नाही. या मोठ्या प्रोजेक्टला पूर्ण करण्याऐवजी, रिन्श यांनी जास्तीत जास्त पैसे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये जुगारात लावले आणि बाकीचे लाखो डॉलर्स लग्झरी वस्तू खरेदी करण्यात खर्च केले. शिक्षा सुनावण्यापूर्वी, लोअर मॅनहॅटनमधील न्यायालयात रिन्शनं न्यायाधीशाला सांगितलं की, "माझ्याकडून चूक झाली... या प्रक्रियेमुळे मला स्वतःबद्दलच्या अशा गोष्टींचा सामना करावा लागला, ज्या मी यापूर्वी कधीच पूर्णपणे समजून घेतल्या नव्हत्या..."

प्रकरण नेमकं काय?

रिन्श आणि त्यांची पत्नी गॅब्रिएला रोसेस यांनी एका प्रोजेक्टची योजना आखली होती. ती म्हणजे 'ऑरगॅनिक इंटेलिजंट' (Organic Intelligent) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मानवासारख्या दिसणाऱ्या कृत्रिम प्रजातीवर आधारित एक विज्ञान-कथा (Sci-Fi) मालिका. या प्रजातीची निर्मिती जगभरात मानवतावादी मदत पुरवण्यासाठी आणि संघर्ष, विनाशकारी युद्धांना कारणीभूत ठरणाऱ्या कट-कारस्थानांचा सामना करण्यासाठी करण्यात आली होती. 

'30WEST' या निर्मिती संस्थेनं 'व्हाईट हॉर्स' (White Horse) नावाच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आणि रिन्श, रोसेस यांनी सीरिजचे भाग (Episodes) तयार करण्यास सुरुवात केली. मात्र जेव्हा निधी संपला, तेव्हा कियानू रीव्हज सह-निर्माता म्हणून यात सामील झाले आणि त्यांनी आवश्यक भांडवल पुरवले. संपूर्ण सीझनसाठी प्रस्ताव मांडण्याकरिता रिन्श आणि रोसेस यांनी 4 ते 10 मिनिटांच्या कालावधीचे सहा लघू भाग तयार केले होते. 2015 ते 2019 या काळात स्ट्रीमिंग सेवांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आशय (Content) मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा होती, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स या दोन्ही कंपन्यांनी प्रोजेक्टमध्ये रस दाखवला. अखेरीस नेटफ्लिक्सनं प्रोजेक्ट आपल्याकडे घेतला आणि सीरिजच्या प्रोडक्शनसाठी 61.2 मिलियन डॉलर्सची रक्कम टप्प्याटप्प्यानं देण्याचं मान्य केलंय. तसेच, या सीरिजला 'कॉन्क्वेस्ट' (Conquest) असं नवं नाव देण्यात आलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

The Ring Star Daveigh Chase Dies: सुपरस्टार अभिनेत्रीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर, एड्समुळे 35व्या वर्षी घेतलेला अखेरचा श्वास, 10 वर्षांपासून होती बेपत्ता अन् बेघर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget