Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
True Story Behind Aamir Khans Rancho: 3 इडियट्समधील 'रांचो' हे पात्र कुणाच्या जीवनावर आधारीत होतं?

Rajkumar Hirani Reveals the Real Inspiration Behind Rancho: '3 इडियट्स' (3 idiots) या सिनेमाला रिलीज होऊन 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या सिनेमातील रहस्य आजही प्रेक्षकांमध्ये गूढ म्हणून चर्चित आहे. आमिर खानने या सिनेमात 'रांचो' उर्फ 'फुनसुख वांगडू' (Funsuk Wangdu) ही व्यक्तीरेखा साकारली होती. ही व्यक्तीरेखा नेमकी कुणाच्या आयुष्यावर आधारीत होती? हा प्रश्न अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. बहुतांश लोकांना असं वाटत होतं की, ही कथा सोनम वांगचुक यांची आहे. पण आमिर खानने हा दावा खोडून काढला आहे. परंतु, या दरम्यान, सोशल मीडियावर पुन्हा एकदा तोच प्रश्न फिरत आहे. 'रांचो' उर्फ 'फुनसुख वांगडू' ही व्यक्तीरेखा नेमकी कुणाची होती?
'रांचो' हे पात्र कुणावर आधारीत? (Rajkumar Hirani reveals Rancho character)
आमिर खानच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'रांचो' उर्फ 'फुनसुख वांगडू' या पात्रामागे एक नव्हे तर चार वेगवेगळ्या आणि रंजक कथा असल्याचं दिसून आलं आहे. '3 इडियट्स' हा सिनेमा लेखक चेतन भगत यांच्या 'फाईव्ह पॉइंट समवन' यांच्या जीवनावर आधारीत आहे. दरम्यान, सिनेमा रिलीज झाल्यानंतर चेतन भगत यांना चित्रपटात योग्य श्रेय देण्यात आले नाही, असा आरोप लेखकाने केला. दरम्यान, या वादामुळे बरीच चर्चा झाली.
'3 इडियट्स' हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला, तेव्हा असा निष्कर्ष काढण्यात आला की, आमिर खानने साकारलेले पात्र सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारीत आहे. शिक्षण व्यवस्थेबद्दलचा त्यांचा अनोखा दृष्टिकोन तसेच त्यांचे लडाखशी असलेले नाते, यामुळे या चर्चांनी अधिक जोर धरला होता. दरम्यान, सोनम वांगचुकने वारंवार हा दावा फेटाळून लावला होता. 'फुनसुख वांगडू'ची संपूर्ण कथा त्यांच्या जीवनावर आधारीत नाही, असं समोर आलं होतं.
जर सोनम वांगचूक नसेल तर, रांचो हे पात्र नेमकं कुणाच्या जीवनावर आधारीत आहे? याचे उत्तर राजकुमार हिरानी यांनी स्वत: दिले आहे. कोमल नाहटा यांना दिलेल्या मुलाखतीत राजकुमार हिरानी यांनी खुलासा केला की, 'रांचो' हे पात्र फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील एका स्टुडेंटपासून प्रेरित पात्र आहे. राजकुमार हिरानी मुलाखतीत म्हणाले की, 'आमिरचे पात्र आमच्या फिल्म स्कूलमधील एका स्टुडेंटपासून प्ररित आहे. ज्याचे नाव मी उघड करु शकत नाही. त्याला चित्रपट निर्माते व्हायचं होतं. पण त्याला FTII मध्ये प्रवेश मिळालेला नाही', असं राजकुमार हिरानी म्हणाले.
राजकुमार हिरानी यांनी पुढे सांगितलं की, 'त्याच्या मित्राचे सिलेक्शन झाले होते. पण त्याचे वडील त्याला या फिल्डमध्ये प्रवेश घेण्यास नकार देत होते. त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला नाही. त्याने आपल्या मित्राची ओळख धारण करुन तीन वर्षे FTII फिल्ममेकिंग शिकून घेतली. दरम्यान, ग्रॅज्युशन दरम्यान, सगळं सत्य समोर आलं. जेव्हा त्याला लोकांनी सर्टिफिकेट मिळणार नाही, असं सांगितलं, तेव्हा त्याने, 'मला सर्टिफिकेट नको. मला फिल्ममेकिंग शिकायचं होतं', असं त्याने सांगितलं होतं. तेव्हा राजकुमार हिरानी म्हणाले होते की, 'हाच तो क्षण होता, जेव्हा त्यांना खरी प्रेरणा मिळाली होती. कारण केवळ शिक्षण म्हणजेच प्रमाणपत्र नव्हे'
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















